राशिभविष्य अक्षरयात्रा
मेष
आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल नसल्याने कोणतेही दुखणे अंगावर काढू नये. आठवड्याच्या मध्याला काही संधी अशा मिळतील की, त्यांचा पुढे जाऊन भविष्यात फायदा होण्याची शक्मयता आहे. मंगल कार्यामध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. त्याकरता प्रवास करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी सगळ्यांवर अति विश्वास ठेवू नका.
जोडीदाराला सुगंधी फुले भेट द्यावी.
वृषभ
या आठवड्यामध्ये कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. घरात एखादे मंगल कार्य घडण्याची शक्मयता आहे. प्रेम संबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदाराची मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घाई गडबड करण्यापासून दूर रहा. चूक होऊ शकते. त्याचबरोबर कोणत्याही व्यक्तीबद्दल काहीही बोलण्याच्या भानगडीत पडू नका.
हिरवी काचेची गोटी जवळ ठेवावी.
मिथुन
या आठवड्यामध्ये द्विधा मन:स्थिती अनुभवायला मिळेल. शक्मयतो वाद टाळा. एका वेळी बऱ्याच लोकांचा सल्ला घेण्यापेक्षा एकाच योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. कामाच्या ठिकाणी अनपेक्षित बदल घडताना पहायला मिळतील. तुमच्या मागे तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न काही लोक करण्याची शक्मयता आहे. सावध राहा.
धार्मिक स्थळी नारळ ठेवावा.
कर्क
हा आठवडा कर्क राशीच्या लोकांकरता अत्यंत अनुकूल असण्याची शक्मयता आहे. जी कामे अडकली होती किंवा काही माणसांनी जाणून अडकवली होती ती कामे मार्गी लागतील. विशेष गोष्ट म्हणजे आरोग्य चांगले राहील. गेले काही दिवस आरोग्याच्या समस्या ज्या त्रास दिल्या होत्या त्या कमी होतील. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल.
लाल गाईची सेवा करावी.
सिंह
एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या वक्तव्याने तुमच्या मनाला त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी इतर लोकांच्या कुरापतीमुळे कामांमध्ये अडचण येण्याची शक्मयता आहे. अंतर्गत राजकारणाचा त्रास होईल. तब्येतीच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. विविध मंगल कार्यांमध्ये भाग घेतल्यामुळे पैसे जास्त खर्च होण्याची शक्मयता आहे.
गरजूला दूध दान द्या.
कन्या
या आठवड्यामध्ये सगळ्या बाजूंनी सावध राहणे गरजेचे असेल. आर्थिक बाबतीत चोख रहा. कामाच्या ठिकाणी इतरांनी केलेल्या चुकांचा परिणाम तुमच्यावर होण्याची शक्यता आहे. कोणत्याही विभागापासून दूर राहणे शहाणपणाचे ठरेल. आयुष्यातील नवीन संधी प्राप्त होतील. पण त्याकरता चांगल्या प्रकारच्या तयारीची गरज आहे.
जलचरांना खाणे घालावे.
तूळ
वैवाहिक जीवनामध्ये किंवा इतर नात्यांमध्ये काहीसा तणाव जाणवत असेल तर दुसऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा, समाधान मिळेल. आपल्या ध्येयाबद्दल चिंता करण्यापेक्षा त्याकडे जाण्याचा मार्ग शोधलेला बरा. जीवनातील महत्त्वाच्या व्यक्तीशी भांडण होण्याची शक्मयता आहे. करिअरच्या बाबतीत काहीसे असमाधान असेल.
पांढरा रुमाल जवळ ठेवावा.
वृश्चिक
इतरांना अनावश्यक कारणाकरता इम्प्रेस करायचा प्रयत्न करू नका, यामध्ये नुकसान होऊ शकते. या आठवड्यामध्ये तुमच्या इमेजला जपणे अत्यंत आवश्यक असेल. तुमच्या ओळखीचेच लोक तुमच्या बाबतीत काही अफवा पसरवू शकतात लक्ष असू द्या. एखादी समस्या भेडसावत असेल तर तज्ञ माणसाचा सल्ला कामी येईल.
अनाहूतपणे आलेल्या पाहुण्याला दूध-साखर द्यावी.
धनू
धनप्राप्तीसाठी हा आठवडा महत्त्वाचा असेल. काही नवीन प्रोजेक्ट किंवा काही नवीन कामे मिळण्याची शक्मयता आहे. निगोसिएशन्समध्ये सफलता मिळेल. ओळखीच्या एखाद्या माणसाच्या कामाकरता त्यामध्ये पडावे लागेल. यामध्ये वेळ आणि पैसा खर्च होऊ शकतो. पण पुढे जाऊन याचा फायदा होईल. स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष द्या.
वारुळाकडे पांढरे फुल आणि लाह्या ठेवाव्यात.
मकर
या आठवड्यामध्ये काहीशी संमिश्र्र फळे मिळण्याची शक्मयता आहे. कामाच्या ठिकाणी काही समस्यांना तोंड द्यावे लागेल. पण त्याचबरोबर घरच्यांच्या सहकार्यामुळे बऱ्याच समस्यांमध्ये समाधान मिळेल. अति भावनाशील राहाल तर आजूबाजूचे लोक तुमचा फायदा उचलू शकतात किंवा लहान सहान गोष्टींचे टेन्शन येऊ शकते.
केळीच्या झाडाखालील माती जवळ ठेवावी.
कुंभ
एक ना धड भाराभर चिंध्या, अशी परिस्थिती होऊ देऊ नका. ऑफिसमध्ये वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मत ऐकून काम केल्यास नुकसान होण्याची शक्मयता आहे. आपल्या मतावर ठाम रहा आणि आपल्या कामाशी मतलब ठेवा. काही जुन्या गोष्टी रिपीट होऊ शकतात. पैशांच्या बाबतीत काळजी करण्याचे कारण नाही.
गरजूला चप्पल दान द्या.
मीन
मनाची अवस्था काहीशी अस्थिर अशी असेल. कामांमध्ये डेडिकेटेडली मन लागण्याचे अवघड आहे. जे करतो आहे ते आपण का करतो आहे, अशी मन:स्थिती होईल. त्यामुळे ज्या प्रकारे रिझल्ट मिळायला हवे त्याप्रमाणे मिळणे अवघड आहे. पुढे येणाऱ्या खर्चाबद्दल चिंतेत असाल. गुऊवारी काही महत्त्वपूर्ण घटना घडू शकते.
मुंग्यांना साखर घालावी.
इंटरव्ह्यूसाठी जाताना मनात थोडे टेन्शन असते. आपण कितीही तयारी केलेली असली तरी मनात थोडी धाकधूक असते. अशावेळी कोऱ्या पाटल्या कागदावर खालील चिन्ह काढून खिशात ठेवून जावे.