For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य अक्षरयात्रा

06:10 AM Jan 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य अक्षरयात्रा
Advertisement

12-01-2025

Advertisement

मेष 

आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आपण आत्मविश्वासाने कामे कराल. नोकरी-व्यवसायात हाच आत्मविश्वास आपणास इतरांच्या पुढे नेऊन ठेवेल. आपल्या खर्चात थोडी वाढ होण्याची शक्मयता असल्याने आपण सावध राहून आर्थिक नियोजन करावे. प्राप्तीत सामान्य वाढ होईल. आपण काही नवीन वस्तूंची खरेदी सुद्धा करू शकाल. आठवड्याचा अखेर प्रवासास अनुकूल आहे.

Advertisement

सतत सत्य बोला.

वृषभ 

आठवड्याच्या सुरुवातीस पैशांची आवक उत्तम होईल. कुटुंबीयांच्या गरजांकडेसुद्धा लक्ष द्याल. कुटुंबातील आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागेल. त्यामुळे आपण खूश व्हाल. आपली प्रकृती सुद्धा चांगली राहील. नोकरी करणाऱ्यांना आपली मेहनत वाढवावी लागेल. आठवड्याच्या मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थी आपला अभ्यास सहजपणे करू शकतील.

हळदीचे दान करा.

मिथुन 

आठवडा मध्यम फलदायी आहे. नोकरी करणाऱ्यांना शासनाकडून एखादा मोठा लाभ होण्याची संभावना आहे. वरिष्ठ आपली प्रशंसा करतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपली प्रकृती चांगली राहिली तरी सुद्धा ताप येण्याची शक्मयता असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. आठवड्याच्या अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

दररोज मंदिरात देवदर्शनासाठी जा.

कर्क 

खर्चात थोडी वाढ होईल, जी आठवड्याच्या मध्यापर्यंत राहील. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात प्राप्तीत वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. योग्य वेळी आपण कामे पूर्ण करू शकाल, त्यामुळे आपल्या वेळेची बचत होईल. हा वाचलेला वेळ आपण इतर चांगल्या कार्यासाठी वापरू शकाल. व्यापारात प्रगतीसाठी काही नवीन लोकांचे सहकार्य घ्यावे लागेल.

अधर्माने वागू नका.

सिंह

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस प्राप्तीत जलदगतीने वाढ झाल्याने आपले मन प्रसन्न होईल. आठवड्याच्या मध्यास खर्चात वाढ होण्याची संभावना असली तरी आठवड्याची अखेर खूपच सुखद होईल. नोकरी करणाऱ्यांच्या कामात तटस्थता येईल. व्यापाऱ्यांना थोडे सावध राहावे लागेल. काही तांत्रिक अडचणी येतील.

शैक्षणिक संस्थेला दान द्या.

कन्या

हा आठवडा आपल्यासाठी नवीन आशा निर्माण करणारा आहे. आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर आपण कामात प्रगती करू शकाल. नको त्या वादात पडू नका. विद्यार्थ्यांना अभ्यासात सुखद परिणाम मिळतील. त्यांनी आपली मेहनत चालूच ठेवावी. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल असला तरी अखेरच्या दिवसात लांब पल्ल्याचा प्रवास करणे टाळावे.

गंगाजल प्राशन करा.

तूळ

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. नशिबाची साथ मिळाल्याने आपणास कार्यात यश प्राप्त होईल. आठवड्याच्या मध्यास नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाची गती वाढवतील. त्यामुळे त्यांची प्रशंसा होईल. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापारात नफा मिळविण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. खर्चात थोडी वाढ होईल. प्रकृतीत सुधारणा होईल.

तिर्थयात्रा करा.

वृश्चिक

आठवड्याचे सुरुवातीचे दिवस वगळता इतर दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्वान व्यक्तीची मदत होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. परंतु, कामातील व्यस्ततेमुळे एकमेकांचा सहवास कमी लाभल्याने दोघेही रागावण्याची शक्मयता आहे. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपण आपल्या संबंधांप्रती खूपच सकारात्मक राहाल.

पिंपळाचे झाड लावा.

धनू

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. खर्च कमी होतील. स्पर्धेत यशस्वी व्हाल. आपण विरोधकांवर मात करू शकाल. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. आपणास सरकारी नोकरी मिळण्याची किंवा नोकरीत उच्च पद मिळण्याची संभावना आहे. तेव्हा आपल्या हातून चूक होणार नाही, याची काळजी घ्यावी.

कुमारीकांची पूजा करा.

मकर

व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत व आपल्या कार्यास पुढे कसे घेऊन जायचे, याच्या बाबतीत अत्यंत गंभीर होतील. कामावर लक्ष केंद्रित केल्याने आपणास चांगले परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रतिकूल असल्याने त्यांचा कामात काहीसा गोंधळ उडेल. तेव्हा त्यांना काळजीपूर्वक आपली कामे करावी लागतील.

पुजाऱ्याला वस्त्र दान द्या.

कुंभ

मध्यम फलदायी आठवडा आहे. आपणास मुलांकडून चांगली बातमी ऐकावयास मिळेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन काळजीमुक्त असेल. त्यांच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील. व्यापाऱ्यांना आपल्या कामाप्रती खूपच जागरूक राहावे लागेल. दूरवरच्या ठिकाणाहून व्यवसायात लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. इतरांशी अति बोलू नये.

मातीच्या भांड्यात मध ठेवा.

मीन

आठवड्याच्या सुरुवातीस आपण काम व कुटुंब यात समतोल साधू शकाल. त्यामुळे आपणास दोन्ही ठिकाणी सुखद परिणाम मिळू शकतील. नोकरीत आपली प्रतिष्ठा उंचावेल. व्यावसायिकांना नवीन ऑफर मिळण्याची संभावना आहे. खर्चात कपात व प्राप्तीत वाढ होईल. कामाच्या ठिकाणी असलेले गुप्त शत्रू त्रास देतील. आठवड्याचे सुरुवातीचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

धार्मिक ग्रंथाचे वाचन करा.

वडाच्या झाडावर उठलेल्या मधमाशांच्या पोळ्यातील एखादा तुकडा मिळाला तर त्या तुकड्याला गंगाजलाने धुवावे, हळद आणि शेंदूर घातलेल्या डबीत तो तुकडा ठेवावा. कस्तुरीच्या वासाच्या अत्तराने पूजा करावी, याने घरातील संपत्ती अचल राहते.

Advertisement
Tags :

.