कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भविष्य खजाना

06:16 AM Nov 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष

Advertisement

स्वतंत्र व्यवसाय असेल तर या आठवड्यात प्राप्ती चांगली होण्याचा संभव आहे. पण काम चोख असायला हवे. जोडीदाराची मदत घेतली तर फायदा होण्याची शक्यता आहे. व्यवसायात एखादा भागीदार असेल तर त्याचाही सल्ला महत्त्वाचा ठरेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे.

Advertisement

उपाय: रोज नेमाने तुळशीला जल वाहा.

वृषभ

या आठवड्यात जरा डोके शांत ठेवूनच रहावे लागेल. उगाच कुठेतरी तंटा बखेड्यात सापडण्याची शक्यता आहे सांभाळून राहण्यास हा आठवडा सांगतो आहे. अचानक धनलाभाची देखील शक्यता आहे पण ते धन योग्य मार्गाने मिळत असेल तरच स्वीकारावे.

उपाय: पक्ष्यांना खाऊपिऊ घाला.

मिथुन

एखाद्या दूरच्या प्रवासाला किंवा तीर्थक्षेत्राला भेट द्यायला जाण्याची शक्यता आहे. संतांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. त्यांचा आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कामात वडिलांचा, वडिलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळेल. तुमच्या हातून काहीतरी सत्कर्म घडण्याचीही शक्यता आहे.

उपाय: रोज ‘ॐ नम: शिवाय’चा जप करा.

कर्क

या आठवड्यात तुम्हाला नोकरीत असाल तर पदोन्नती होण्याचा संभव आहे. मान मरातब, प्रतिष्ठा, सन्मान मिळण्याची शक्यता आहे. पित्याची, पितृतुल्य लोकांची काळजी घ्या, त्यांचे आशीर्वाद मिळवा. मातुल घराण्याकडून म्हणजेच आईच्या माहेरकडून काही आनंदाची वार्ता येण्याची शक्यता आहे.

उपाय:  गुरुवारी दत्तगुरुंचे मंदिरात जाऊन दर्शन घ्या.

सिंह

या आठवड्यात सभा-समारंभात सहभागी होऊन आपल्या मित्र परिवारांच्या गाठीभेटी होतील. हा आठवडा आनंदात जाण्याची शक्यता आहे. मोठ्या भावंडांच्या पण गाठीभेटी  होण्याची शक्यता आहे. त्या निमित्ताने काही मौल्यवान वस्तुंच्या भेटवस्तू मिळण्याचाही संभव आहे.

उपाय: रोज कोणतेही एक गणपती स्तोत्र म्हणा.

कन्या

पैसा जरा जपून खर्च करा. फालतू गोष्टीवर अतोनात खर्च होण्याची शक्यता आहे. तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवलेच पाहिजे. काही भूलथापाना तुम्ही बळी जाण्याचा संभव आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगा. वाहने जपून चालवा. रहदारीचे नियम काटेकोरपणे पाळा. अन्यथा गोत्यात येण्याचा संभव आहे.

उपाय: बाहेर जाताना कपाळावर केशरी गंध लावा.

तुळ

या आठवड्यात मन थोडेसे चंचल, थोडेसे हळवे होण्याची शक्यता आहे. मनाला ताब्यात ठेवून बुद्धीने काम करा. एखाद्या व्यक्तीकडून काही काम तुम्हाला काढून घ्यायचे असेल तर बुद्धी, चातुर्य व युक्ती वापरा. विवाहेच्छुकांचे विवाह जमण्याचा संभव आहे. जोडीदार छान मिळेल.

उपाय: लक्ष्मीची उपासना करा.

वृश्चिक

कुटुंबातील खेळीमेळीच्या वातावरणात तुमचा हा आठवडा छान जाईल, असे दिसते. पैतृक संपत्तीतून काही लाभ होण्याचा संभव दिसतो. तुमच्या बोलण्याची लोकांवर छाप पडून कुटुंबाकडून कौतुकाची थाप मिळण्याची शक्यता आहे. पण बोलताना चुकून कुणाचे मन दुखावले जाणार नाही ना याकडेही लक्ष द्या.

उपाय: रोज हनुमान चालिसाचा पाठ करा.

धनु

नोकरीत असाल तर या आठवड्यात आपल्या हातून अतिशय उत्तम काम होईल. वरिष्ठ आपल्यावर आपल्या कामावर खूष होण्याचा संभव आहे. छोटीशी तीर्थयात्रा अगर प्रवास घडण्याचीपण शक्यता आहे. छोट्या भावंडांचे सहकार्य, सहवास मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात कष्ट मात्र जास्त करावे लागतील.

उपाय: सद्गुरुची उपासना करा.

मकर

मातेचा किंवा मातृतुल्य व्यक्तीचा या आठवड्यात तुम्हाला पुरेपूर सहवास मिळण्याची शक्यता आहे. त्यांचे प्रेम व आशीर्वाद मिळतील. वाहन अथवा घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर त्या दृष्टीने पावले उचलण्यास काहीच हरकत नाही. एकंदरीत तुमचा हा आठवडा छान जाईल.

उपाय: शुक्रवारी तिन्ही सांजेला लक्ष्मीपूजन करा.

कुंभ

विद्यार्थ्यांनी समोर येणाऱ्या प्रलोभनाला न भुलता अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मोबाईल आणि टीव्हीद्वारे जी प्रलोभने दाखविली जातात त्यात अडकून नुकसान संभवते. पालकांनी आणि स्वत: विद्यार्थ्यांनी सावध रहावे. या राशीच्या लोकांनीदेखील आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे व स्वत:ही सावध रहावे.

उपाय: तीन मंगळवारी बजरंग बाण म्हणावे.

मीन

नोकरीत असाल तर थोडे जास्त कष्ट संभवतात. कष्टाचे फळ मिळेल, पण थोडे उशिराने. नोकरदाराकडून सहकार्य मिळेल. पण संपूर्णपणे त्यांच्यावर विसंबून राहू नका. स्वत:च्या तब्येतीकडे थोडे लक्ष द्या. किरकोळ तक्रारी सतावण्याची शक्यता आहे. एकूणच हा आठवडा जरा सांभाळून राहण्याची गरज आहे.

उपाय: शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनिला तेल वाहा.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article