राशिभविष्य अक्षरयात्रा
मेष
आकस्मिक मोठा धनलाभ होईल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. व्यापारात अपेक्षित प्रगती होईल. पण देवाणघेवाणीत सावध रहा आणि इतरांवर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. या काळात एखाद्या विद्वान व्यक्तीशी तुमचे संबंध येतील, भविष्यात या लोकांच्या मदतीने एखाद्या लाभदायक योजनेत सहभागी होता येईल.
रविवारी मीठ टाळा.
वृषभ
महिलांची ऊची धार्मिक कार्यात वाढेल. आठवड्याच्या अखेरीस एखाद्या शुभ किंवा धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. संततीसंबंधी एखाद्या मोठ्या समस्येवर समाधान होईल, त्यामुळे मानसिक शांती मिळेल. प्रेमसंबंधाच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल राहील. जोडीदाराप्रती प्रेम आणि सौहार्द वाढेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील.
गरजूला शिधा द्या.
मिथुन
आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहील. या आठवड्यात जीवनातील प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे लागणार आहे, अन्यथा अडचणींना तोंड द्यावे लागेल. आठवड्याच्या सुऊवातीला कामाचे ओझे जास्त राहील, त्यामुळे तुम्ही कुटुंबाला फारसा वेळ देऊ शकणार नाही. या व्यस्त काळात मित्रांचे पुरेसे सहकार्य मिळणार नाही.
घरातील जुने कपडे दान द्या.
कर्क
जमीन आणि घराशी संबंधित वाद चिंतेचे मोठे कारण बनेल. व्यापाराशी संबंधित लोकांना आठवड्याची सुऊवात फारशी चांगली नसेल, पण आठवड्याच्या अखेरीस काही अप्रत्यक्ष लाभ आनंदाचे कारण ठरतील. परीक्षा आणि स्पर्धेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवण्यासाठी कठोर परिश्र्रम करावे लागतील. प्रेमसंबंधात गैरसमजांना चर्चेतून सोडवा.
घरात ईशान्येला पाण्याचा लोटा ठेवा.
सिंह
जोडीदाराच्या आरोग्याबद्दल मनात थोडी चिंता राहील. आठवडा संमिश्र्र राहील. आठवड्याच्या सुऊवातीला कामकाजात काही अडचणी येतील, पण आठवड्याच्या उत्तरार्धात परिस्थिती तुमच्या बाजूने होताना दिसेल. आठवड्याच्या सुऊवातीला व्यवसायाच्या दृष्टीने दूरचा किंवा जवळचा प्रवास होईल. प्रवासात प्रकृती आणि सामानावर लक्ष ठेवा.
अन्नदान करा.
कन्या
या काळात विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. टार्गेटनुसार आणि कमिशन पद्धतीने काम करणाऱ्यांवर मानसिक तणाव आणि अस्वस्थता राहील. तुम्हाला अपेक्षित यश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. या काळात हंगामी आजारांबद्दल सावध राहावे लागेल. तुमची दैनंदिनी आणि खाण्यापिण्यावर विशेष लक्ष ठेवा.
केशराचा टिळा लाऊन कामाला जावे.
तूळ
उद्योगाचा विचार सध्या पुढे ढकलावा. आरोग्य ठीक राहील. जोडीदाराशी जुळवून घ्या. प्रकृती जपा. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य मिळू लागेल. वाहनांच्या वेगावर योग्य नियंत्रण ठेवा. नको त्या प्रलोभनात अडकू नका. आरोग्याबाबत काहीसे चढ-उतार संभवतात. ज्येष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. गोड बोलून आपला कार्यभाग साधण्याचा प्रयत्न करा.
काजळाची डबी जवळ ठेवा.
वृश्चिक
या काळात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने एखाद्या मोठ्या समस्येवर उपाय निघेल, त्यामुळे मन प्रसन्न राहील. प्रेमसंबंध दृढ होतील. आठवड्याच्या अखेरीस तुमचा जोडीदार तुम्हाला एखादी भेटवस्तू देईल. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. या आठवड्यात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. आठवड्याच्या सुऊवातीला मन उदास राहील.
पक्ष्यांना दाणे घाला.
धनु
नोकरदार लोकांच्या रोजगारांच्या साधनात काही अडचणी येतील तर दुसरीकडे व्यापाऱ्यांना त्यांच्या स्पर्धकांकडून कडवे आव्हान मिळेल. आठवड्याच्या मध्यावर काम जास्त राहील. या काळात अनावश्यक गोष्टींवर धावपळ झाल्याने वेळ वाया जाईल. वाहन चालवताना सावध राहा, मार लागण्याची भीती आहे. दुसऱ्याच्या मदतीने महत्त्वाचे काम होईल.
कानामागे काजळ लावा.
मकर
आर्थिक बाबतीत काळजी करण्याचे कारण नाही. नोकरदार महिलांना कार्यस्थळी आणि कुटुंबात संतुलन ठेवताना अडचणींना तोंड द्यावे लागेल. प्रेमसंबंधाच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल नाही. या आठवड्यात प्रेमसंबंधाचा दिखावा करणे, जगजाहीर करणे यापासून दूर रहा आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल.
तिळेल दान द्या.
कुंभ
वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी जोडीदाराला आवश्यक वेळ द्या. नोकरदार लोकांसाठी आठवड्याची सुऊवात फार शुभ राहील, या काळात पदोन्नती आणि आर्थिक लाभाचे योग आहेत. उच्चाधिकाऱ्यांशी संपर्क वाढतील. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील आणि धनसंचय वाढेल. आठवड्याच्या मध्यावर एखाद्या नवीन कामाची योजना बनवाल.
तुळशीचे पान जवळ ठेवा.
मीन
कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या माध्यमातून आनंद मिळेल. जमीन, घर यासंबंधी वादातील निर्णय तुमच्या बाजूने येतील. जर तुम्ही दीर्घकाळापासून जमीन किंवा संपत्ती विकत घेण्याचे नियोजन करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या प्रभावी व्यक्तीच्या संपर्कात याल, ज्याच्या मदतीने आर्थिक लाभाचे मार्ग प्रशस्त होतील.
वारुळाकडे साखर ठेवा.
विवाहात विलंब होत असल्यास हा उपाय शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारी केला जाऊ शकतो. यात मंदिरात गुरुवारी संध्याकाळी दोन हिरव्या वेलच्या, पाच प्रकारचे मिष्टान्न, शुद्ध तुपाचा दिवा आणि जल अर्पित केले पाहिजे. स्त्रियांनी पिवळे गुरुवार आणि पुरुषांनी शुक्रवार केले पाहिजे. म्हणजे केवळ पिवळ्या वस्तूंचे सेवन करावे.