महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राशिभविष्य

06:12 AM Dec 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

29/12/2024 ते 4.1.2025

Advertisement

मेष

Advertisement

उत्तम अन्नाचे सुख मिळेल. मित्र आनंद देतील. महत्त्वपूर्ण आयोजन होण्याची शक्यता आहे. भेट मिळू शकते. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. स्त्राr पक्षाकडून सहयोग मिळेल. मनोरंजनावर खर्च होईल. व्यापार-व्यवसायात प्रगती होईल.

पिंपळ पान जवळ ठेवा

वृषभ

कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर काही विषयांवर संमती द्यावी लागू शकते. कौटुंबिक मुद्यांचे समाधान मिळेल. जर आपली इच्छा असेल तर दिवसा पाहिलेली आपली स्वप्ने खरी ठरू शकतात. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरीपेशा व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल.

अशोकाचे पान जवळ ठेवा

मिथुन

महत्त्वपूर्ण प्रश्नांचे निराकरण होईल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेली कामे पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. आपणास अधीर आत्मविश्वासाने परिपूर्ण वाटेल आणि कोणत्याही प्रतिस्पर्धी प्रयत्नासाठी किंवा एखाद्या अशा कार्यासाठी हा वेळ उत्तम आहे. ज्यासाठी बऱ्याच ताकदीची आवश्यकता आहे.

वीराण जागेत मध पुरा

कर्क

जर आपणास एखाद्या योजनेसाठी सहकार्य पाहिजे असेल तर असे सांगण्यास मागे-पुढे पाहू नका. आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम सामान्यपणे चालू द्या. गुप्त संबंधांकडून व्यापारसंबंधी चांगला सल्ला मिळू शकतो. निश्चितच आर्थिक योजनेमध्ये उन्नती होईल. गरजेच्या वेळी घरच्यांचा सहयोग मिळेल.

दही खाऊन कामाला जा

सिंह

जर आपणास एका कार्यात वाढ मिळाली तर इतर कार्यात अवनती होणे शक्य आहे. आपल्या आत्मविश्वासाचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न करा. अधिक श्रम करावे लागतील. व्यापार-व्यवसाय व आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. शत्रू पक्षापासून सावध राहा. धार्मिक भावना वाढेल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल सहकाऱ्यांबरोबर प्रतिष्ठा वाढेल.

सूर्याचा फोटो जवळ ठेवा

कन्या

जेव्हा इतर व्यक्ती आपल्याकडून वेळ मागतील त्यावेळी आपणास आपल्या इच्छेवर संयम ठेवणे आवश्यक असेल. जवळच्या नात्याचा आनंद घेण्यावर आपले चित्त एकाग्र करा. स्वार्थी बनू नका. प्रेम-प्रसंगात यश मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींसाठी कामात स्थिती सुखदायक राहील. व्यापार-व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल. कला जगातील व्यक्तींना लाभ मिळेल.

निराधाराला आर्थिक मदत करा

तूळ

लेखनसंबंधी विषयांमध्ये अनुकूल परिस्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळेल. एखाद्या सहकर्मी व्यक्तीची असामाजिक वागणूक आपल्या नोकरीत विघ्न घालेल. कार्यकुशल आणि विनम्र राहण्याचा प्रयत्न करा. पूर्वी केलेल्या श्रमाच्या फळाचा आनंद घेण्याची वेळ आहे. आपण आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकाल.

बेलाचे पान जवळ ठेवा

वृश्चिक

मित्रांचा अनुकूल पाठिंबा मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना कार्यस्थळावर पाठबळ मिळेल.  कौटुंबिक वातावरण सुखद राहील. आर्थिक प्रयत्नांमध्ये स्थिती अनुकूल राहील. सौंदर्याकडे आकर्षण वाढेल. विद्यार्थ्यांसाठी वेळ उत्तम. वाद-विवाद किंवा प्रतिस्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. विशिष्ट व्यक्तींच्या संपर्कात सहयोग मिळेल. आरोग्य उत्तम राहील.

औषधे दान करा

धनू

एखाद्या जिवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. चांगले भोजन व मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आनंदाची बातमी मिळेल.

अनाथालयात धान्य वाटा

मकर

आर्थिक बाबतीत काळ अनुकूल आहे. सामाजिक कार्यांमध्ये सहयोग अनुकूल राहील व मान-सन्मान वाढेल. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषजनक राहील. आर्थिक लाभ होईल. मान-सन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल. कामात एखाद्याचा सहयोग प्रगतीचे कारण बनेल. आर्थिक विषयांमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात पण काळजी करण्याचे कारण नाही.

स्मशानात नाणे टाका

कुंभ

मानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे. कौटुंबिक विषयांमध्ये सहयोग द्यावा लागू शकतो. आपणास ध्येय मिळविण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल.

कोहाळा दान करा

मीन

मित्र आनंद देतील. महत्त्वपूर्ण आयोजन होण्याची शक्यता आहे. भेट मिळू शकते. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. स्त्राr पक्षाकडून सहयोग मिळेल. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात प्रगती होईल. मित्रांना सहयोग द्याल.

तळलेल्या वस्तू दान द्या

तुमच्या शत्रूंचा (शत्रुत्वाचा) नाश करण्यासाठी शनिवारी रात्री 7 लवंगा घ्या आणि त्यावर तुमच्या शत्रूच्या नावाने 21 वेळा फुंका. दुसऱ्या दिवशी रविवारी या 7 लवंगा जाळून टाका. ही युक्ती सतत सात शनिवार करावी. या युक्तीने व्यक्तीचे वशिकरण देखील करता येते. या युक्तीने तुमचा शत्रूही शांत राहतो. (सावधान : चुकीच्या उद्देशाने हे करू नये)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article