हॉर्सशू बेंड : अद्भुत नैसर्गिक आश्चर्य
नदीमुळे तयार झाले अनोखे दृश्य
हॉर्सशू बेंड अॅरिझोनाच्या पेजनजीक असलेले एक अद्भूत नैसर्गिक आश्चर्य आहे. कोलोराडो नदीत हे वळण एक आदर्श घोड्याच्या नाळेच्या आकाराप्रमाणे आहे. हे ठिकाण दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करत असते. थक्क करणाऱ्या दृश्यांसोबत येथील इतिहास, भूविज्ञान आणि आकर्षक तथ्यांचा एक समृद्ध ठेवा असल्याने हे ठिकाण अत्यंत अनोखे ठरले आहे. लाखो वर्षांपूर्वी याच्या निर्मितीपासून स्थानिक मूळ अमेरिकन संस्कृतीत याच्या भूमिकेपर्यंत हॉर्सशू बेंड केवळ एक सुंदर दृश्यापेक्षा खूप काही प्रदान करते.
बेंडला हे नाव याच्या विशिष्ट घोड्याच्या नाळेच्या आकारामुळे प्राप्त झाले आहे. कोलोराडो नदीच्या प्रवाहाच्या शक्तीमुळे लाखो वर्षांमध्ये हा आकार प्राप्त झाला आहे. हॉर्सशू बेंड सुमारे 50 लाख वर्षांपूर्वी निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. हॉर्सशू बेंडला सर्वाधिक कोलोराडो नदीपासून सुमारे 1 हजार फुटांवरून पाहणे पसंत केले जाते. याच्या आसपासचे पर्वत 19 कोटी वर्षांपेक्षा जुने असल्याचा अनुमान आहे. तो काळ ज्युरासिक काळातील असल्याचे मानले जाते. पर्वत मुख्यत्वे नवाजो बलुआ दगडाने तयार झाले आहेत, जे स्वत:च्या चमकणाऱ्या लाल आणि नारिंगी रंगांसाटी खासकरून ओळखले जातात.
हॉर्सशू बेंडला खासकरून पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात आले आहे. पेज अॅरिझोना शहरापासून केवळ 5 मैल अंतरावर आहे. हॉर्सशु बेंड कोलोराडो नदीत एक नैसर्गिक वळण आहे, ज्यामुळे खडकाळ खोऱ्यांच्या भिंतीच्या माध्यमातून एक अनोखा कट तयार झाला आहे, परंतु या भागाचे दोन मालक आहेत. यू-शेप बेंडचा निम्मा हिस्सा पेज तर दुसरा हिस्सा खासगी मालकीचा आहे. परंतु दुसऱ्या हिस्स्यासोबत सिक्रेट एंटेलोप कॅन्यनसाठी पर्यटन प्रदान करणाऱ्या कॅन्यन टूर्सकडून याचे संचालन केले जाते.
हे ठिकाण स्टार केजिंगसाठी अत्यंत उत्तम आहे. संध्याकाळच्या प्रकाशात चमकणाऱ्या खडकांसोबत सूर्यास्त पाहण्यासाठी या ठिकाणाला मोठी पसंती आहे. आसपासचे एंटेलोप कॅन्यन, लेक पॉवेल आणि ग्लेन कॅन्यन डॅमला देखील लोक पसंती देतात.