राशिभविष्य
बुधवार दि. 6 ते मंगळवार 12 ऑगस्ट 2025 पर्यंत
तिलोत्तमा
कोणताही ज्योतिषी केवळ एका ज्योतिषीय विद्येवर अवलंबून रहात नाही, भलेही त्याचे प्राविण्य (expertise) एका शाखेमध्ये का असेना. कल्पना करा की, एखादी व्यक्ती तुमच्या समोर येते आणि काहीही न सांगता, त्या व्यक्तीबद्दल काहीही माहिती नसताना तुम्ही केवळ त्या व्यक्तीच्या शारीरिक लक्षणांवरून त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, तिच्या आयुष्यात महत्त्वाच्या काय घटना घडल्या असतील किंवा घडणार असतील जर ती व्यक्ती विश्वासास पात्र आहे काय, हे सविस्तर जाणू शकलात तर मजा येईल ना? शेवटी काय तर चमत्कारालाच नमस्कार असतो. असो! या अंगलक्षण शास्त्राला ज्योतिषीय भाषेत सामुद्रिक शास्त्र असे म्हणतात. हस्तरेखा शास्त्र, मुखलक्षण शास्त्र, तीळ विज्ञान. सर्व हे याच शास्त्राचे भाग आहेत. या लेखमालेचा उद्देश्य तुम्हाला केवळ तीळ बघून समोरची व्यक्ती कशी आहे, याचा अंदाज यावा हा आहे. सामुद्रिक शास्त्राचा इतिहास हा भारतीय अध्यात्म, ज्योतिष आणि मानवविज्ञानाचा एक अविभाज्य भाग आहे. हे शास्त्र प्राचीन काळात शरीराच्या अंगसौष्ठवावरून (Physical Features) व्यक्तीच्या स्वभाव, नशिब, आरोग्य व भविष्याचा अंदाज लावण्यासाठी वापरले जायचे. सामुद्रिक शास्त्राचे मूळ ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेदात सापडते. यात देहाच्या विविध अंगांतील चिन्हे, रचना व विशेष लक्षणांचा उल्लेख आहे. ‘अंगलक्षण शास्त्र’ हेच पुढे ‘सामुद्रिक शास्त्र’ म्हणून ओळखले गेले. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ वराहमिहीर यांनी बृहत्संहिता या ग्रंथात सामुद्रिक शास्त्राचा विस्ताराने उल्लेख केला आहे. या ग्रंथात पुऊष आणि स्त्रियांच्या शरीरावरील शुभ व अशुभ चिन्हांचे सविस्तर वर्णन आहे. इतकेच काय तर रामायणात, श्रीरामाचे शरीर 32 शुभ लक्षणांनी युक्त होते, असे वर्णन आहे. महाभारतात, विदुराने द्रौपदीच्या अंगाचे विश्लेषण केले होते. कुंतीने कर्णाच्या शरीराची ठेवण पाहून त्याचे राजवंशीय असणे ओळखले होते. अर्जुन, भीष्म यांच्यासारख्या पात्रांची रचना देखील सामुद्रिक शास्त्राच्या नियमांनुसार विश्लेषित करण्यात आली आहे. गौतम बुद्धांचे शरीर 32 महापुऊष लक्षणांनी युक्त असल्याचे मानले जाते. (दलाई लामा यांच्या वारसाचा शोध देखील शरीर लक्षणावरून पायात शंख, छातीवर सिंहचिन्ह, कपाळावर ज्ञानचिन्ह - ही चिन्हे बौद्ध सामुद्रिक परंपरेचा भाग आहेत.) थायलंड, तिबेट आणि श्रीलंकेत हे शास्त्र आजही वापरले जाते. ग्रीक तत्वज्ञ अरिस्टॉटल व रोमन विचारवंतांनीही हावभाव, चेहऱ्याचे लक्षण (physiognomy) याचा अभ्यास केला होता. या शास्त्राचा मूलभूत सिद्धांत अगदी सोपा आहे. शरीर ही आत्म्याची बाह्य अभिव्यक्ती आहे. आपण केलेल्या पूर्वजन्मीच्या कर्मांचे प्रतिबिंब आपल्या शरीरावर असते. त्यामुळे कपाळ, डोळे, चेहरा, चालण्याची पद्धत, वाणी, तीळ, हस्तरेषा ही सर्वच आपली अंतर्गत प्रकृती दर्शवतात. चला आता मूळ मुद्द्याकडे वळूया. शरीरावरील तीळ (ceesue/ Mole) पाहून भविष्य सांगण्याची विद्या ही प्राचीन भारतीय सामुद्रिक शास्त्राचा एक भाग आहे. याला ‘तीळशास्त्र’ (Moleoscophy / Mole Astrology) असेही म्हणतात. प्रत्येक तिळाचे ठिकाण, आकार, रंग व स्वरूप यानुसार व्यक्तीच्या स्वभाव, भविष्य, भाग्य, धन, विवाह, प्रवास, आरोग्य इत्यादी गोष्टींचा अंदाज वर्तवता येतो. तिळाद्वारे भविष्यवाणी करण्याचे मूलभूत तंत्र (Mole Prediction Techniques) खालील गोष्टींवर अवलंबून आहे.
- तिळाचे स्थान (Location of the Mole) : तीळ शरीराच्या कुठल्या भागावर आहे, हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. उदाहरणार्थ : डोळ्याजवळ तीळ - बुद्धिमान आणि आकर्षक स्वभाव. ओठावर तीळ - बोलके, लोकप्रिय, काव्यात्मक प्रतिभा. पाठीवर तीळ - संयमी, शांत, सुसंस्कृत. पायावर तीळ - सतत प्रवास करणारे.
- तिळाचा रंग (Color of the Mole) : गडद काळा तीळ - तीळ शुभ मानला जातो. जीवनात यशाचे संकेत. भुरट्या रंगाचा तीळ - मिश्र्र परिणाम. व्यक्ती संघर्षशील पण यशस्वी. लालसर तीळ - तात्काळ फळ देणारा, विशेषत: प्रेम व धनलाभ दर्शक. पांढरट तीळ - नकारात्मकता, आरोग्य व मानसिक अस्थैर्य.
- तिळाचा आका र(Size of Mole) : मोठा तीळ - प्रभावशाली घटना किंवा व्यक्तिमत्त्व. छोटा पण ठसठशीत तीळ - विशिष्ट गुण व कौशल्य दर्शवतो. फैलावलेला तीळ / अनेक तीळ - वेगवेगळ्या घटना व प्रभाव दर्शक.
- तिळाचे स्वरूप (Shape of the Mole) : गोलसर तीळ - सौम्य, शुभ, आकर्षणदर्शक. कोपऱ्याचा, त्रिकोणी तीळ - संघर्ष, चढउतार. रेषात्मक / चिरलेला तीळ - बदलते नशीब.
मेष
यश मिळेल. महत्त्वाच्या लोकांशी संपर्क वाढेल आणि नवीन संधी मिळतील. कौटुंबिक सौख्य टिकून राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक निर्णयात सावधगिरी बाळगा, गुंतवणुकीचे योग्य नियोजन आवश्यक आहे. आरोग्य उत्तम राहील, परंतु आहारावर नियंत्रण आवश्यक. आत्मविश्वास वाढेल, पण अहंकार टाळा. जुने मित्र भेटतील व काही धार्मिक कार्यात ऊची वाढेल.
उपाय : ‘ॐ घृणि सूर्याय नम:’ जप करा.
वृषभ
आर्थिक प्रगतीचे संकेत आहेत. व्यापार-व्यवसायात लाभदायक निर्णय घ्याल. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक होईल. कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या, विशेषत: पचनतंत्राशी संबंधित तक्रारी होऊ शकतात. प्रवासाचे योग संभवतात. जोडीदाराशी मतभेद संभवतात, संवादाने मार्ग काढा. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे.
उपाय : देवीला गुलाब अर्पण करा.
मिथुन
संमिश्र्र अनुभव येतील. कार्यात अपेक्षित यश मिळविण्यासाठी अधिक परिश्र्रम घ्यावे लागतील. नवे प्रकल्प सुरू करण्यापूर्वी नीट विचार करा. आर्थिक गुंतवणूक करताना शहाणपण दाखवा. घरात काही किरकोळ वाद उद्भवू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने अंगदुखी, थकवा जाणवू शकतो. प्रेमसंबंधात स्पष्टता ठेवा. मित्रांचे सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता वाढवावी.
उपाय : बुधवारी दुर्गा स्तोत्राचे पठण करा
कर्क
आरोग्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मानसिक अस्वस्थता जाणवेल, त्यामुळे ध्यान-धारणा करा. कौटुंबिक जीवनात संतुलन आवश्यक आहे. नोकरीत बदलाचे योग संभवतात. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. नवीन संधी मिळतील, परंतु त्यांचा विचारपूर्वक लाभ घ्या. विद्यार्थ्यांसाठी हे सातत्य राखण्याचे आव्हान असले तरी ते पूर्ण करतील. प्रेम जीवनात गोडवा येईल.
उपाय : सोमवारी पांढऱ्या फुलांनी शिव पूजन करा.
सिंह
आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातूनच यश प्राप्त होईल. आर्थिकदृष्ट्या लाभदायक काळ. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण सुखद राहील. सर्जनशील कामात यश मिळेल. प्रेम संबंध मजबूत होतील. वैवाहिक जीवनात गोडवा येईल. आरोग्याच्या बाबतीत विशेष काही त्रास नाही. मानसिक शांतता लाभेल. आध्यात्मिक कल वाढेल.
उपाय : रविवारी गूळ दान करा.
कन्या
कामाचा ताण जाणवेल. महत्त्वाच्या निर्णयात विलंब होईल. आर्थिक बाबतीत संयम बाळगा. नोकरीत स्पर्धा वाढेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्याच्या बाबतीत पचनावर लक्ष द्या. मानसिक तणाव दूर करण्यासाठी योग, प्राणायाम करा. प्रेमसंबंधात समजूतदारपणा ठेवा. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. धार्मिक कार्यात सहभाग होईल.
उपाय : बुधवारी हिरव्या रंगाचे वस्त्र दान करा.
तुळ
भाग्याची साथ लाभेल. नवी संधी येतील. नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत. आर्थिक प्रगती होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत उत्तम वेळ जाईल. आरोग्य उत्तम राहील. प्रेमसंबंधात प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात सन्मान मिळेल. मित्रमंडळींची मदत होईल. जुनी पेंडिंग कामे पूर्ण होतील. प्रवासाचे योग निर्माण होतील.
उपाय : शुक्रवारी लक्ष्मी पूजन करा व साखरेचे दान करा.
वृश्चिक
संयम ठेवावा लागेल. अचानक खर्च संभवतो. कार्यात विलंब होऊ शकतो. नकारात्मक विचार टाळा. कौटुंबिक वातावरण थोडे अस्थिर राहील. प्रेमसंबंधात मतभेद संभवतात. आरोग्यावर विशेष लक्ष द्या. जुने मित्र भेटतील. मानसिक स्थैर्य ठेवा. आत्मविश्वास टिकवणे गरजेचे आहे.
उपाय : मंगळवारी हनुमान चालीसा पठण करा व लाल वस्त्र दान करा.
धनु
महत्त्वाच्या निर्णयासाठी योग्य काळ आहे. आर्थिकदृष्ट्या लाभ मिळेल. नोकरीत कौतुक व सन्मान मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंध गहिरे होतील. प्रवासाचा योग आहे. आरोग्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. मानसिक समाधान मिळेल.
उपाय : गुरुवारी श्री सत्यनारायण पूजन करा किंवा गुऊ स्तोत्र पठण करा.
मकर
आर्थिक संधी मिळतील. नोकरीत जबाबदारी वाढेल. कौटुंबिक जीवनात समजूतदारपणा आवश्यक. आरोग्यावर थोडे लक्ष द्या. मानसिक शांतीसाठी ध्यान उपयुक्त. प्रेमात गोडवा राहील. सामाजिक मान मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल. आनंददायक क्षण येतील. कामात जबाबदाऱ्या वाढतील पण आपण योग्य पद्धतीने निभवाल.
उपाय : शनिवारी शनी मंदिरात तीळ दान करा.
कुंभ
कामात नवीन सुऊवात होईल. आर्थिक लाभाची शक्मयता. नोकरीत यश मिळेल. मानसिक शांततेसाठी ध्यान किंवा नामस्मरण उपयुक्त ठरेल. जुने वाद मिटतील. कौटुंबिक आनंद वाढेल. प्रेमसंबंध सुधारतील. आरोग्य चांगले राहील. मित्रांकडून सहकार्य मिळेल. नवीन कल्पनांना प्राधान्य द्या. अध्यात्मात ऊची वाढेल.
उपाय : शनिवारी काळ्या कुत्र्याला अन्न द्या व तेलाचा दिवा लावा.
मीन
मन शांत राहील. कार्यात यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या फायदा होईल. नोकरीत स्थैर्य मिळेल. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल. कुटुंबात सुसंवाद राहील. आरोग्य सुधारेल. जुन्या अडचणी दूर होण्याची शक्मयता आहे. मन प्रसन्न राहील व आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांसाठी प्रगतीचा काळ. प्रवासाचे योग आहेत.
उपाय : गुरुवारी पिवळे वस्त्र दान करा व केलेला संकल्प पाळा.