मिरज, सुभाषनगरमध्ये एकाच रात्रीत घरफोडी
मिरज :
शहर व ग्रामीण भागात गुरूवारी रात्रीच्या सुमारास घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सुभाषनगरमध्ये रिक्षा व्यवसायिकाचे घर फोडून सुमारे दोन लाख ऊपयांचे पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. तर टाकळी रस्त्यावर शाही दरबार हॉललगत असलेले फर्निचर दुकान फोडून 70 हजार ऊपयांची रोख रक्कम लंपास केली.
याबाबत मुदस्सर रशीद सतारमेकर व समर्थ सतिश सुर्यवंशी (रा. वखारभाग, मिरज) यांनी अनुक्रमे मिरज ग्रामीण व शहर पोलिसात वेगवेगळ्या तक्रारी दिल्या आहेत.
सुभाषनगर येथे दत्त मंदिराच्या पाठीमागे मुदस्सर सतारमेकर राहण्यास आहेत. गुरूवारी रात्री सर्व कुटुंबिय झोपी गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी सतारमेकर यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश कऊन कपाटातील सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने असा दोन लाखांचा मुद्देमाल चोऊन नेला. शुक्रवारी सकाळी सतारमेकर यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. अतिरीक्त पोलिस अधिक्षक रितू खोकर, पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सुचना केल्या. पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले. मात्र, श्वान पथक चोरी झालेल्या घरापासून काही अंतरावर घुटमळले. याबाबत ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
वखारभाग येथे राहण्यास असलेल्या समर्थ सूर्यवंशी यांचे टाकळी रस्त्यावरील शाही दरबार हॉललगत फर्निचर दुकान आहे. गुरूवारी रात्रीनंतर नियमितपणे ते दुकान बंद कऊन गेले. मात्र शुक्रवारी सकाळी दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. दुकानाला असलेल्या स्लाईडींग खिडकीच्या फटीतून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश कऊन कपाटातील 70 हजारांची रोख रक्कम चोऊन नेल्याची तक्रार सूर्यवंशी यांनी शहर पोलिसात दिली आहे. पोलिसांनी दोन्ही चोऱ्यांबाबत अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल कऊन तपासासाठी पोलिस पथके रवाना केली आहेत. दरम्यान, गेल्या महिनाभरापासून विशेष कऊन ग्रामीण भागात वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत. चारच दिवसांपूर्वी बेडग येथे कापड दुकान फोडून चोरट्यांनी 66 हजार ऊपयांचे नवीन कपडे चोऊन नेले होते. त्यानंतर सुभाषनगरमध्ये घरफोडी आणि मिरज शहरात दुकान फोडून चोरी झाल्याने घरफोडी करणाऱ्या चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याची भीती व्यक्त आहे. पोलिसांनी रात्रीच्या सुमारास गस्त वाढवून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.