राशिभविष्य
अतक्मर्य... अद्भूत... अविश्वसनीय... चमत्कारिक... पण सत्य!!!
भाग 3: विषय प्रवेश
‘आपणासी जे जे ठावे ते ते दुसऱ्यासी सांगावे । शहाणे करून सोडावे सकळ जन...’ समर्थांनी सांगितल्याप्रमाणे हातचे काहीही न राखता हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आपले दुर्भाग्य हे की, ज्यांना या सगळ्या गोष्टी माहिती होत्या त्यांनी समाजापर्यंत या पोहोचवायचे कष्ट घेतले नाहीत. असो. मागच्या लेखात आपण नाक कसे काम करते हे पाहिले. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक वस्तू 2 रूपात व्यक्त होते. स्थूल आणि सूक्ष्म. जी हवा आपण श्वासाद्वारे घेतो तिचे सूक्ष्म रूप म्हणजे प्राण आणि प्राण ही अद्वितीय शक्ती आहे. स्वरयोग ही आपल्या प्राचीन विद्वानांची अद्वितीय देणगी आहे. हे एक आश्चर्यकारक आणि चमत्कारिक विज्ञान आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार, भगवान शिव वेगवेगळ्या शैलीचे जनक मानले जातात, जे भगवान शिवाद्वारे माता पार्वतीच्या विनंतीवरून प्रथमच प्रकट झाले त्यालाच शिव-स्वरोदय-स्वर-विज्ञान असेही म्हणतात. त्यात सांगितल्याप्रमाणे जर आपण आपली कामे केली तर कामे निश्चितच यशस्वी होतात, यात संशयाला जागा नाही. किंबहुना, जगाच्या पटलावर यासारखी दुसरी साधना नाही हे एक अकाट्या सत्य आहे. ही एकमेव साधना आहे ज्यामध्ये सिद्धी प्राप्त केल्यानंतर, साधक क्षणात भविष्य आणि वर्तमान बदलू शकतो, आणि अल्पावधीत त्याच्या दु:खापासून आणि असाध्य रोगांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करू शकतो. साधारणपणे एक व्यक्ती प्रति मिनिट 13 ते 15 श्वास घेते आणि 24 तासात अंदाजे 21,600 श्वास घेते. श्वास घेण्याच्या या प्रक्रियेद्वारे व्यक्तीचे वय निश्चित केले जाते. एखाद्या व्यक्तीने श्वासोच्छ्वासाचे प्रमाण जितके कमी केले तितके त्याचे आयुष्य मोठे होते. यामुळेच आपण प्राणायामाला खूप महत्त्व देतो. त्यामुळे योग आणि साधनेमध्येही प्राणायामाला अत्यंत महत्त्व दिले जाते. (इथे एक गोष्ट सांगतो की हे शास्त्र म्हणजे प्राणायाम नाही) कदाचित आपण या कार्याकडे विशेष लक्ष देत नाही, परंतु या शास्त्राचा साधक असलेल्या व्यक्तीला आपल्या श्वासोच्छ्वासाचा वेग किती अनाकलनीय आणि आश्चर्यकारक आहे हे माहीत असते. हे एक असे शास्त्र आहे ज्याद्वारे प्रत्येक कृती सुख-दु:ख, रोग, आजार-दु:ख इत्यादींची आगाऊ माहिती मिळू शकते. प्रस्तुत लेखमालेद्वारे स्वरांच्या हालचालीचे नियम, त्यांच्या हालचालीचा कालावधी, त्यांचा वेग जाणून घेण्याची पद्धत, स्वरांशी संबंधित पाच घटक, येणारे रोग-दु:ख, सुख-दु:ख, भविष्यातील ज्ञान आणि प्रश्न-उत्तर पद्धती सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न सादर केला आहे, संपूर्ण विश्लेषण आणि योग्य ज्ञान सादर केले आहे. माझा प्रयत्न आहे की, तुम्हाला या विज्ञानातील आवश्यक नियम आणि त्याद्वारे होणारे चमत्कार यांचा लाभ घेता येईल. शिवस्वरोदय हा एक प्राचीन तांत्रिक ग्रंथ आहे. हे पुस्तक शिव आणि पार्वती यांच्यातील संवादाच्या रूपात आहे. त्यात एकूण 395 श्लोक आहेत. 1983 मध्ये सत्यानंद सरस्वतींनी त्यावर ‘स्वर योग’ नावाचे भाष्य लिहिले होते, पार्वतीने भगवान शिवाला विचारले की, हे भगवान! सर्व यश मिळवून देणारे ज्ञान मला सांगा, हे विश्व का अस्तित्वात आले, कसे अस्तित्वात आले आणि त्याचा नाश कसा होतो? हे देवा, प्रपंचाचा निर्णय सांगा. महादेव म्हणाले, ‘तत्त्वाद् ब्रह्माण्डमुत्पन्नं तत्त्वेन परिवर्त्तते। तत्त्वे विलीयते देवि तत्त्वाद् ब्रह्माण्डनिर्णय:।।’ निराकार भगवान महादेवापासून आकाशाचा जन्म झाला, आकाशातून वायूचा जन्म झाला, वायूपासून अग्निचा जन्म झाला, अग्निपासून पाण्याचा जन्म झाला आणि पाण्यापासून पृथ्वीचा जन्म झाला, यातूनच विश्वाची निर्मिती झाली आणि शेवटी सर्व काही तत्त्वांमध्ये विलीन झाले. पुढे देवाधिदेव सांगतात, ‘मानवी शरीर या पाच तत्त्वांनी बनलेले आहे आणि हे पाच तत्त्व सूक्ष्म रूपात शरीरात आहेत. हे पाच तत्त्व वाणीच्या उदयामध्ये समाविष्ट आहेत, सर्व ज्ञानांमध्ये वाणीचे ज्ञान श्रेष्ठ आहे. हे देवी, वाणीत संपूर्ण वेद आणि शास्त्रs विराजमान आहेत, वाणीत उत्कृष्ट गायन ज्ञान आहे, वाणीत संपूर्ण त्रैलोकी आहे, वाणी हेच आत्म्याचे रूप आहे. ब्रह्मांड, शरीर इत्यादी खंड आणि शरीरे केवळ आवाजाने बनलेली आहेत. जगाचा निर्माता महेश्वर हे देखील वाणीचे दृश्य स्वरूप आहे. ज्याला या शास्त्राची माहिती आहे तो माझ्या कृपेचा भागीदार आहे. यापेक्षा चांगले ज्ञान पाहिले किंवा ऐकले नाही.’
(क्रमश:)
महाउपाय : घरामध्ये अशांतता असेल, सणावाराच्या दिवशी किंवा मंगल कार्य असेल तेव्हा घरात भांडणे होत असतील, काही केल्या यश मिळत नसेल तर बुधवारी बारा चिंचोके पिंपळाच्या झाडाखाली पुरावेत. पुरत असताना आपली ही जी समस्या आहे ती सुटण्यासाठी प्रार्थना करावी. असे पाच बुधवार करावे.
छोटी वास्तू टिप : अशोक स्तंभ (ऑनलाईन मिळतात) घ्यावे. एक दक्षिण पश्चिम दिशेला एक उत्तर-पूर्व दिशेला आणि एक उत्तरेला ठेवावा. सरकारी कामांमध्ये यश मिळते. नोकरीची समस्या दूर होते.
मेष
होता होईल तोवर आपल्या कामांबद्दल गुप्तता बाळगावी. कारण गुप्तशत्रू अडथळे आणू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तुमच्या या पदोन्नतीवर काहीजण ईर्ष्याही करतील आणि त्याच्याशी तुमचे भांडणही होऊ शकते. चांगल्या परिणामांची गती कायम ठेवण्यासाठी तुम्हाला अपार मेहनत करावी लागेल.
उपाय : हिरव्या रंगाचा जास्त वापर करू नका.
वृषभ
या महिन्यात बदलत्या ऋतुमानानुसार आपली तब्येत बिघडू शकते. दूरचे नातेवाईक आपल्याकडे येऊ शकतात. आपली जराशी बेपर्वाई आपल्याला हानीकारक ठरू शकते. शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांची अभ्यासात आवड वाढू शकते. प्रेम संबंध मजबूत होतील. व्यापारात लाभ आणि पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील. वैवाहिक जीवनात वादावादी संभवते.
उपाय : वटवृक्षाला पाणी घाला.
मिथुन
ही वेळ निव्वळ योजना आखण्याची नाही तर त्यावर अंमलबजावणी करण्याची आहे. अचानक एखाद्या दूरवरच्या प्रवासाला जाऊ शकता. जीवनात नवा आनंद प्राप्त होणारच आहे, खुल्या मनाने त्याचे स्वागत करा. एकाग्रचित्ताने काम करा, यश नक्की मिळेल. शत्रू तुमचे नुकसान करण्यासाठी टपून बसले आहेत, सावध रहा. परिवारात नवा आनंद येणार आहे.
उपाय : दुर्गा पूजा करा.
कर्क
कुटुंबीयांना नाराज करू नका, नाहीतर होत असलेली कामे होणार नाहीत. एखाद्या गरजूला मदत केल्यास तुमच्या मनाला सुख-शांती लाभेल. स्पर्धेची तयारी करत असाल तर यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. सांधेदुखी होऊ शकते. व्यापारात नफ्यात घट होईल. मित्रांचे वागणे साहाय्यकारी ठरेल. पत्नीचे स्वास्थ्य चिंताजनक राहू शकेल. दीर्घ प्रवास थकवणारे ठरतील.
उपाय : आईचा आशीर्वाद घ्या.
सिंह
शत्रुंची नजर तुमच्या सफलतेवर आहे आणि तुमच्या क्रोधामुळे त्यांचे काम सोपे होऊ शकेल. गुप्त गोष्टी कोणालाही सांगणे टाळा. अपत्याची चिंता सतावेल. कौटुंबिक जीवनात उलथा-पालथ होऊ शकेल, सावध रहा. यासोबतच प्रापंचिक आणि कौटुंबिक पातळीवरही समस्यांशी चार हात करावे लागू शकतील. कुटुंबातील सदस्यांसोबत कुठल्याही वादात पडणे टाळा.
उपाय : धार्मिक अनुष्ठान करा.
कन्या
राजनैतिक संबंधांचा लाभ होईल. व्यापाराच्या नव्या योजना लाभ देतील. शत्रू तुम्हाला त्रास देण्याची संधी शोधत आहेत, दक्ष रहा. आई-वडिलांकडून साहाय्य मिळेल. अपत्याचे स्वास्थ्य चिंतेची बाब ठरेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागणार नाही. नव्या जबाबदाऱ्या तुमच्यावर मानसिक दबाव टाकू शकतात. काही पाहुणे तुमच्या घरी येऊ शकतात.
उपाय : जुगार इत्यादी खेळणे पूर्णत: टाळा.
तूळ
या काळात ऐकावे जनांचे व करावे मनाचे असे रहा. एखाद्या पारिवारिक कार्यक्रमात जाणे होऊ शकते. कोणीतरी आपल्यावर मोठी आस बाळगून आहे, कृपया त्या व्यक्तीला निराश करू नका. अपत्यांचे वागणे प्रसन्नता देईल. जीवनात उत्साह आणि आशा कायम राहील. 23 तारखेनंतर काही आर्थिक समस्या येऊ शकतात. शत्रू आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतील.
उपाय : रात्री दूध पिऊ नका.
वृश्चिक
लाभदायक काळ आहे. नव्या योजना बनवाल. मित्र प्रत्येक अडचणीत तुमची साथ देतील. सासरच्या लोकांकडून साहाय्य मिळेल. आर्थिक बाजू ठीक राहील. कॉम्प्यूटर व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी वेळ चांगली असणार आहे. शत्रूंची प्रत्येक चाल अयशस्वी ठरेल. वाहन चालवताना अति दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. मद्यपान व व्यसने टाळा.
उपाय : मंदिरात जाण्याचा परिपाठ ठेवा.
धनु
तुम्ही आपल्या कुटुंबाबाबत फार दिवसांपासून त्रस्त आहात, त्या समस्येचा अंत होईल. भविष्यात होणाऱ्या मांगलिक कार्यांचे योग जुळत आहेत. कायदेशीर अडचणींवर तोडगा मिळेल. राजनैतिक संबंधांचा फायदा होऊ शकतो. जोडीदाराचे पूर्ण साहाय्य प्राप्त होईल. स्वास्थ्य उत्तम राहील, जोडीदार आणि मित्रांचा सहयोग प्राप्त होईल. परिवारात सुख-शांती राहील.
उपाय : चांदीचा तुकडा कपाटात ठेवा.
मकर
काळ बदलत आहे. पण लक्षात असू द्या की, प्रगतीच्या झाडावर फळे मेहनतीचे पाणी पाजल्यावरच येतात. मित्र तुमच्यासाठी सावलीसारखे काम करतील. नवे वाहन तुमच्या आनंदात भर टाकेल. स्त्रियांनी आणि वृद्धांनी आरोग्याची काळजी घ्यावी. जोडीदार पूर्ण सहकार्य करेल. महिना-अखेरीस परिस्थिती सामान्य होईल. व्यापारी वर्गाला फायदा होण्याची आशा आहे.
उपाय : तीर्थयात्रा करा.
कुंभ
हितचिंतकांचे योग्य मार्गदर्शन राहील. हा महिना येणाऱ्या जीवनाची दिशा ठरवणारा आहे. विचार करून निर्णय घेणे योग्य होईल. नवा व्यवसाय सुरू करताना मित्रांची मदत घेतल्याने फायदा होईल. स्त्रियांसाठी खूप चांगली वेळ आहे. अधिकाऱ्यांशी संबंधांचा फायदा होईल. नोकरदार लोकांसाठी सामान्य वेळ आहे. आरोग्याची काळजी घ्या.
उपाय : मांसाहार करू नका.
मीन
लक्षात असू द्या वाणीच मित्र आणि शत्रू बनवते, म्हणून तिचा वापर विचारांती करा. स्त्राr वर्गासाठी हा महिना फारच शुभ आहे. शत्रुच्या गुप्त कारस्थानांपासून सावध राहण्याची गरज आहे. तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे निकाल उत्तम असतील. मित्रांसोबत मिळून नव्या कामाची सुऊवात करू शकता. नोकरीतही आपल्याला पदोन्नती मिळू शकते.
उपाय : केशराचा टिळा कपाळावर लावा.