For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य

06:01 AM Dec 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य
Advertisement

मेष

Advertisement

आरोग्याची विशेष काळजी घ्या, पोटाशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. प्रेमसंबंधात काही गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे आपापसात मतभेद होऊ शकतात. त्यामुळेच कोणत्याही प्रकारचा गैरसमज होऊ देऊ नका आणि मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करा. गैरसमजामुळे तुमच्या नात्यात वाद होऊ शकतात हे लक्षात ठेवा. घरी खास पाहुणे येण्याची शक्मयता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना  चांगला काळ आहे.

काजळ दान द्या

Advertisement

वृषभ 

तुमचा व्यवसाय आणखी प्रगती करेल आणि नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. विरोधक तुमच्याकडून पराभूत होतील. कोणतीही शारीरिक समस्या असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल. वरिष्ठ तुमच्यावर खूप खुश असतील. जोडीदाराच्या तब्येतीबद्दल तुम्ही खूप चिंतेत असाल. व्यवसायात रात्रंदिवस खूप मेहनत कराल.

पाण्यात नाणे टाका

मिथुन

गाडी चालवताना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. व्यवसायात कोणत्याही व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. अन्यथा, ती व्यक्ती तुमची फसवणूक करू शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील एखादे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप धावपळ करावी लागू शकते. त्यामुळे तुम्हाला थकवाही जाणवू शकतो. एखादे महत्त्वाचे काम खूप काळ पुढे ढकलत असाल तर ते काम पूर्ण करू शकता.

अत्तर लावावे

कर्क

कोणत्याही शुभ कार्यासाठी घराबाहेर जात असाल तर तुमच्या वडिलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेण्यास अजिबात विसरू नका. जुना मित्र भेटेल. नातेवाईकांकडून अप्रिय बातमी कळू शकते. व्यवसाय चांगला होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या मुलांच्या बाजूने तुमचे मन समाधानी राहील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

काळी मिरी जवळ ठेवावी

सिंह

कामे करण्यात आळशी होऊ नका, अन्यथा तुमच्या कामात आणखी विलंब होऊ शकतो. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर तुमचे आरोग्य पूर्णपणे तंदुऊस्त राहील. जर तुमची जमीन किंवा मालमत्ता विकण्याचा व्यवहार सुरू असेल तर ती आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते. तुमच्या प्रियजनांशी कोणत्याही प्रकारचा वाद टाळावा. व्यवसायात प्रगती होईल.

कुबेराक्शीचे झाड घरी लावावे

कन्या

वडिलधाऱ्या व्यक्तींच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल.  तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करू शकता, ही सहल तुमच्यासाठी खूप शुभ असेल. कामाच्या ठिकाणी तुमचा आदर वाढेल. कुटुंबातील सदस्यही तुमचा आदर करतील, तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. करिअर संदर्भात तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते.

 मुंग्यांना साखर घालावी

तूळ

काही नवीन करण्याचा विचार करू शकता. काही नवीन काम करून नवे अनुभव घेता येतील.  तुमच्या घरात काही खास व्यक्ती आल्याने तुम्हाला आनंद होईल. काम सुरळीतपणे कराल. मालमत्ता आणि स्थावर मालमत्तेची थोडी चिंता असेल. वडिलोपार्जित जमिनीच्या मालमत्तेतील तुमच्या वाट्याबाबतही तुमच्या घरात काही तणाव असू शकतो. कुणाशी वाद घालणे टाळा. त्यातून तुमचेच नुकसान होईल.

नवा आरसा दान द्यावा

वृश्चिक

करिअर घडवण्यासाठी खूप मेहनत कराल. घरात सुख-समृद्धी वाढण्याची शक्मयता आहे. रागावर नियंत्रण ठेवावे, तुमच्या रागामुळे एखादे काम बिघडू शकते.  कुटुंबातील कोणाशीतरी मतभेद होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि आधी संपूर्ण गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा, वादापासून स्वत:ला दूर ठेवा. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

रविवारी मीठ खाऊ नये

धनू

एखादे काम पूर्ण होण्याच्या वाटेवर असताना अचानक अडचण येऊ शकते. व्यवसाय चांगला चालेल. नफा मिळू शकेल. तुमचे सहकारी तुम्हाला  सहकार्य करतील. पैसे निऊपयोगी गोष्टींवर  खर्च होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही थोडा हात खेचून घ्या. नोकरदार लोकांना थोडा त्रास होईल. तुम्ही तुमच्या कार्यालयातील तुमच्या विरोधकांपासून सावध राहावे, अन्यथा ते तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात.

काळे वस्त्र वापरू नये

मकर

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना शुभ वार्ता कळेल. नोकरी मिळू शकते. जास्त कामामुळे  मानसिक ताण आणि शारीरिक थकवा जाणवू शकतो, त्यामुळे तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटू शकते. अचानक पाहुणे येण्याची शक्मयता आहे. ज्यांच्या आगमनामुळे तुमचे सर्व बेत रद्द होतील. मुलांच्या बाजूने तुमचे मन चिंतेत असेल.

आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ घाला

कुंभ 

खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घेतली पाहिजे. आजाराचे भय आहे. कुटुंबाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. ज्यामुळे प्रवासाला जाण्याचा योग येऊ शकतो. ऑफिसमधील काही क्लिष्ट काम सोडवू शकाल, ज्यामुळे ऑफिसचे अधिकारी तुमच्या कामावर खूष होतील. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. वादापासून स्वत:ला दूर ठेवा. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

5 लवंगा जवळ ठेवा

मीन

काही नवीन करण्याचा विचार करू शकता. काही नवीन काम करून नवे अनुभव घेता येतील. तुमच्या घरात काही खास व्यक्ती आल्याने किंवा विशिष्ठ व्यक्तीची भेट झाल्याने तुम्हाला आनंद होईल. व्यवसाय चांगला चालेल तुम्हाला व्यवसायातून  चांगला नफा मिळेल. नोकरदार वर्गाला आनंदाची बातमी कळण्याचे योग आहेत. आपल्या कामात मात्र चोख रहा.

सफेद मिठाई वाटा

टॅरो उपाय : कर्ज (उधारी ) देणे आणि घेणे आत्ताच्या काळात जवळ जवळ अनिवार्य झाले आहे. अशा वेळी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षामधील 2, 4, 6, 7, 8, 10, 11, 12, 13 तसेच कृष्ण पक्षामधील प्रतिपदा तिथीस पौर्णिमा अथवा मंगळवार असलेल्या दिवशी एखाद्याला रक्कम उधार म्हणून द्यावी. बुधवारी रक्कम कर्ज म्हणून घ्यावी. फायदा होऊ शकतो.

Advertisement
Tags :

.