For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य! राशिभविष्य आणि भविष्यवेध

06:58 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य  राशिभविष्य आणि भविष्यवेध
Advertisement

 अंक म्हणे ज्योतिषाला. . .

Advertisement

(भाग-1: प्रस्तावना)

या लेखाचा उद्देश तुम्हाला तुमचा ‘कुआ’ नंबर म्हणजे अंकशास्त्रातील एका पद्धतीतील, तुमच्यासाठी लकी ठरणारा नंबर तुमचा तुम्हाला काढता यावा आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल करता यावे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल हा आहे. ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र भिन्न आहेत, तथापि, ते दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. ज्योतिषशास्त्र म्हणजे आकाशातील तारे आणि ग्रह यांचा अभ्यास आणि पृथ्वीवरील जीवनाशी त्यांचा संबंध, तर अंकशास्त्र म्हणजे संख्यांचा अभ्यास आणि संख्यांची स्पंदने जीवनाशी कशी जोडलेली आहेत याचा अभ्यास. या दोन्ही पद्धती कोणत्या ना कोणत्या प्रकारे भविष्याचा अंदाज लावण्यासाठी वापरल्या जातात, किंवा त्याऐवजी काही कालावधीत तुम्हाला अनुभवू शकणाऱ्या भावना आणि उर्जेबद्दल निर्देश देतात. चला . . या अद्भूत अंकशास्त्राच्या आकर्षक जगाचा शोध घेऊया. अंकशास्त्राचे सर्वात जुने रेकॉर्ड इजिप्शियन आणि बॅबिलोनियन संस्कृतींमधून आलेले आहेत, परंतु प्राचीन रोम, चीन, ग्रीस आणि जपानमध्ये देखील त्याच्या वापराची चिन्हे आहेत.

Advertisement

पायथागोरस, ग्रीक तत्त्ववेत्ता यांना आधुनिक अंकशास्त्राचे श्रेय दिले जाते, कारण त्यांनी संख्यांना नवीन स्तरावर नेणारे सिद्धांत विकसित केले. शाळेत पायथागोरसचे प्रमेय शिकला असालच ना? जर मी तुम्हाला म्हणालो की, पायथागोरसचे प्रमेय त्याचे नसून भारतीयांचे आहेत आणि पायथागोरस हा अंक ज्योतिषी होता तर तुम्ही मानाल? बौद्धायन (ख्रिस्तपूर्व 740 वर्षे) हा पायथागोरसच्या प्रमेयामागील मूळ गणितज्ञ असल्याचे म्हटले जाते. पायथागोरसचे प्रमेय खरेच पायथागोरसच्या खूप आधी माहीत होते आणि पायथागोरसच्या जन्माच्या किमान 1000 वर्षांपूर्वी भारतीयांनीच त्याचा शोध लावला होता! असेही म्हटले जाते की, पायथागोरस केरळच्या वेदशास्त्र शाळेमधून अंक गणित शिकला! संख्यांच्या नियमावर आधारित सर्वात प्राचीन ज्ञात पद्धतशीर पंथ पायथागोरियन्सचा होता. पायथागोरस हा एक ग्रीक होता जो ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात भरभराटीला आला होता. त्याच्या जीवनाबद्दल फारच कमी माहिती आहे, आणि खरे तर तो एक संमिश्र्र व्यक्तिमत्व असू शकतो, ज्याला त्याच्या अनुयायांनी अनेक वेगवेगळ्या लोकांच्या शोधांचे श्रेय दिले आहे. भूमितीतील पायथागोरियन प्रमेय खरोखरच त्यांनी शोधला होता की नाही, हे देखील माहीत नाही.

पायथागोरियन लोकांनी गूढ गुणधर्मांसह विशिष्ट संख्येची गुंतवणूक केली. संख्या 1 एकता आणि सर्व गोष्टींच्या उत्पत्तीचे प्रतीक आहे, कारण इतर सर्व संख्या 1 वरून पुरेशा प्रती जोडून तयार केल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ, 7 = 1 + 1 + 1 + 1+ 1 + 1 + 1. संख्या 2 स्त्री तत्त्वाचे प्रतीक आहे, 3 पुऊषाचे; ते  2 + 3 = 5 मध्ये एकत्र येतात. सर्व सम संख्या स्त्री होत्या, सर्व विषम संख्या पुऊष होत्या. क्रमांक 4 न्याय दर्शवितो. सर्वात परिपूर्ण संख्या 10 होती, कारण 10=1 + 2 + 3 + 4. ही संख्या गुणाकारातून उद्भवणारी एकता दर्शवते. शिवाय, ते अवकाशाशी संबंधित होते. एकच बिंदू 1 शी, एक रेषा 2 शी संबंधित आहे (कारण एका रेषेला दोन टोके आहेत), एक त्रिकोण 3 आणि स्पेस 4. अशा प्रकारे 10 सर्व संभाव्य स्पेसचे देखील प्रतीक आहे. पायथागोरियन लोकांनी नऊ स्वर्गीय पिंडांचे अस्तित्व ओळखले: सूर्य, चंद्र, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, बृहस्पति, शनि आणि तथाकथित सेंट्रल फायर! असो! तुम्हाला या शास्त्राचा कसा उपयोग करून घेता येईल, हे पुढच्या भागात सांगतो!!!

मेष

हा आठवडा कुटुंबासोबत चांगला घालवाल. आपल्या बोलण्याने सर्वाना आपलेसे कराल. तुमच्या बोलण्याचा इतरावर चांगला प्रभाव पडेल. पैतृक संपत्तीचा लाभ होण्याची शक्मयता आहे. आपण जर लेखन कलेमध्ये निपुण असाल किंवा लेखन कलेची आवड असेल तर आपल्या कलेचे चीज होईल असे वाटते. लेखन करत रहा. एकूण हा आठवडा आपल्याला सुखाचा जाईल.

उपाय: तहानलेल्याला पाणी द्या.

वृषभ

आपल्या भावंडासमवेत हा आठवडा चांगला जाईल असे वाटते. आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपले काम उत्तम होऊन आपले वरिष्ठ आपल्यावर खुश होण्याची शक्मयता आहे. आपल्या शेजाऱ्यांचे आपल्याला सहकार्य मिळण्याची शक्मयता आहे. नोकर चाकराचे देखील आपल्याला सहकार्य मिळेल. छोटा प्रवासही होण्याची शक्मयता आहे. पण प्रवास जपून करावा.

उपाय: घरातून बाहेर पडताना कपाळावर गंधाचा टिळा लावून बाहेर पडा.

मिथुन

आपल्या मातेच्या सहवासात आपला वेळ छान जाईल. मातेकडून आपण आपले लाड करून घ्याल. विद्यार्थी आपल्या विद्येत चांगले यश मिळवतील. वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्या दृष्टीने पावले उचलाल किंवा नवीन घर बांधण्याचा अगर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्या विचारांना चालना मिळेल. एकूण हा आठवडा आपल्याला छान जाईल.

उपाय: रोज तुळशीला पाणी घाला.

कर्क

संततीकडून काही चांगली बातमी समजेल. संततीच्या अथवा तुमच्या विद्येतील यशासंबंधीची बातमी कळेल. आनंदी रहाल. अचानक कुठून तरी धनलाभ होण्याची शक्मयता आहे. यामुळे आपल्याला आपल्या ईष्ट देवतेची उपासना करावीशी वाटेल. असे जर वाटल तर विचार करत बसू नका. ताबडतोब त्या बाबतीत कार्यरत व्हा. एकंदरीत हा आठवडा समाधानकारक जाईल असे वाटते.

उपाय: नामस्मरण करा.

सिंह

मन चिंती ते वैरी न चिंती हे विधान अक्षरश: खरे आहे. आपले मनच आपला पहिला शत्रू असतो. याचा पडताळा या आठवड्यात येण्याची शक्मयता आहे. मनालाही सांभाळा, आणि प्रकृतीला पण सांभाळा. नोकरीत असाल तर थोडी किरकिर संभवते. स्वतंत्र व्यवसायात असाल तर स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे त्याप्रमाणे कष्ट करण्याची तयारी ठेवण्याची गरज संभवते.

उपाय: हनुमान चालीसा वाचा.

कन्या

मन शांत ठेवा व सारासार विचार करण्याची बुद्धी ठेवा. जोडीदाराबरोबर किरकोळ खटके उडण्याचा संभव आहे. ते तेवढेच किरकोळच राहू द्या. स्वतंत्र व्यवसायात भागीदारीत असाल तर भागीदाराबरोबर समजुतीने घ्या. निष्कारण वाद वाढवायच्या भानगडीत पडू नका. एखादी विस्मरणात गेलेली अथवा हरवलेली वस्तू सापडण्याची शक्मयता आहे.

उपाय: नामस्मरणावर भर द्या.

तूळ

सासरकडून काहीतरी फायदा होण्याची शक्मयता आहे. कदाचित लॉटरी अगर गुप्त धन मिळण्याची सुद्धा शक्मयता आहे. पण लक्षात ठेवा ते धन मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या गैर मार्गाचा वापर कऊ नका. असे धन कधीही लाभत नाही. या उलट काहीतरी नुकसानच होऊ शकते. या आठवड्यात कोणतीतरी मानसिक चिंता सतावत रहाण्याची शक्मयता आहे. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

उपाय: घरात आलेल्या व्यक्तीला विन्मुख पाठवू नका. हातावर गुळाचा खडा तरी ठेवा.

वृश्चिक

धर्माचे काम करीत रहा. आज ना उद्या त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. तुम्हाला परोपकार करावासा वाटला, तर मनात कोणतीही शंका न आणता आपल्याला जमेल तशी मदत करा. पण योग्य ठिकाणी. दान सत्पात्री असावे. आपल्याला संतांचा सहवास घडण्याची शक्मयता आहे. त्यांचा आशीर्वाद अवश्य घ्या. घरातील वृद्धांचे आशीर्वाद मिळतील. त्यांची सेवा करा.

उपाय:रोज जवळच्या देवळात जाऊन देवदर्शन घ्या.

धनु

वडिलांचा आशीर्वाद व त्यांचे पुरेपूर सहकार्य मिळेल. आपल्या उद्योगधंद्यात भरभराट होण्याची शक्मयता दिसते. नोकरीत असाल तर पदोन्नती होण्याची शक्मयता आहे. आपले वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. आपला मान व प्रतिष्ठा वाढेल. आपल्या व्यवसायानिमित्त विदेशी जाण्याचाही आपण विचार कराल. कर्ज मिळविण्याच्या प्रयत्नात असाल तर थोड्या प्रयत्नाने काम होण्याची शक्मयता आहे.

उपाय: तहानलेल्याला पाणी पाजा.

मकर

या आठवड्यात समारंभात सहभागी होण्याची शक्मयता आहे. आपली भावंडे, नातेवाईक, मित्र परिवार यांच्या गाठीभेटी होतील. आनंदी रहाल. काही मौल्यवान वस्तूंची खरेदी, प्राप्ती होण्याची शक्मयता आहे. राजकारणात कार्यरत असाल तर निवडणुकीत सहभागी होऊन तिथे देखील यश मिळण्याची शक्मयता आहे. एकंदरीत हा आठवडा आपला आनंदात जाईल.

उपाय: महादेवाची उपासना करा.

कुंभ

खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य ठिकाणी खर्च करा. अपव्यय होत नाही ना, याचा शंभर वेळा विचार करा. वाहन अतिशय जपून चालवा. अपघात होण्याची शक्मयता आहे किंवा कोणत्यातरी अडचणीत सापडण्याचा संभव आहे. त्यामुळे स्वत:ला सांभाळण्याची नितांत गरज आहे. कोर्ट कचेरीच्या भानगडीत शक्मयतो पडू नका. त्याने मनस्तापाशिवाय हाती काही लागणार नाही.

उपाय: दत्त आराधना करा.

मीन

मनावर संयम ठेवा. महत्वाकांक्षा वाढण्याची शक्मयता आहे. सबुरीने घ्या. थोडी चिडचिड वाढण्याची शक्मयता आहे. कामामध्ये आपल्या बुद्धीचा कस लागेल. पण त्यात यश मिळण्याचीही शक्मयताही आहे. त्यामुळे जे काम हाती घ्याल ते सबुरीने आणि सामंजस्याने करा. बाकी हा आठवडा जोडीदारासमवेत छान जाईल. पण थोडा वाणीवर व मनावर संयम ठेवावा लागेल.

उपाय: कुलदेवतेची आराधना करा.

Advertisement
Tags :

.