For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य खजाना

06:01 AM Jan 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य खजाना
Advertisement

क्र.      विशेष                                                तारीख

Advertisement

  • शुभ दिवस     1,3,8,12,17,22,26,31.
  • अशुभ दिवस   7,9,10,11,14,16,20,30.
  • सण/ उत्सव/ विशेष तिथी      6-ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज पु. ति., 8-स्वामी स्वरूपानंद जयंती, 12-स्वामी विवेकानंद जयंती, 15-मकर संक्रांत,18-शाकंभरी नवरात्रारंभ, 25-शाकंभरी पौर्णिमा, गुरु पुष्यामृत योग, 26-प्रजासत्ताक दिन, 31-कोल्हापूर महालक्ष्मी किरणोत्सवारंभ.
  • अमावास्या/  पौर्णिमा  10-रात्री 8.12 नं.अमावास्या प्रारंभ ते 11-सायं.5.29 अमावास्या समाप्ती.                    24-रात्री 9.51 नं. पौर्णिमा प्रारंभ ते 25-रात्री 11.24 पौर्णिमा समाप्ती.
  • साखरपुड्याचे मुहूर्त दि. 2-दु. 12 ते 5, दि. 3, 4, 5, 6- दु. 12 प. दि. 8, 13, 17, 18-स.9.30 नं. दि. 27-दु. 1 नं, दि. 28-दु. 3.30 प.,दि. 30-स.9 नं, दि.31.
  • बारसे (नाव ठेवण्याचे) मुहूर्त दि.13,17,22,25,30,31-दु.12 पर्यंत.
  • जावळाचे मुहूर्त दि.17,18-स.9 नं.,दि.22,24-स.8 नं.,दि.25-11 नं.,दि.26-स.10 प.
  • भूमीपूजनाचे/ पायाभरणीचे मुहूर्त      दि.1.,दि.6-दु.12 प.,दि.13,20.,दि.25-स.11 नं.,दि.26,27.
  • गृहप्रवेशाचे मुहूर्त (व्यावहारिक मुहूर्त) दि.12,13,17,22,25-स.11 नं.,दि.26-10 प.,दि.31.
  • वास्तूशांतीचे मुहूर्त(व्यावहारिक)       दि.3-सायं.4 प.,दि.6-दु.12.29 प.,दि.8-स.7.21 ते सायं.4 प.,दि.13- सायं.4 प., दि.17-       सायं.4   प.,दि.22- सायं.4 प.,दि.25-स.10.33 ते  सायं.4 प.,दि.26-स.10.27 प.,दि.31- सायं.4 प.
  • व्यापार सुऊ करण्याचे मुहूर्त   दि.2,3,5,7,8,13,17,18,22,30.
  • वाहन खरेदीचे मुहूर्त    दि.3,8,17,22,31.
  • शेत जमीन/जागा/  प्रॉपर्टी/ फ्लॅट खरेदी साठीचे मुहूर्त  3, 17,22, 26,31
  • शेतीच्या कामांसाठी उपयुक्त दिवस    दि.1,दि.2-दु.12 ते 5, दि.3,4,5, दि.6-दु.12 प.,दि.7,8,17, दि.25-स.11 नं.,दि.28-दु.4.30 प.,दि.30-स.9 नं.,दि.31.
  • डोहाळे मुहूर्त   दि.3-दु.2.30 नं.,दि.18-स.9.30 नं.,दि.22, दि.26-स.10 प.,दि.31.
  • पंचक  दि.13-रात्री 11.35 ते दि.17-उ.रात्री 3.33 पर्यंत

मेष

हा आठवडा आपल्याला सांभाळून रहायला सांगतो आहे. नोकर चाकरांवर अति विश्वास ठेवू नका. नोकरीत समाधानकारक काम होईल. थंडीचे दिवस आहेत. तब्येत सांभाळून काम करा. वाणीवर संयम ठेवा. मनावर ताबा ठेवा. राग आवरा. काही गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत म्हणून राग मानू नका. 1 ते 10 अंक मोजा.

Advertisement

उपाय : गुरु आराधना करा.

वृषभ

जोडीदाराबरोबर हा आठवडा छान घालवाल. स्वतंत्र उद्योगात असाल तर प्राप्ती चांगली होईल. वाहन सुख मिळेल. नवीन वाहन खरेदी कराल. अथवा खरेदी करायचा विचार कराल. कोर्ट कचेरीची कामे चालली असतील त्यात यश प्राप्ती संभवते. किमान योग्य मार्ग तरी सापडेल. एखादी हरवलेली वस्तू अगर एखादी विस्मरणात गेलेली गोष्ट अचानक सापडण्याची शक्मयता संभवते.

उपाय : तहानलेल्या व्यक्तीला अगर प्राण्याला पाणी द्या.

मिथुन

प्रामाणिकपणे व सचोटीने काम करा. यश नक्की मिळेल. मन भरकटू देऊ नका. त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. अचानक कुठून तरी धनलाभ होण्याची शक्मयता आहे. पण त्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब नको. परिवारातील मंडळींची काळजी घ्या. गरिबांना मदत करा. त्यांचे आशीर्वाद घ्या. सदसद् विवेक बुद्धीने वागा.

उपाय- गरिबांना मदत करा.

कर्क

संतसंगतीचा लाभ घ्या. भाग्य उजळून निघण्याची शक्मयता आहे. परमेश्वराने दिलेल्या बुद्धीने सारासार विचार करून काम करा. यश नक्की मिळेल. आपल्या वडिलांचा आदर करा. त्यांचे आशीर्वाद अखंड लाभतील. तुमच्या हातून धार्मिक कृत्ये घडण्याची शक्मयता आहे, असा जर प्रसंग आला तर मागे हटू नका.

उपाय : दत्त उपासना करा.

सिंह

व्यापार उदीम चांगला चालेल. धनलाभ होण्याची शक्मयता आहे. नोकरीत पदोन्नती होण्याची शक्मयता आहे. वरिष्ठ आपल्या कामावर खूश होतील. कर्ज मिळवण्याच्या प्रयत्नात असाल तर मिळण्याची शक्मयता आहे. पण थोडे जास्त प्रयत्न करावे लागतील. व्यवसायानिमित्त प्रवास संभवतो. एकंदरीत हा आठवडा समाधानाचा जाईल.

उपाय : मुक्या प्राण्यांना खाऊ घाला.

कन्या

वडील भावंडांच्या भेटीचा योग संभवतो. किंवा त्यांच्याकडून काहीतरी फायदा अगर लाभ होण्याची शक्मयता आहे. मित्र परिवारांचे सहकार्य चांगले लाभेल. किमती वस्तू किंवा कपडे घ्याल. आपला हा आठवडा आनंदात जाईल असे दिसते. समाजात तुमचे कौतुक होईल. मान-सन्मान मिळेल. आनंदी रहा व दुसऱ्यांना आनंद द्या.

उपाय : गाईला  खाऊ घाला.

तूळ

पैशाचा व वेळेचा दोन्हीचा अपव्यय होणार नाही ना याची काळजी घ्या. कोर्ट कचेरीच्या कामात शांतपणे व सामंजस्याने घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. योग्य ठिकाणी खर्च करा. तब्येतीला सांभाळा. औषधासाठी खर्च झाला तर होऊ दे पण चैनीवर नको. थोडक्मयात उधळपट्टी नको. वाहन जपून चालवा. सांभाळून रहा.

उपाय : 11 मंगळवार गणेश दर्शन घ्या.

वृश्चिक

मन चंचल होण्याची शक्मयता आहे. मनाला आवर घाला. स्वत:कडे जास्त लक्ष द्याल. स्वत:चे व्यक्तिमत्व सुधारण्याकडे लक्ष केंद्रित कराल. कोणताही निर्णय घेताना जर द्विधा मनस्थिती होत असेल तर घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. थोडा वेळ घ्या. मन शांत ठेवा. जोडीदाराचा सल्ला घ्या.

उपाय: नामस्मरण करा.

धनु

या आठवड्यात आपल्या हातून काहीतरी दानधर्म होण्याची शक्मयता दिसते. कुटुंबासाठी वेळ काढाल. वडिलोपार्जित संपत्तीच्या संदर्भात घरामध्ये काही चर्चा, विचार विनिमय होण्याची शक्मयता आहे. शांतपणे चर्चा करा. आपल्याच कुटुंबीयांचे मन दुखावेल असे वागू, बोलू नका. वाणीवर संयम ठेवा. प्रेमाने प्रŽ सुटतील.

उपाय: गुरुची आराधना करा.

मकर

आपले मित्र, छोटी भावंडे यांच्या सहवासात आपला वेळ आनंदात व मजेत जाईल. नोकरीत आपले काम व आपल्या कामाच्या पद्धतीवर वरिष्ठ खूश होतील. आपल्या लिखाणाची पद्धत सर्वांचे लक्ष वेधून घेण्याची शक्मयता आहे. त्यामुळे लिखाणाकडे जास्त लक्ष द्या. रेल्वेचे छोटे प्रवास होण्याची शक्मयता आहे. त्याचा आनंद घ्या.

उपाय : शंकराची उपासना करा.

कुंभ

काही विशेष शिकत असाल तर त्यात यश मिळेल. नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर त्या दृष्टीकोनातून मार्ग सापडेल. किंवा त्या बाबतीत काही चर्चा घडण्याची शक्मयता आहे. थोडा विलंब झाला तरी चालेल पण काळजीपूर्वक निर्णय घ्या. मातेचे आशीर्वाद घ्या. त्यांच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका.

उपाय : हनुमान चालीसाचा पाठ करा. 

मीन

मन वढाय वढाय या बहिणाबाईंच्या उक्ती प्रमाणे मनाला कोणीही थांबवू शकत नाही, ते भरकटत कुठे कुठे जात असते. त्यातून माणसाला ते चुकीचा मार्गही दाखवते. म्हणून त्या मनाला वेसण घालायला हवी. फक्त मोठ्यांच्या बाबतीतच नव्हे तर लहान मुलांनाही हे लागू आहे. मग ती मोठी असोत अगर लहान. सांभाळा स्वत:लाही आणि मुलांनाही.

उपाय : कुलदेवतेची आराधना करा.

Advertisement
Tags :

.