For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य

06:22 AM Dec 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य
Advertisement

दि.01-12-2024

Advertisement

मेष

कामांच्या बाबतीमध्ये हे करू की ते करू अशी द्विधा मन:स्थिती होऊ शकते. याकरता योग्य व्यक्तीचा सल्ला कामी येईल. घरातील खर्च कमी करण्याचा विचार कराल. कुटुंबीयांशी मतभेद झाले तरी नाती दृढ होतील. काही प्रकरणांबद्दल मानसिक ताणतणावाची शक्मयता आहे. तुमच्या विश्वासातील व्यक्तीच्या पाठिंब्यामुळे तुम्ही अवघड परिस्थितीतून बाहेर याल.

Advertisement

तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यावे.

वृषभ 

तुम्ही करत असलेल्या कामांमधून फायदा होण्याची शक्मयता आहे. या आठवड्यामध्ये बुधवार-गुऊवार महत्त्वाचा ठरेल. काही महत्त्वाच्या बातम्या कळतील. ओळखीतून कामे मिळतील. प्रवासाला जावे लागू शकते. मित्रपरिवाराकडून सावध राहण्याचा इशारा आहे.

सवत्स गायीची सेवा करा.

मिथुन  

दुसऱ्यांनी केलेल्या चुकीचा फटका तुम्हाला बसू शकतो. याकरता जितके सावध राहता येईल, तितके सावध रहा. घरातील वातावरण समाधानकारक असेल. एखाद्या नातेवाईकाला मदत करावी लागू शकते. फोनवर महत्त्वाची बोलणी होतील. तुमच्या आसपासच्या लोकांमध्ये तुमच्याबद्दल असूया निर्माण होण्याची शक्मयता आहे.

आंघोळीच्या पाण्यात चमचाभर दूध घाला.

कर्क 

तुमच्या वागण्या-बोलण्याचा वेगळाच अर्थ लोक काढतील आणि त्यामुळे मन:स्ताप होईल. याकरता कोणाशीही बोलताना जपून बोलावे. नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या आवाजवी अपेक्षांना सामोरे जावे लागेल. या आठवड्यात कोणाकडूनही कर्ज घेणे टाळावे. कारण नंतर ते फेडायला जास्त कष्ट सोसावे लागू शकतात. काही योजना पूर्ण होतील. आर्थिक लाभ होईल.

काळा रंग वापरू नये.

सिंह

एखाद्या शुभ कार्याकरता नातेवाईकांचे आगमन होऊ शकते. हा आठवडा काहीसा बिझी असणार आहे. कामाचे प्रेशर आणि घरातील जबाबदाऱ्या त्यामुळे धावपळ होऊ शकते. तब्येतीची काळजी घ्यायला लागेल. प्रवास करत असताना महत्त्वाच्या कागदपत्रांना जपून ठेवावे. वैवाहिक जोडीदाराशी किरकोळ कारणावरून मतभेद होऊ शकतात.

गोड वस्तुचे दान करावे.

कन्या    

व्यावसायिकांना काही बाबतीमध्ये त्रास होऊ शकतो. तब्येत जरा सुधारल्यामुळे बरे वाटेल. आजूबाजूला काम करणाऱ्या लोकांपासून आपल्या मनातील गोष्टी लपवून ठेवलेल्या बऱ्या. संततीसंबंधी काही महत्त्वाचे निर्णय घेताना कुटुंबीयांशी चर्चा करणे आवश्यक ठरेल. पूर्वीचे केलेले पुण्य कर्म कामी येईल.

तांबूस गायीची सेवा करावी.

तूळ

या आठवड्यात तुम्हाला प्रत्येक स्तरावर फेरबदल करावे लागतील. तुम्ही धीर धरा आणि गोष्टींमध्ये त्यांच्या नैसर्गिक प्रक्रियेत हस्तक्षेप टाळा. आरोग्याबाबत जागरूक रहा, शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या कामातून अनपेक्षित आर्थिक लाभ मिळतील. जमीन, इमारती आणि वाहनांच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला नफा मिळू शकेल.

धार्मिक ठिकाणी तुपाचा दिवा लावा.

वृश्चिक

नोकरी-व्यवसायात पूर्ण मेहनत घेऊन केलेल्या कामात तुम्हाला लाभ मिळेल. तुमच्या भौतिक सुखसोयी वाढतील. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात सुख-शांतीचा अभाव राहील. तुमचे विरोधक आणि शत्रूंवर तुमचा प्रभाव राहील. नको तो विचार करणे किंवा अति विचार करणे टाळावे.

गंगाजल  जवळ ठेवा.

धनु

आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. विरोधकांवर विजय मिळवाल. काही लोक तुमच्या पाठीमागे काही कारस्थाने करू शकतात. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी वाटेल. सरकारी कामात तुम्हाला मदत मिळू शकते. न्यायालयीन निर्णय तुमच्या बाजूने असू शकतात. कौटुंबिक आनंदाचा अभाव आणि पालकांसाठी समस्या उद्भवू शकतात.

केसराचा  टिळा लावावा.

मकर

या आठवड्यात काहीसा आळस आणि काम करण्याच्या उत्साहामध्ये कमी जाणवेल. चिकाटीने कामे केल्यास तुमच्या परिश्र्रम आणि प्रयत्नांचे उत्कृष्ट परिणाम मिळवू शकता. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल. वरिष्ठ लोकांच्या मदतीने तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यवसायात व्यत्यय आल्याने मन अस्वस्थ होऊ शकते.

आवळ्याच्या झाडाची पूजा करावी.

कुंभ 

काही लोकांच्या संगतीमुळे मन:स्ताप होण्याची शक्मयता आहे, पण ही संगत टाळता येणार नाही. तुम्ही केलेल्या कष्टांचा चांगला परतावा तुम्हाला या आठवड्यात मिळेल. नोकरदार वर्गाला दुसऱ्यांकडून कामे करून घेत असताना त्रास होऊ शकतो. व्यावसायिकांना नवीन संधी प्राप्त करण्यासाठी प्रवास करावा लागेल.

तुलसी जल प्राशन करा.

मीन  

नोकरदारांना आणि व्यावसायिकांना दोघांनाही या आठवड्यामध्ये काही महत्त्वाची कामे उरकून घ्यावी लागतील. चांगल्या संधी प्राप्त होत आहेत, स्वत:च्या कृतीमुळे त्या घालवू नका. अति बोलणे टाळावे. लहान लहान चुका झाल्या तर त्या मोठ्या मनाने मान्य कराव्या. इतरांच्या चुका काढण्याच्या भानगडीत पडू नका. आर्थिक बाबतीमध्ये या आठवड्यात काही महत्त्वाची घटना घडू शकेल.

पिंपळाला पाणी घाला.

दर मंगळवारी आणि शनिवारी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ घालावे. सोमवारी चमचाभर दूध घालावे. बुधवारी तुळशीचे पान घालावे. गुऊवारी चिमूटभर हळद घालावी. शुक्रवारी  सुगंधी अत्तर घालावे. रविवारी जास्वंदीचे फूल घालावे.

Advertisement
Tags :

.