कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राशिभविष्य अक्षरयात्रा

06:10 AM Aug 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दि. 31-8-2025 ते 6-9-2025 पर्यंत

Advertisement

मेष

Advertisement

The Chariot  कार्ड सूचित करते की, तुमच्या आयुष्यात प्रगतीचा वेग वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची नेतृत्वक्षमता उठून दिसेल. कुटुंबात एखाद्या सदस्यासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम बाळगा. अनेक दिवसांपासून अडकलेली एखादी योजना पूर्णत्वास जाईल. व्यवसायात नवीन भागीदारीची चर्चा होऊ शकते.

मंगळवारी लाल फळ गरिबांना दान करा.

वृषभ

The Empress  कार्ड येत असल्याने सर्जनशीलता आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात येणार आहे. घरात सजावट किंवा नूतनीकरणाचे काम होऊ शकते. आर्थिक स्थितीत स्थैर्य येईल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलतील. व्यावसायिक क्षेत्रात एखादा मोठा प्रोजेक्ट हाती घेण्याची वेळ आली आहे. महिलांना विशेष मान-सन्मान मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील.

गोड पदार्थांचा प्रसाद वाटा.

मिथुन

या आठवड्यात The Magician कार्ड सूचित करते की, तुमच्या कौशल्याचा योग्य वापर करून मोठे यश मिळवू शकता. नवीन कल्पना आणि योजना प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. व्यावसायिक क्षेत्रात तुमचे नाव पुढे येईल. संवाद कौशल्यामुळे लोक तुमच्या बाजूने येतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, पण अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

हिरव्या मूग डाळीचे दान करा.

कर्क

The Moon  कार्डामुळे या आठवड्यात भावनिक चढउतार जाणवतील. काही गोष्टींबाबत संभ्रम निर्माण होईल. महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. व्यवसायात एखाद्या व्यक्तीच्या चुकीमुळे नुकसान होऊ शकते, त्यामुळे सावध रहा. नोकरीत वरिष्ठांशी स्पष्ट संवाद ठेवा. घरगुती बाबतीत आईशी संबंधित जबाबदाऱ्या वाढतील. प्रवासाच्या योजनांमध्ये बदल होऊ शकतो.

चंद्राला कच्चे दूध अर्पण करा.

सिंह

या आठवड्यात The Sun कार्ड तुमच्यासाठी ऊर्जा, यश आणि आत्मविश्वास घेऊन आले आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीला भरघोस यश मिळेल. नोकरीत बढती किंवा सन्मानाची शक्यता आहे. व्यवसायात नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे. आर्थिक लाभ मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. प्रवासाचे योग असून ते फायद्याचे ठरतील.

गूळ-गव्हाचे दान करा.

कन्या

The Hermit कार्ड सूचित करते की, तुम्ही स्वत:कडे आणि तुमच्या आयुष्याच्या उद्दिष्टांकडे गंभीरपणे पहाल. एकांत आणि आत्मपरीक्षणाची गरज भासेल. नोकरीत कामाचा ताण कमी होईल, पण महत्त्वाचे निर्णय एकट्याने घ्यावे लागतील. व्यवसायात दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम वेळ आहे. आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल. कुटुंबातील सदस्यांकडून भावनिक आधार मिळेल.

बुधवारी हिरव्या वस्त्रांचा वापर करा.

तूळ

या आठवड्यात Justice  कार्ड सूचित करते की, कर्मफळाचा परिणाम तुम्हाला मिळणार आहे. नोकरीत तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. व्यवसायात न्याय्य निर्णय घेऊन विश्वास जिंकू शकाल. आर्थिक बाबतीत कर्ज फेडण्याची संधी येईल. घरगुती बाबतीत काही ताण असू शकतो, पण संवादाने तो मिटेल. प्रवासाचे योग आहेत. विद्यार्थ्यांनी शिस्त पाळावी.

दुधाचे दान करा.

वृश्चिक

या आठवड्यात Death कार्ड बदलाचे संकेत देते. काही जुन्या गोष्टी संपून नवीन सुरुवात होईल. नोकरीत जबाबदाऱ्यांमध्ये बदल संभवतो. व्यवसायात नवीन भागीदारीचा विचार होऊ शकतो. आर्थिक बाबतीत जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल. कुटुंबात मतभेद संभवतात, पण ते अल्पकाळ टिकतील. आरोग्याच्या दृष्टीने जुनी समस्या संपून सुधारणा होईल.

काळ्या वस्त्रांचे दान करा.

धनु

The Fool  कार्ड नव्या सुरुवातीचे संकेत देते. नोकरीत नवा प्रोजेक्ट मिळेल. व्यवसायात जोखीम घेतल्यास फायदा संभवतो, पण सावधगिरी बाळगा. आर्थिक बाबतीत थोडी अनिश्चितता राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रवासाचे योग उत्तम आहेत. विद्यार्थ्यांना नवीन शिक्षणाची संधी मिळेल. प्रेमसंबंधात नवीन ओळखी होतील. आरोग्याच्या दृष्टीने ऊर्जावान वाटेल, घर बदलण्याचा विचार होईल.

गुळ-हरभऱ्याचे दान करा.

मकर

या आठवड्यात The Emperor  कार्ड स्थैर्य आणि जबाबदारीची जाणीव करून देईल. नोकरीत वरिष्ठांचा विश्वास मिळेल. व्यवसायात नियंत्रण आणि शिस्त पाळल्यास प्रगती होईल. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. कुटुंबात तुमचे मत मान्य केले जाईल. प्रवासाची योजना यशस्वी ठरेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. प्रेमसंबंधात विश्वास आणि निष्ठा वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने स्नायू किंवा सांध्याच्या त्रासाची शक्यता आहे.

मंगळवारी हनुमानाला नारळ अर्पण करा.

कुंभ

या आठवड्यात ऊप एtar कार्ड आशा आणि प्रेरणा देईल. नोकरीत नवीन संधी येतील. व्यवसायात नावीन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन मिळेल. आर्थिक बाबतीत चांगला लाभ मिळेल. कुटुंबात शांतता आणि समजूतदारपणा राहील. प्रवासातून मानसिक समाधान मिळेल. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती किंवा सन्मान मिळू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक ताण कमी होईल.

गायीला गूळ खाऊ घाला.

मीन

या आठवड्यात The Star कार्ड भ्रम आणि भावना तीव्र करेल. नोकरीत गोंधळ टाळा, अफवांपासून दूर रहा. व्यवसायात निर्णय घेण्यासाठी वेळ घ्या. आर्थिक बाबतीत सावध रहावे. कुटुंबात गैरसमज संभवतात. प्रवास टाळावा. विद्यार्थ्यांना एकाग्रतेत अडथळे येऊ शकतात. प्रेमसंबंधात संशय टाळा. आरोग्याच्या दृष्टीने पचनासंबंधी तक्रारी संभवतात.

चंदनाचा टिळा लावा.

 

आर्थिक संपन्नतेकरता जायफळाचा बळी : हा उपाय मंगळवारी/शनिवारी करायचा असतो. घरातील नकारात्मक शक्तींमुळे/ वास्तू दोषांमुळे आर्थिक प्रगती थांबते. पैसा टिकत नाही. कुठे खर्च झाला याचा हिशोबच लागत नाही. अशा वेळी जायफळ घ्यावे. त्याला पाण्याने धुवावे. शेंदूर लावावा. उजव्या हातात अडकित्ता किंवा चाकू घेऊन ‘घरातील सगळ्या नकारात्मक शक्ती/बाधा नष्ट होवोत’ असे म्हणून ते जायफळ मधून फोडावे. एका पात्रात जायफळाचे तुकडे, लवंग आणि कापूर घराबाहेर जाळावा.

 

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article