राशिभविष्य
बुधवार दि. 13 ते मंगळवार दि. 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत
मागच्या लेखामध्ये ज्याप्रमाणे मी सुरूवात केली त्यावरून कित्येक लोकांना असे वाटले असेल की, मी काहीतरी तोडगा किंवा सोशल मीडिया छाप (!) असा एखादा उपाय सांगणार आहे, पण खरं सांगू का, मी जे काही मागच्या वेळेला लिहिले त्यामध्ये कुठल्याही प्रकारे अतिशयोक्ती नव्हती. ‘तुझं आहे तुजपाशी, पण तू जागा चुकलासी’ असेच काहीसे आपल्या बाबतीमध्ये घडते. आपण बाहेरच्या जगामध्ये अमुक एक ग्रहाची शांती करा. अमुक एक नक्षत्राची शांती करा. या योगाची शांती करा. त्या योगाची शांती करा. का? की जेणेकरून आपल्याला असलेल्या त्रासापासून मुक्तता मिळेल अशी आशा आपण करतो. पण खरोखर हे अवडंबर करून आपण सुखी होतो का? आपण स्वत: आतून शांत आहोत का? आपण स्थिर आणि समृद्ध आहोत का? आपल्या आतल्या जगाला जर आपण योग्य पद्धतीने हाताळले तरच बाहेरचे जग आपल्याला साथ देणार यात शंकाच नाही. ज्योतिषशास्त्राचा उपयोग अनेक पद्धतीने अनेक परिस्थितीमध्ये करता येतो. आपल्या आजूबाजूला असलेल्या आपल्या नात्यांपासून, वस्तुंपासून ते आपल्या शरीरातील अवयवांपर्यंत आणि सूक्ष्म शरीरातील चक्रांपर्यंत ग्रहांचे वास्तव्य आहे. मग बाहेर शांत करण्यापेक्षा आतली समृद्धी तुम्हाला महत्त्वाची वाटत नाही का? आजकाल मॅनिफेस्टेशन, स्विच वर्ड, स्विच नंबर इत्यादींची चलती आहे. त्यात वाईट काही नाही. पण जे आपल्याला सहज साध्य आहे ते सोडून बाहेर पळत राहण्यात काय अर्थ आहे? विषयाला सुऊवात करतो. सजीव प्राण्यांच्या साम्राज्यातील जवळजवळ प्रत्येक सजीवामध्ये अनेक शारीरिक वैशिष्ट्यो आहेत. बहुतेकांना एक हृदय, दोन फुफ्फुसे, दोन डोळे, दोन कान, दोन नाक, एक तोंड. थांबा-दोन नाक? होय. जवळजवळ सर्व प्राण्यांना दोन नाकपुड्या असलेले एक नाक असते पण ते मुळात दोन स्वतंत्र नाक म्हणून काम करतात. डार्विनने निरीक्षण केलेला उत्क्रांती वाद जरी मान्य केला तरी सजीवांच्या उत्क्रांतीमध्ये त्यांच्या अवयवांमध्ये घडणारे लक्षणीय बदल हे त्या त्या वेळेच्या अनुरूप आणि जीवेष्णेला अनुकूल असणारे होते आणि होत आहेत. माणसांच्या बाबतीमध्ये घडलेला सगळ्यात मोठा बदल म्हणजे चार पायांवर चालणारा जीव हा दोन पायावर चालायला लागला आणि शरीराच्या गुऊत्वाकर्षणाच्या केंद्रांमध्ये आमूलाग्र बदल घडला. उत्क्रांतीमध्ये शरीराच्या ज्या ज्या भागांमध्ये बदल घडला तो गरजेचा तरी होताच पण त्याहीपेक्षा पिढ्या न् पिढ्या संक्रमित होणारा होता. आपला मुख्य विषय ‘नाक’ असल्याने त्याबद्दल बोलुया. (नाक खुपसूया!!) बहुतेक प्राण्यांना फक्त एक नाक असते, परंतु ते थोडे फसवे असते. ते एक नाक दोन नाकपुड्यांमध्ये विभागलेले आहे जे पूर्णपणे स्वतंत्रपणे कार्य करते. नाक ज्या प्रकारे विकसित झाले आहे, ते खरोखरच असे आहे की आपल्याकडे दोन नाकं एका संरचनेत पॅक केलेली आहेत. नाक दोन कार्ये करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑक्सिजन घेणे आणि ते तुमच्या फुफ्फुसात पाठवणे. तुमचे शरीर केवळ अन्नाने जगू शकत नाही आणि ते केवळ ऑक्सिजनसह जगू शकत नाही. तुमच्या शरीरातील रासायनिक अभिक्रिया अन्नावर प्रक्रिया करण्यासाठी ऑक्सिजनचा वापर करतात. नाकाचे दुसरे कार्य म्हणजे गंध शोधणे (गोष्टींचा वास घेणे). आमच्या नाकपुड्यातील रिसेप्टर्स ओळखता येण्याजोग्या गंध शोधण्यासाठी त्यांच्या मूळ स्रोतापासून सुटलेले लहान कण शोधतात. काही कण आमच्या रिसेप्टर्सद्वारे अगदी सहजपणे शोधले जाऊ शकतात. तथापि, इतर कण प्रक्रिया करण्यासाठी अधिक वेळ घेतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, तुमच्या नाकाची एक नाकपुडी असेल जी फुफ्फुसात हवा नेण्याच्या मुख्य हेतूसाठी प्रबळ असेल. दुसरी नाकपुडी स्वत:चा आकार संकुचित करण्यासाठी त्याच्या शिरा अधिक रक्ताने भरते ज्यामुळे रिसेप्टर्सना गंध कणांवर प्रक्रिया करण्यासाठी अधिक वेळ मिळतो. मनोरंजक गोष्ट अशी आहे की, एक नाकपुडी बंद आणि एक चालू ही एक अनैच्छिक गोष्ट आहे, आपण ती ठरवून करत नाही. शरीर नाकपुड्या बदलण्याचा निर्णय कसा आणि कधी घेते हे देखील एक गूढ आहे. सर्दीमुळे तुमची एक नाकपुडी बंद पडल्यावर तुमची वास घेण्याची क्षमता का कमी होते हे आत्ता तुम्हाला कळले असेल. तुमच्या शरीराला वास घेण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज असते, त्यामुळे तुमच्या वास घेण्याच्या क्षमतेच्या हानीमुळे दुसरी नाकपुडी वेगवान हवा घेण्यावर लक्ष केंद्रित करेल. कोणत्याही प्रकारे, आमच्याकडे असलेली वैशिष्ट्यो का आहेत हे समजून घेणे, कालांतराने किंवा उत्क्रांतीमुळे तुमची अविश्वसनीय शरीर बनविण्यात मदत करणाऱ्या संथ बदलाची खूप लांब प्रक्रिया आहे. उजव्या नाकपुडीला सूर्य नाडी आणि डाव्या नाकपुडीला चंद्र नाडी म्हणतात. बघा, आले ना ग्रह? पुढच्या भागात चमत्काराच्या दुनियेत जाऊया...
(टीप: त्रिपुरारी पौर्णिमा: कार्तिक स्वामी दर्शन : दि. 15 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 09.55 ते उजाडता शनिवार दि. 16 नोव्हेंबर 2024 रोजी पहाटे 2.58 पर्यंत)
मेष
नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. कार्यक्षेत्रात एखाद्या प्रभावी व्यक्तीच्या संपर्कात रहाल, त्याचा लाभ घेता येईल. आपल्या प्राप्तीत वाढ संभवते. प्रवासाचे योग येतील. कौटुंबिक वातावरण वादविवादासारख्या प्रसंगांनी बिघडणार नाही याची दक्षता घ्या. स्थावरबाबतीतील प्रश्न सोडविले जातील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. प्रकृतीस्वास्थ्य जपा.
उपाय : मंदिरात बदाम अर्पण करा.
वृषभ
ग्रहमान पाहता या आठवड्यात दैनंदिन व कार्यालयीन कामकाजात व्यस्त रहाल. आपल्या बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. आप्तेष्ट, मित्रमंडळींशी सामंजस्याने वागा. स्थावरबाबतचे प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग येतील. हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल. बोलण्याने कोणीही दुखावणार नाही याची दक्षता घ्या. पोटदुखी, अपचनाच्या विकारांबाबत सावध रहा.
उपाय : दूध दान करा.
मिथुन
नोकरदारांना काम जास्त लागेल. आपल्या बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा व गैरसमज टाळा. कोणतेही काम शांतपणे व विचारपूर्वक करा. मित्रमंडळी यांच्या गाठीभेटी होतील. सकारात्मक गोष्टींना प्राधान्य द्या. आर्थिक बाजू ठीक राहील. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. डोळे व तोंडाच्या आजारांपासून सावध रहा. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
उपाय : अंध व्यक्तींना जेवण द्या.
कर्क
ग्रहमान पाहता या आठवड्यात विविध प्रकारच्या आव्हानांना आपणास सामोरे जावे लागणार आहे. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. कामाचा उत्साह वृद्धिंगत होईल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. सकारात्मक विचार टिकवून ठेवा. मुलांच्या अभ्यासासंबंधी अधिक जागरूक रहा. निद्रानाशाची समस्या संभवते. जोडीदाराशी बेबनाव संभवतो.
उपाय : घरामध्ये यज्ञयाग करा.
सिंह
कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्यावे लागणार आहे. आपल्या रागावर योग्य नियंत्रण ठेवा. विरोधकांच्या कारवायांवर कडक नजर ठेवा, त्यांना संधी देऊ नका. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे, तर वेळीच अनावश्यक खर्च टाळा. वाहनांच्या वेगावर योग्य नियंत्रण ठेवा. हाती घेतलेली कामे पार पाडता येतील. घरात धार्मिक कार्य होण्याची शक्मयता राहील. उष्णतेच्या विकारांपासून सावध रहा.
उपाय : अन्नदान करा.
कन्या
प्रत्येक बाबतीत सावधानता बाळगल्यास अपेक्षित गोष्टी साध्य होतील. काहींना नोकरीत बदल संभवतो. वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. कोर्टकचेरीच्या कामात सफलता संभवते. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासाचे योग येतील. कामाचा व्याप वाढणार आहे. प्रकृतीची काळजी घ्या, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, रक्तदाबाबाबत सावध रहा.
उपाय : व्यसन करणे टाळा.
तूळ
सर्व बाबतीत आशावादी स्वरूपाचा राहणार आहे. नोकरदारांना चांगली बातमी मिळेल. कामकाजात प्रगती करण्याची संधी मिळेल. प्रवासाचे योग येतील. थोरामोठ्यांचे मार्गदर्शन मिळू शकेल. हितशत्रूंच्या कारवायांवर नजर ठेवा. वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. स्थावरबाबतचे प्रश्न सुटू शकतील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना हा काळ छान राहील.
उपाय : चिमण्यांना दाणे टाका.
वृश्चिक
दूरदर्शीपणाने विचार करून वागल्यास अपेक्षित गोष्टी साध्य होतील. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. प्रवासाचे योग येतील. काही भाग्यवंतांना परदेशगमनाचे योग संभवतात. वादाचे प्रसंग टाळा. स्थावरसंबंधीचे योग संभवतात. मुलांकडे अधिक लक्ष द्या. वाहनांच्या वेगावर योग्य नियंत्रण ठेवा. खर्चावर निर्बंध ठेवा. पचनाच्या विकारांबाबत सावध रहा.
उपाय : घरात गंगाजल ठेवा.
धनू
प्रयत्नशील राहिल्यास बहुतांश गोष्टी साध्य होतील. नोकरदारांना दिलासा मिळेल. आर्थिक व्यवहारासंबंधी कागदपत्रांवर डोळे झाकून सह्या करू नका. स्वत:च्या बोलण्यावर ताबा ठेवावा. स्थावरबाबतचे प्रश्न सोडविता येतील. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या, विशेषत: मुलांच्या शिक्षणासंबंधी. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. प्रकृती स्वास्थ्यासाठी योग व ध्यान नियमित करावे.
उपाय : काळ्या गाईला खाऊ घाला.
मकर
कामे सुलभ होऊ शकतील. नोकरदारांना दिलासा मिळेल. प्रवासाचे योग येतील. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. परिश्र्रमाने वरिष्ठ मंडळींची मने सांभाळा. थोरामोठ्यांच्या सहवासाचा लाभ घेता येईल. वाहनांच्या वेगावर योग्य नियंत्रण ठेवा. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, विशेषत: पोटाच्या तक्रारींबाबत सावध रहा.
उपाय : कोणतेही दान घेऊ नका.
कुंभ
कामाचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. शनि पर्वातून आपण जात असला तरी ग्रहांच्या मिळणाऱ्या साथीने आपण यशाचा मार्ग गाठू शकाल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. नव्या मित्रमंडळींच्या गाठीभेटी संभवतात. प्रवासाचे योग येतील. छोट्या-मोठ्या व्यापारासाठी हा काळ उत्तम राहील. आर्थिक बाजू ठीक राहील.
उपाय : पांढरे कपडे वापरू नका.
मीन
अडथळ्यांचा हा सप्ताह राहणार आहे. मध्यंतरानंतर सर्व सुरळीत होऊ लागेल. नोकरदारांना दिलासा मिळेल. विद्यार्थीवर्गाला, विशेषत: संगणक, तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांना प्रगती करण्याची संधी मिळेल. दैनंदिन कामकाजात अधिक लक्ष द्या. प्रवासाचे योग संभवतात. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक गुंतवणूक तज्ञांच्या सल्ल्यानेच करा.
उपाय : पांढऱ्या गाईची सेवा करा.