पणसुले - काणकोण येथे 15 लाखांची घरफोडी
12:41 PM Aug 11, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
काणकोण : काणकोण तालुक्यात दिवस-रात्र पोलिसांची गस्त चालू असताना आणि किनारपट्टीवर देखील गस्त चालू असताना हल्लीच्या काळात या तालुक्यात भुरट्या चोऱ्यांच्या प्रकारांत वाढ झालेली आहे. कार रविवारी पणसुले येथील घरफोडीत 15 लाखांचा ऐवज पळविण्यात आला आहे. घरात एकाकी व्यक्ती आहेत याचा अंदाज घेऊन दारावर थाप मारणे, घराच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या वस्तू लंपास करणे यासारख्या प्रकारांत सध्या वाढ झालेली असतानाच काल रविवारी 10 रोजी शिंगाळे, पणसुले येथील मिखिला फर्नांडिस यांच्या घरात चोरीचा प्रकार घडला आहे. फर्नांडिस यांच्या घरातील अंदाजे 15 लाख रु. किमतीचे दागिने लंपास करण्यात आले असून यासंबंधीची तक्रार काणकोणच्या पोलिस स्थानकावर करण्यात आली आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article