For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशी भविष्य खजाना

06:10 AM Jan 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
राशी भविष्य खजाना
Advertisement

बुधवार दि. 8 ते मंगळवार दि. 14 जानेवारी 2025 पर्यंत

Advertisement

धन प्राप्ती-संरक्षण-बरकतीसाठी यंत्रे

श्री दुर्गा यंत्र              श्री शक्ती बीसा यंत्र           श्री काली यंत्र

Advertisement

मेष

कोणत्याही बाबतीत घाई गडबड करून चालणार नाही. नुकसान होऊ शकते. या सप्ताहात आरोग्याबाबतचे अनिष्ट प्रकार आणि अन्य घरगुती प्रश्न यामुळे मन:स्तापाचे प्रसंग उद्भवण्याची शक्मयता राहील. मात्र नोकरी-व्यवसायात आपणास बऱ्यापैकी प्रतिसाद मिळू शकेल. आर्थिक बाजू सुधारू शकेल. मुलांकडून अपेक्षित प्रगतीचे संकेत मिळतील.

उपाय : गच्चीत कोळसे ठेवू नका.

वृषभ 

मन:स्ताप टाळावे, पुढे चालावे, असे ब्रीद वाक्मय ठेवावे. काही लोक कामात आडकाठी आणतील पण या काळत प्रगतीची वाटचाल करणारे पाऊल आपण टाकू शकाल. नव्या ओळखी आणि त्यातून मिळणारा प्रतिसाद यामुळे आर्थिक बाजू सावरता येईल. नोकरदारांना आपल्या हुशारीचा व कार्यकौशल्याचा प्रताप दाखविण्याची संधी प्राप्त होईल. प्रवासाचे योग येतील.

उपाय : गरजूंना बदाम वाटा.

मिथुन

आपले हित कुठे आहे ते ओळखूनच पुढे पाऊल टाकावे. भ्रम निर्माण करणारे ग्रहमान आहे. आपले ग्रहमान पाहता पुष्कळशा बाबतीत तडजोडीचे धोरण स्वीकारल्यास बऱ्याचशा गोष्टी साध्य करणे शक्मय होईल. पर्यायाने आपल्या संवेदनशील मनाला सुखकारक गोष्टी घडू शकतील. नोकरी-व्यवसायात अपेक्षित प्रतिसाद मिळू लागेल. वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग टाळा.

उपाय : ईशान्य कोपऱ्यात पाणी ठेवा.

कर्क

घरातील एखादी व्यक्ती बोलेल एक आणि करेल दुसरेच. त्यामुळे वातावरण बिघडेल. या काळात प्रकृतीबाबत सावधगिरी बाळगा. प्रकृतीची पथ्ये कटाक्षाने पाळा. कलाक्षेत्राला वाव मिळेल. आर्थिक बाजू उत्तमपणे सावरता येईल. थोरामोठ्यांचा सल्ला व मार्गदर्शन याद्वारे यशाच्या मार्गावर पुढे सरकता येईल. वैवाहिक जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल.

उपाय : शनिवारचा उपवास करा.

सिंह

तुमची स्वप्ने पूर्ण करण्याच्या संधी प्राप्त होण्याची शक्मयता आहे. या काळात आर्थिक व्यवहारात शहानिशा करून सखोलपणे विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे. सरकारची देणी त्वरित देण्याचा निर्णय घ्या. वरिष्ठांची नाराजी असू शकते, सामंजस्याने परिस्थिती हाताळा. क्रीडा क्षेत्रात आपली प्रगती करण्याची संधी मिळेल. वादाचे प्रसंग टाळा.

उपाय : तेल गरजूंना वाटा.

कन्या

येणाऱ्या काळात नोकरदार लोकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल असे दिसते. त्यात ग्रहांची अनुकूलता लाभणार असल्याने शुभ फळे मिळू शकतील. अनावश्यक खर्चावर योग्य नियंत्रण आणू शकलात तर आर्थिक वाटचाल सुखदायक होऊ शकेल. सामाजिक क्षेत्रात एखादा आविष्कार घडण्याची शक्मयता. प्रयत्नांना उत्तम प्रतिसाद मिळू शकेल.

उपाय : गणेश पूजन करा.

तूळ

आर्थिक बाजू स्थिर असेल. उच्च अधिकाऱ्यांशी विनाकारण वाद महागात पडू शकतो. स्थावरच्या बाबतीत होणारा वाद, विशेषत: भाऊबंदकीचा चालू असणारा प्रकार यामध्ये मध्यस्थी करून विषय थांबवा. व्यवसायातील बाबतीत अनेक गोष्टी शुभ ठरतील. आपण घेतलेले निर्णय, केलेली कृती व आपले स्वप्न यांना एका माळेत गुंफल्यास यशाकडे जाल.

उपाय : मद्य,मांस अजिबात सेवन करू नका.

वृश्चिक

तुमच्या कृतीमधून तुम्ही तुमचे इरादे जगाला दाखवाल. पण संयमाने व विचाराने वागा. काही अनपेक्षित गोष्टी घडण्याची शक्मयता राहील. कुठल्याही बाबतीत कृती आणि विचारांचे टोक गाठले जाणार नाही याची दक्षता घ्या. थंड डोक्मयाने व गोड बोलून केलेल्या कामात व्यावहारिक यश मिळू शकते. प्रवास, पत्रव्यवहार, गाठीभेटी याबाबत संयम राखा.

उपाय : गरजूंना चप्पल दान द्या.

धनु

तुमच्या अथक कामाचा डंका वाजेल. कौटुंबिक समस्या सुटू शकतात. सकारात्मक राहा. या काळात काही अनपेक्षित गोष्टी घडण्याची शक्मयता असल्याने त्यांना सामोरे जावे लागणार आहे. कामाच्या जागी वाद व स्वत:ची प्रकृती याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. आपल्याकडून चुका होणार नाहीत, याची दक्षता घ्या. नोकरी-व्यवसायात सक्रीय प्रतिसाद मिळू लागेल.

उपाय :  विहिरीत थोडे दूध ओता.

मकर

‘कभी खुशी कभी गम’ या प्रकारचा काळ आहे. या काळात एका बाजूला अनुकूलतेचे वारे वाहत आहेत तर दुसरीकडे हितशत्रूंच्या कारवाया, तेव्हा सावध राहा. महत्त्वाची कागदपत्रे जपा. आपली कामे काळजीपूर्वक करण्याचा प्रयत्न करा. यामुळे काम केल्याचे समाधान मिळू शकेल. आर्थिकदृष्ट्या फायद्याच्या गोष्टी घडण्याची शक्मयता आहे. तब्येत सांभाळा.

उपाय : काळे वस्त्र जवळ ठेवा.

कुंभ

या काळात आपल्या क्षमतांना घेऊन काही असामंजस्य स्थितीमध्ये येऊ शकता. यामुळे तुमच्यामध्ये आपल्या करिअरला घेऊन असुरक्षेची भावना पाहिली जाईल. या काळात तुम्ही जी मेहनत कराल, त्यानुसारच तुम्हाला चांगल्या व यशस्वी फळांची प्राप्ती होण्याची शक्मयता दिसत आहे. इतरांकडून अवाजवी अपेक्षा ठेवू नका, निराशा पदरी पडेल.

उपाय : रात्री दूध पिऊ नका.

मीन

‘कुणी ना येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला’ याची प्रचिती येईल. या काळात चांगल्या घटनांचे संकेत मिळू लागतील. आर्थिक क्षेत्रातील व्यक्तींनी मात्र कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घ्या. आपल्या कुटुंबातून अपेक्षित असा प्रतिसाद मिळू शकेल. घरात शुभकार्याचे पडघम वाजू लागतील. घरातील ज्येष्ठांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा.

उपाय : मजूर आणि गरिबांची सेवा करा.

Advertisement
Tags :

.