For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य खजाना

06:10 AM Feb 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य  खजाना
Advertisement

ॐ नम: पार्वतीपतये हरऽऽ हरऽऽ महादेव!!!

Advertisement

उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वर:। परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन्पुऊष: पर: ।।

अर्थ : शरीरातही परमभगवान महेश्वर वास करतात. तो साक्षीदार, परवानगी देणारा, साहाय्यक, अतींद्रिय उपभोगकर्ता, परम नियंत्रक आणि परमात्मा (परम आत्मा) असे म्हटले जाते. (भगवत गीता अध्याय 13, श्लोक 23) स्वयं योगेश्वर माधवाने जेव्हा सांगितले तेव्हा इतर कोणाची साक्ष कशाला पाहिजे?       

Advertisement

यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट ती कुठली? आपल्या पुराणामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या डी-कोड (उलगडण्याची) करण्याची गरज आहे इतकेच. पुराणांमध्ये वर्णन केलेल्या कित्येक घटनांना आज आपण स्वत: आपल्या डोळ्याने घडताना पाहतो. यापेक्षा मोठी साक्ष कुठली? पूर्वीच्या काळी आकाशवाणी होत होती, आज दूरदर्शन (ऊन्न्) आहे, पूर्वीचे लोक एकमेकांशी हजारो मैल अंतरांवरून संपर्क साधायचे आज मोबाईल आहे, एका ठिकाणी गुप्त होऊन दुसऱ्या ठिकाणी प्रगट व्हायचे. हा टेलिपोर्टिंगचा भाग आहे. गांधारीला शंभर मुले झाली. आजची टेक्नॉलॉजी क्लोनिंगबद्दल बोलतेय. सांगायचा मुद्दा इतकाच की, ज्या गोष्टी आपल्या पुराणांमध्ये आहेत आणि ज्या गोष्टीच्या स्वरूपामध्ये आहे, त्या फक्त डी-कोड करण्याची गरज आहे.

महाशिवरात्रीला उपवासाला अत्यंत महत्त्व आहे. पण हा उपवास म्हणजे काय? आपण देवतेच्या जवळ बसणे आणि भक्ती भावामध्ये इतके तल्लीन होणे की, भूक आणि तहान याची आठवणही आपल्याला येऊ नये. हा खरा उपवास. या दिवशी आपण जमेल तसा उपवास करतो. याबद्दल कुठलाही आक्षेप असण्याची गरज नाही. पण शरीराची साथ असेल तरच उपवास करावा. ‘देव भावाचा भुकेला’ हे विसरू नये. या दिवशी काळे किंवा निळे कपडे वापरणे टाळावे. सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून प्रसन्न चित्ताने आपल्याला जो मंत्र येतो किंवा जे स्तोत्र येते त्याचा पाठ करावा. अंघोळीच्या पाण्यामध्ये एखादे बेलपत्र टाकले तर दिव्यतेचा अनुभव येईल. शिवमहापुराणात सांगितल्याप्रमाणे बेलाच्या झाडाखाली अंघोळ करणे जरी जमले नाही तरी निदान पाण्यात एक बेलपत्र टाकले तरी बास आहे. महाशिवरात्रीला इंद्रिय निग्रह करावा म्हणजे ब्रह्मचर्य पाळावे. हे ब्रह्मचर्य मानसिक आणि शारीरिक दोन्ही असावे इतकीच अपेक्षा. जमत असेल तर गुऊजींकडून ऊद्राभिषेक करून घ्यावा किंवा ऊद्राभिषेकामध्ये सामील व्हावे. हल्लीच्या काळात कामाच्या गडबडीत पूर्ण दिवस काढणे जर शक्मय नसेल तर दर तासाला दोन मिनिटे ॐ नम: शिवाय जप करावा. ज्याप्रमाणे पार्थिव म्हणजे मातीच्या गणपतीची आपण पूजा करतो त्याप्रमाणे पार्थिव शिवलिंगाची पूजा करणे अत्यंत शुभ आहे. नदीकाठची माती पंचामृत आणि भस्म यांचे छोटे शिवलिंग तयार करावे. एका तांब्याच्या पात्रात हे शिवलिंग ठेवून पंचोपचार पूजा करावी. बेलपत्र  वहावे. भस्म  अर्पण करावे. प्रसाद दाखवावा, आरती करावी, क्षमा प्रार्थना करावी,   मनोकामना सांगावी. आणि विसर्जन करावे. काही प्रभावी शिव स्तोत्रे: शिवरक्षा स्तोत्र- चहूबाजूनी रक्षा करते. शिवमहिम्नस्तोत्र - अत्यंत प्रसिद्ध आणि स्तुतीमध्ये सर्वश्रेष्ठ. शिवतांडव स्तोत्र-रावणाने रचलेले हे स्तोत्र लक्ष्मीप्राप्ती करता अमोघ आहे. दारिद्र्या हनन शिव स्तोत्र-सगळ्या प्रकारच्या दारिद्र्याचा नाश करते. शिवपंचाक्षर स्तोत्र- पापांपासून मुक्ती देते. शिवाष्टक आणि बिलवार्षक-मनोकामना पूर्ण करते.

मेष

आठवड्यामध्ये तुम्ही गोड बोलून दुसऱ्यांकडून कामे करून घ्यावी. जिथे गुळाने काम होते तिथं गोळीचे काम नाही हे तुमचे ब्रीद वाक्मय असेल. कित्येक लोकांना तुमच्या सल्ल्याचा फायदा होईल. तुम्ही आखलेल्या योजनांमध्ये तुम्हाला यश मिळेल. नातेसंबंधांमध्ये मधुरता येईल. पैशाच्या बाबतीत आठवडा उत्तम आहे. एखाद्या अपरिचित व्यक्तीच्या माध्यमातून फायदा होण्याची शक्मयता असेल.

उपाय : हिरवा हात रुमाल जवळ ठेवावा

वृषभ

बऱ्याच जबाबदाऱ्यांचा सामना करावा लागेल. काही गोष्टींबद्दल तुमचे मन तयार नसेल. काही अनावश्यक जबाबदाऱ्या डोक्मयावर पडल्याची जाणीव तुम्हाला होईल. संयम, नियोजन आणि सारासार विचार या गोष्टींची काळजी घेतली तर कुठलेही ध्येय अप्राप्य असणार नाही. आत्मविश्वासाच्या आणि ध्येयपूर्तीच्या नादात भावनिक संबंधांमध्ये मात्र दुर्लक्ष होऊ शकते.

उपाय: काजळाची डबी जवळ ठेवावी

मिथुन

सध्याचा काळ हा योजना बनवण्यात आणि कृतीच्या नावाने स्वस्थ बसण्यामध्ये जात आहे. या परिस्थितीला बदलायचे असेल तर योजनांना आणि कल्पनांना कृतीमध्ये उतरवावे लागेल. मनाचा कमकुवतपणावर मात करून आणि जेव्हा लागेल तेव्हा इतरांची मदत घेऊन कामे फत्ते करा. काही संधी मिळतील. ओळखीतून फायदा होईल. आर्थिक यश मिळेल.

उपाय: वैवाहिक जोडीदाराला हिरव्या रंगाचे वस्त्र भेट द्यावे

कर्क

कष्टाचे प्रमाण जास्त आणि पैशांची आवक त्यामानाने कमी असल्यामुळे तुम्ही नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन पद्धतीचे काम शोधण्याच्या प्रयत्नात असाल. या गोष्टी करता मित्रांचे सहकार्य मिळू शकते. आर्थिक ताळमेळ न बसल्यामुळे खर्चावर नियंत्रण असणार नाही. या आठवड्यात कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका.

उपाय: वारुळाची माती जवळ ठेवावी

सिंह

हा काळ थोडा उदासवाणा किंवा रेंगाळलेला असा वाटू शकतो. कामाची गती कमी झाल्यामुळे उत्साहात कमी येऊ शकते. दररोजच्या सवयीच्या तेच तेच जगण्याला तुम्ही थोडे कंटाळून जाल. या आठवड्यात तुम्ही नवीन संधीच्या शोधात असाल. उत्साहवर्धक काही करावेसे वाटेल. थोडक्मयात तुम्हाला जीवनशैलीमध्ये बदल करावासा वाटेल.

उपाय: सोनेरी रंगाचा हात रुमाल जवळ ठेवा

कन्या

विचारातील गोंधळ आणि निर्णय करण्याच्या क्षमतेतील वैगुण्य यामुळे समोरील पर्यायांपैकी कशाची निवड करावी याचा बोध तुम्हाला होणार नाही. मानसिकता थोडी चलबिचल असू शकते. हा मानसिक गोंधळ वस्तूंच्या आणि व्यक्तींच्या बाबतीतही लागू पडतो. त्यामुळे डोळसपणे निर्णय घेणे योग्य ठरेल. आंधळा विश्वास करू नका.

उपाय :मोकाट जनावरांसाठी खाण्यापिण्याची सोय करा

तूळ

पैशांच्या बाबतीमध्ये व्यवहारीपणा येईल. काही वेळा भावनेपेक्षा बुद्धीने निर्णय घेणे जास्त संयुक्तिक ठरेल. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. या आठवड्यात अध्यात्माशी संबंधित व्यक्तीशी तुमची ओळख होऊ शकते. एकंदर हा आठवडा आर्थिक आणि भावनिक दृष्ट्या चांगला आहे.

उपाय: मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीला एखादी जीवनोपयोगी वस्तू भेट द्यावी

वृश्चिक

समजा एखाद्या गोष्टीची वाट पाहत असाल किंवा एखादे उत्तर अपेक्षित असेल तर तुम्हाला फार काळ वाट बघावी लागणार नाही. लवकरच काम पूर्ण होईल. प्रेमात समोरच्या व्यक्तीकडून लवकरच होकार मिळवू शकाल. लहान मोठे यश पदरी पडेल. एकूणच सकारात्मक बदल दाखवणारा आठवडा आहे.

उपाय: जलाशयाजवळची माती घरी ठेवावी

धनु

तुमच्या हट्टामुळे किंवा आपल्या मतावर ठाम राहण्यामुळे कामाच्या ठिकाणी एखादा वाद उद्भवू शकतो. कठोर बोलण्यामुळे परिवारातील एखाद्या सदस्याचे मन दुखावले जाऊ शकते. आपल्या वागण्या बोलण्यावर संयम ठेवणे हे या आठवड्यात गरजेचे आहे. केवळ पैशांचा विचार न केलेला बरा. कामाच्या ठिकाणी हार्मोनी कशी निर्माण होईल हे पाहणे जास्त गरजेचे आहे.

उपाय :गरजूला गूळ दान करावा

मकर

प्रवासाचा थकवा जाणवेल. कामाचा उरक कमी होईल. कामाच्या ठिकाणी व्यक्तींच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो. काही माणसांनी वचन न पाळल्यामुळे मनस्ताप होऊ शकेल. तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे असेल. डोक्मयाशी संबंधित त्रास होऊ शकतो. आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. गुंतवणुकीचा फायदा होईल. प्रेम संबंध दृढ होतील.

उपाय: कष्टकऱ्यांना पाणी पाजावे

कुंभ

सध्याच्या तुमच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये काहीतरी बदल करावा लागेल किंवा एखादी गोष्ट तात्पुरती थांबवावी लागेल. ज्यामुळे भविष्यात किंवा पुढील काळात खात्रीशीररित्या फायदा होईल. या आठवड्यात काहीतरी छोटा-मोठा तोटा किंवा नुकसान होऊ शकते. कामानिमित्त जवळच्या व्यक्तींपासून दूर जावे लागू शकते.  घरातील व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटेल.

उपाय: गरजूंना औषधांचे दान करावे

मीन

नकारात्मक विचारांवर विजय मिळवून सकारात्मक विचारांवरच आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करावे. कारण नुसत्या नकारात्मक विचारांमुळेसुद्धा आपली चांगली शक्ती खूप खर्च होते. दिवास्वप्न बघणे किंवा कल्पना रंगवणे सोडून व्यवहारिक होण्याची गरज आहे. संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. हे सामर्थ्य तुमच्याकडे आहे त्याचा फायदा उठवावा.

उपाय :मजुरांना ताक वाटावे

Advertisement
Tags :

.