महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अगसगेत घर कोसळून सुमारे चार लाखाचे नुकसान

10:52 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/अगसगे

Advertisement

अगसगे गावामध्ये घरांची पडझड सुरूच आहे. गेल्या वीस दिवसापासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाटील गल्लीतील शिवनगौडा निंगाप्पा पाटील यांचे राहते घर कोसळून सुमारे चार लाखाचे नुकसान झाले आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अगसगे, चलवेहट्टीमधील सुमारे 50 घरे कोसळली आहेत. मात्र यासंबंधी ग्रामपंचायतमध्ये 18 घरांची नोंद झाली असून इतर कोसळलेल्या घरांची योग्य कागदपत्रांअभावी अद्याप नोंद झाली नसून संबंधित कागदपत्रांसाठी नुकसानग्रस्त कागदपत्रे मिळविण्यासाठी धावपळ करीत आहेत.

Advertisement

पाटील गल्लीतील रहिवासी शिवनगौडा पाटील यांचे राहते घर पावसामुळे कोसळल्यामुळे यांच्यावर दु:खाचा मोठा डोंगरच कोसळला आहे. सध्या या घरांमध्ये पाणी साचत असून याच ठिकाणी हे कुटुंब राहत आहेत. तरी त्यांना गंजी केंद्रामध्ये दाखल करावे. नाहीतर संबंधीत खात्याकडून त्यांना राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. घराच्या भिंती कोसळल्याने जनावरे किरकोळ जखमी झाल्या आहेत. या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह मोलमजुरी करून होतो. याची माहिती शिवपुत्र मैत्री व संतोष मैत्री यांना मिळाली असता त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून ग्रा. पं. व पीडिओनी त्यांची राहण्याची व्यवस्था करावी. नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करावे, असे सांगितले. या घटनेचा पंचनामा तलाठी राणी पाटील व पीडिओ एन. ए. मुजावर यांनी केला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article