महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राशिभविष्य

06:10 AM Nov 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष

Advertisement

येणाऱ्या सप्ताहात आपण आपल्या स्वकर्तृत्वावर भर देण्याचा प्रयत्न केल्यास बऱ्याच गोष्टी साध्य करता येतील. सर्व दृष्टीने प्रगती करता येईल, आर्थिक बाजू सावरता येईल. भावनेपेक्षा कर्तव्याबाबत अधिक लक्ष देणे योग्य राहील. आपल्या शब्दाला मान दिला जाईल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. बौद्धिक क्षेत्राला चांगला वाव मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती करता येईल.

Advertisement

कुत्र्याला चपाती घाला.

वृषभ

आर्थिक व्यवहारात सावध रहा. प्रकृतीस्वास्थ्याबाबत अधिक दक्ष रहा, विशेषत: वातावरणातील बदलामुळे होणाऱ्या आजारापासून सावध रहा. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. आर्थिक देवघेवीबाबत विशेष लक्ष देणे हितकारक ठरू शकते. कलाक्षेत्राला चांगला काळ असून, विरोधकांच्या हालचालींवर कडक नजर ठेवा, त्यांना कोणतीही संधी देऊ नका.

गरजूला वस्त्र दान द्या.

मिथुन 

महिलांना त्यांच्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. या सप्ताहात आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगल्यास आपण आपले उद्दिष्ट गाठू शकाल. प्रकृतीमान ठीक असले तरी खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, विशेषत: उष्णतेच्या विकाराबाबत दक्ष रहा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. नोकरदारांना दिलासा मिळेल. वैवाहिक जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल.

मुंग्यांना साखर घाला.

कर्क

केवळ दिवास्वप्न पाहण्यापेक्षा कृतीवर भर द्या. आश्वासने देण्याअगोदर त्यांचा सगळ्या बाजूने विचार करून कृती करणे हितकारक ठरू शकते. मोठी आर्थिक गुंतवणूक करणे सध्या टाळणे योग्य राहील. नोकरदारांनी वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारावे. धार्मिक बाबतीत अधिक रस घेऊ शकाल. अनावश्यक खर्च टाळा. प्रकृतीमान ठीक राहील.

कष्टकऱ्यांना दूध दान द्या.

सिंह

या सप्ताहात आपण आपल्या कामात अधिक लक्ष देऊन आपली प्रगती कशी होईल याकडे लक्ष दिल्यास पुष्कळशा गोष्टी साध्य करता येणे शक्मय होईल. मात्र कृतीची वाच्यता इतरत्र होणार नाही याची खातरजमा करा. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. दूरच्या आप्तेष्टांशी सुसंवाद घडण्याची संधी प्राप्त होईल. आर्थिक बाजू ठीक ठेवता येईल.

सोनेरी कपडा जवळ ठेवा.

कन्या

आपण आपल्या जबाबदाऱ्या ओळखून, त्यांचा प्रयत्नपूर्वक वापर केल्यास आपल्याला उद्दिष्टांकडे वाटचाल करता येईल. आपल्या ध्येयापासून विचलित न होता प्रयत्नशील राहिल्यास आपणाला आपले उद्दिष्ट गाठणे सुलभ होईल. घरासंबंधीच्या प्रश्नांना चालना मिळेल. काही भाग्यवंतांना संतती लाभ संभवतो. नको त्या प्रलोभनात अडकू नका. प्रकृतीमान ठीक ठेवा.

काजळ लावा.

तूळ

आरोग्य ठीक असले तरी खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, मोसमी आजारापासून सावध रहा. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. बुद्धिचातुर्याची झलक दाखविण्याची संधी मिळेल. सकारात्मक दृष्टीने विचार करून काही कठीण प्रश्न सोडवू शकाल. विद्यार्थीवर्गाने अध्ययनात अधिक श्र्रम घेणे आवश्यक राहील. आप्तेष्टांपासून दूर राहणे हितकारक ठरू शकते.

स्टीलच्या भांड्यातून पाणी पिणे टाळा.

वृश्चिक

या सप्ताहात आपल्या प्रकृतीबाबत अधिक चोखंदळ रहा, विशेषत: खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. प्रकृती जपा. पोटात दुखणे, ब्लोटिंग सारखे आजार त्रास देऊ शकतात. काम करताना सरकारी नियमांची पायमल्ली होणार नाही याची खबरदारी घ्या. क्रीडा, तांत्रिक क्षेत्रात असणाऱ्यांना हा काळ चांगला राहील. घरगुती वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा.

केळीच्या झाडाची सेवा करा.

धनू 

अचानक प्रवासाचे योग संभवतात. महत्त्वाचे निर्णय टाळा. स्वत:ची चूक इतरांवर घालू नका, नको त्या प्रकरणाला सामोरे जावे लागू शकते. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नको त्या प्रलोभनांपासून दूर रहा. व्यसन करणाऱ्यांना आरोग्यासंबंधी धोका संभवतो. आठवड्याचे अखेरचे दिवस अधिक चांगले जातील, तेव्हा रखडलेले निर्णय मार्गी लागण्याची शक्मयता आहे.

गरजूला शिधा द्या.

मकर 

या सप्ताहात सर्वच बाबतीत आपण सावधानता बाळगणे सर्व दृष्टीने योग्य राहील. महत्त्वाच्या कामी ज्येष्ठांचे मार्गदर्शन अवश्य घ्या. अधिक मेहनत केल्यास आर्थिक बाजू सावरता येईल. प्रकृतीबाबत दक्ष रहा, विशेषत: मोसमी आजारापासून सावध रहा. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. वैवाहिक जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल.

अनाथालयाला आर्थिक मदत करा.

कुंभ

सामंजस्याने वागण्याची गरज आहे, नको ते वाद चार चौघात बदनामी करू शकतात. स्थावर मालमत्तेसंबंधीचे प्रश्न डोके वर काढण्याची शक्मयता आहे, तेव्हा वादाचे प्रसंग टाळून सामंजस्याने परिस्थिती हाताळा. नोकरदारांना काहीसा दिलासा मिळेल. महिलांना त्यांच्या कलागुणात उत्तेजन मिळेल. प्रकृतीमान ठीक असेल.

विहिरीत नाणे टाका.

मीन

अकारण तब्येतीची तक्रार येऊ शकते, तरी खाण्याची पथ्ये पाळा. घरगुती वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घ्या. वैवाहिक जोडीदाराशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. प्रकृती जपा. प्रसिद्धीचे जे वलय प्राप्त झाले होते, या गोष्टींनी हुरळून न जाता पुढील काळाचा विचार करून वागल्यास आपण यशस्वीपणे यशाची वाटचाल करू शकाल. कोणावरही विश्वास जपूनच ठेवा.

हिरवे वस्त्र दान करा.

 

दुकानात, व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कोणत्याही वास्तूमध्ये काही समस्या असल्यास किंवा व्यवसाय चांगला वाढत नसल्यास काळ्या कपड्यात तुरटी बांधून मुख्य गेटवर टांगावी. असे केल्याने हळूहळू कामाच्या ठिकाणी सर्व समस्या संपुष्टात येतील आणि समृद्धीही येईल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article