महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राशी भविष्य खजाना

06:05 AM Dec 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काउंट डाउन-1 (नव वर्ष प्रासंगिक)

Advertisement

नवीन वर्षासाठी नवे उपाय

Advertisement

नवीन वर्षात पहिली गोष्ट करा ती म्हणजे घरातील नको असलेले सामान, कपडे, मोडकी भांडी इ. घरातून बाहेर काढा. कोणत्याही मुलाखतीला जाण्यापूर्वी, पिठाचा गोळा बनवावा आणि त्यात थोडा गूळ भरावा. घराबाहेर पडताना गाय किंवा वासराला खाऊ घालावा. असे केल्याने नोकरी मिळण्याची शक्मयता वाढते. समाजात मान-सन्मान आणि नोकरी मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सूर्याला जल अर्पण करणे. दररोज स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात लाल फुले, लाल मिर्चीच्या बिया व कुंकू टाकल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. यामुळे तुमची प्रगती होते. खूप प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसेल तर रोज संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तसेच दिव्यात दोन पूर्ण लवंगा ठेवाव्यात. यामुळे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. इच्छित नोकरी आणि यश मिळविण्यासाठी, एका दिव्यांग व्यक्तीला अन्न द्या. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार काही खाद्यपदार्थही त्याला भेट देऊ शकता. असे केल्याने ग्रहदोष दूर होतात आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला होतो. लवकरात लवकर नोकरी मिळावी म्हणून तुम्ही चांदीची वस्तू तुमच्याकडे ठेवू शकता. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी गुळापासून बनवलेली मिठाई आणि काही गुळ वाहत्या नदीत प्रवाहित करावे. साधारण आठवडाभर किंवा महिनाभर असे केल्याने नोकरी मिळण्याची शक्मयता जास्त असते. मुलाखत देण्यापूर्वी एका लिंबावर चार लवंगा लावा आणि ‘ॐ श्री हनुमते नम:’ मंत्राचा 108 वेळा जप करा आणि नंतर लिंबू सोबत न्या. घराच्या उत्तर दिशेला आरसा लावा. जर तुम्ही बराच काळ बेरोजगार असाल आणि तुमचे सर्व प्रयत्न करूनही तुम्हाला अपयश येत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. नोकरीमध्ये यश मिळवण्यासाठी मंगळवारी हनुमान मंदिरात जा आणि तेथे सुगंधी तेलाचा दिवा लावा. तसेच हनुमानजींना शुद्ध तुपाचा चुरमा अर्पण करा. यानंतर, मंदिरात बसून ‘कवन सो काज कठिन जग माहीं जो नहीं होई तात तुम पाहीं’ या मंत्राने सुंदरकांड पठण करा. हा उपाय सलग 5 मंगळवार केल्याने तुमच्या नोकरीतील समस्या दूर होतील आणि तुम्हाला नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळेल. शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. तसेच संध्याकाळी या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शनिवारी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:’ चा 108 वेळा जप करावा. 5-7 शनिवार हा उपाय केल्याने तुम्हाला इच्छित नोकरीची संधी मिळेल. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल पण त्यात यश मिळत नसेल तर दररोज तांब्याच्या भांड्यातून अर्घ्य अर्पण करून सूर्याची पूजा करावी. सूर्याला पाणी देताना ‘ओम आदित्याय नम:’ या मंत्राचा जप करावा. तसेच रविवारी मिठाशिवाय अन्न खावे. हा उपाय 51 दिवस सतत केल्याने तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू लागते आणि सरकारी नोकरी मिळण्याचा मार्ग तुमच्यासाठी खुला होतो. आयुष्यात अनेक वेळा कुटुंब हसत-खेळत असताना त्यांच्यावर कोणाची तरी वाईट नजर पडते, त्यामुळे त्यांच्या आनंदाला ग्रहण लागते. आजकाल, जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत असेच काही घडत असेल, तर वाईट नजर दूर करण्यासाठी आणि आनंद परत आणण्यासाठी एक निश्चित उपाय आहे. ज्या व्यक्तीला वाईट नजर लागली आहे त्याला पूर्व दिशेला उभे करा आणि आपल्या उजव्या हातात मिठाई घेऊन ती डोक्मयापासून सात किंवा अकरा वेळा वाईट नजरेने पीडित व्यक्तीच्या पायाकडे फिरवा. ही क्रिया केल्यानंतर मिठाई कोणत्याही चौकात, निर्जन ठिकाणी किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. तिथे उतारा ठेवून परत आल्यावर मागे वळून पाहू नका. उताऱ्याचा हा उपाय केल्याने वाईट नजर किंवा वारा लगेच निघून जातो. कुत्र्याला बुधवारच्या दिवशी खाऊ द्यावा. याशिवाय रविवारी एका कापडात आठ तुळशीची पाने आणि आठ काळी मिरी बांधून गळ्यात काळ्या धाग्याने बांधल्याने बाहेरचा वारा तुम्हाला त्रास देणे थांबवतो. खरे तर चौकाचौकात ठेवलेल्या या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. तरीही अनेकवेळा आपण गाडी चालवताना किंवा चालताना लक्ष देत नाही आणि जर आपण त्या वस्तूला अडखळलो किंवा जाताना त्याचे उल्लंघन केले तर काहीतरी वाईट घडण्याच्या भीतीने आपले हृदय घाबरू लागते. अशा परिस्थितीत आपण काय करावे? जर तुमचा या सर्व गोष्टींवर विश्वास असेल तर तुम्ही थेट हनुमान मंदिरात जावे आणि हात पाय धुवून मंदिरात प्रवेश करावा. त्यानंतर तेथे उदबत्ती पेटवून हनुमान चालिसाचे पठण करावे. त्याला गूळ अर्पण करा आणि नंतर मंगळवारी किंवा शनिवारी तुपाचा दिवा लावून त्याची पूजा करा. या उपायाने तुमच्यावर आलेले संकट दूर होईल.

मेष

वर्षाची सुरुवात मस्त आहे. प्रसन्नता देणारे वातावरण तयार होईल आणि सहकार्यदेखील मिळेल. गुऊवार-शुक्रवार संघर्षमय स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. बुधवारी वेळ तुमच्या बाजूने असेल. तुम्हाला आईकडून भेट मिळण्याची शक्मयता आहे. तुम्हाला तुमच्या मुलांकडून अनुकूल साथ मिळेल. तब्येत सांभाळावी लागेल.

उपाय : गणपतीला तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवा.

वृषभ

वेळ चांगला जाईल. कामात गती येईल. विरोधक पाऊल मागे घेतील. शुक्रवारपासून कामाचा वेग वाढवावा लागेल. चारही बाजूने लाभाची स्थिती निर्माण होणार आहे. जुन्या प्रकरणामध्ये दिलासा मिळणार असून कर्जमुक्तीसाठी तुम्हाला योग्य मार्ग सापडेल. आजूबाजूच्या लोकांवर विसंबून राहू नका, धोका मिळेल.

उपाय : पाण्यात थोडे तीळ घालून आंघोळ करा.

मिथुन

तुमच्या राशीवर अजूनही शुभ ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला मुलांकडून सुख मिळेल. शत्रू पराजित होतील. शुक्रवारी आणि शनिवारी काही कालावधी त्रासदायक ठरण्याची शक्मयता आहे. उत्पन्नदेखील कमी होऊ शकते. अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. याच कालावधीत वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद होऊ शकतात.

उपाय : गरजूंना तीळ, तांदूळ, मोहरी दान करा.

कर्क

उद्यापासून वेळ तुमच्या बाजूने होईल. आर्थिक वाढीसह तुम्हाला सहकार्य मिळेल. मुलेदेखील अनुकूल असतील. तुम्हाला कामात चांगले यश मिळेल. तुमच्या सर्व योजना यशस्वी होतील. सहलींचे नियोजन केले जाऊ शकते. कौटुंबिक सहकार्य मिळेल. शनिवार व रविवारी तुमच्यावर शत्रूंची कारवाई होण्याची शक्मयता आहे. सांभाळा.

उपाय : पुजाऱ्याला तीळ व अत्तर दान करा. मंदिरात जा.

सिंह

तुमची महत्त्वाची असलेली कामे आजच आटोपून घ्या. शुक्रवार-शनिवार महत्त्वाची कामे टाळण्याचा प्रयत्न करा. अडचणी येण्याची शक्मयता आहे आणि उत्पन्नही कमी राहील. गुऊवारी वेळ तुमच्या बाजूने असेल. वादविवाद मिटतील आणि तुम्हाला भाग्याची साथ मिळेल तसेच विरोध संपेल. कामाच्या ठिकाणी वाईट बातमी कळेल.

उपाय : पांढरे तीळ, वस्त्र, तांदूळ दान करा.

कन्या

बुधवार-गुऊवार वगळता तुमचा वेळ चांगला जाण्याची शक्मयता आहे. उत्पन्न व अन्य प्रकरणात तुमची बाजू भक्कम राहील. शुक्रवारपासून शनिची दृष्टी संपेल. तसेच शनिची अडीच वर्षेही संपुष्टात येतील. तुमच्या समस्या मिटतील आणि नवीन काम करण्यासाठी उत्साह द्विगुणित होईल. कागदपत्रे हरवू नयेत याची काळजी घ्या.

उपाय : शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करा.

तूळ

चंद्राचे गोचर गुऊवारपर्यंत तुमच्यासाठी लाभदायक स्थिती निर्माण करेल. उत्पन्न आणि मदतीमुळे चांगली प्राप्ती होईल. अधिक कार्य कराल. शुक्रवार आणि शनिवारी तणाव निर्माण होण्याची शक्मयता आहे. वादविवाद निर्माण होण्याची शक्मयता आहे. तुमच्या चांगल्यासाठी दिलेला सल्ला बराच काळ लाभदायक ठरेल.

उपाय : पांढरे तीळ आणि गव्हाचे पीठ दान करा.

वृश्चिक

राशी स्वामी मंगळाचा गोचर आहे. सोमवारी आणि मंगळवारी फायदा होईल. पुढचे दिवसही चांगले जातील. प्रशासन आणि अन्य जणांकडून सहकार्य मिळेल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. शिक्षण-तंत्र आणि वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी शुभ काळ. चांगले परिणाम मिळतील. सुखद बातमी मिळेल. विविध प्रकारची कामे करण्याची संधी चालून येईल.

उपाय : पांढरे तीळ, मिठाई दान करा. मंदिरात जा.

धनु

दूरदृष्टी ठेवल्यास फायदा होईल. सोमवारी, मंगळवारी त्रस्त होऊ शकता. तुमचा वायफळ खर्च होण्याची शक्मयता आहे. तुमचा उर्वरित वेळदेखील चांगला जाण्याची शक्मयता आहे. जमीनजुमला, मालमत्तेतून फायदा होईल. व्यवसाय-नोकरीत काही चढ-उतार येतील. कामे बदलल्यास निराशा येईल. सहकार्य करणारे मागे फिरतील.

उपाय : पांढरे तीळ, राजगिरा दान करा. मंदिरात जा.

मकर

विचार न करता काम केल्याने त्रास होईल. एकच काम अनेक वेळा करावे लागेल. मोठ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. आठवड्याच्या मधल्या काळात त्रासातून मुक्ती मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल. पराक्रमात वृद्धी होईल आणि विरोधकांचा पराभव करण्याची शक्ती मिळेल. नव्या योजना कार्यान्वित कराल. नव्या संधी लाभ मिळवून देतील.

उपाय : पिठाचे दान लाभदायक ठरेल.

कुंभ

सप्ताहाच्या मध्यात धनलाभ होण्याची शक्मयता. मुले तुमच्या मनासारखे वागतील. मित्रांना भेटण्याची संधी येईल. आपल्या कार्यासाठी दुसऱ्यावर विसंबून राहणे कष्टदायक ठरेल. प्रवास लाभदायक ठरेल. उशिरा घेतलेल्या निर्णयामुळे हानी होऊ शकते. विचार करून गुंतवणूक करा. आरोग्याची समस्या उद्भवण्याची शक्मयता आहे. त्यासाठी जास्त खर्च येईल.

उपाय : पक्ष्यांना बाजरीचे दाणे टाका.

मीन

धनलाभ होईल. समस्यापासून दूर राहाल. मन प्रसन्न राहील. कार्ये वेळेवर पार पडतील. तसेच मोठ्या प्रकल्पांमध्ये चांगले यश मिळेल. निर्मितीसंबंधी प्रकरणात समस्या उद्भवू शकतील. दुसऱ्यावर अधिक विश्वास नुकसानकारक राहील. गुंतवणुकीसाठी वेळ योग्य नाही. तज्ञांचा सल्ला घ्या. स्थलांतरणाची शक्मयता आहे. पायांचा त्रास असेल.

उपाय : विष्णूला पांढरे तीळ अर्पण करा.

Advertisement
Tags :
#horoscope#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article