महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राशिभविष्य-

06:04 AM Nov 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

10-11-2024 ते 16.11.2024 पर्यंत

Advertisement

मेष

Advertisement

या आठवड्याची सुऊवात चांगली होईल. आपण एखाद्या प्रवासाचे आयोजन सुद्धा करू शकाल. आरोग्य बिघडण्याची शक्मयता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना एखादी कायदेशीर बाब त्रास देईल, तेव्हा सावध रहावे. व्यापारी वर्गासाठी हा आठवडा चांगला असेल. या आठवड्यात एखादे दुखणे डोके वर काढण्याची शक्मयता असल्याने आरोग्याची काळजी घ्या.

पक्ष्यांना दाणे घालावेत.

वृषभ

व्यापाऱ्यांचा फायदा वाढवून देणारा हा आठवडा आहे. या आठवड्याच्या सुरुवातीस आपण एखाद्या विशेष व्यक्तीप्रती आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकाल. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. व्यावसायिक जीवनात आपण कठोर परिश्र्रम करून आपली कामे पूर्ण कराल व त्यामुळे आपली कीर्तीसुद्धा वाढेल. या दरम्यान लाभ मिळू शकतो.

दही दान करा.

मिथुन 

शासकीय व पैतृक संपत्तीशी संबंधित बाबतीत धीर धरावा. आर्थिक स्थैर्य लाभण्यासाठी प्रयत्न कराल. आठवड्याच्या अखेरीस एखाद्या चिंतेमुळे आपण बेचैन व्हाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. त्यांचे आपल्या अध्ययनात चांगले लक्ष लागू शकेल. कोणतेही वाहन चालवताना ते काळजीपूर्वक चालवावे. आरोग्य चांगले राहील.

चादर दान करा.

कर्क

हा आठवडा आपल्या आनंदात भर घालणारा आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आपणास जीवनातील आनंद अनुभवता येईल.  कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीची प्रकृती नाजूक होण्याची शक्मयता असल्याने त्यांची काळजी घ्यावी. नोकरीच्या ठिकाणी वाद होईल. आपणास आपल्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. त्यांच्या सहवासाने आनंदित व्हाल.

भिजवलेले मूग पक्ष्यांना घालावे.

सिंह

व्यापारीवर्गास आनंददायी बातमी मिळेल. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आर्थिक स्थिती प्रबळ होईल. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल. आपले आरोग्य चांगले राहिले तरी कंबरदुखीचा त्रास संभवतो आणि आठवड्याच्या सुरुवातीस आपणास काही मानसिक चिंता राहतील. या आठवड्यात आपणास एखाद्या सहलीस जाण्याची संधी मिळेल.

घरात तुपाचा दिवा लावा.

कन्या

एखाद्या बाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे घरातील वातावरण बिघडू शकते. खर्चावर आपले नियंत्रण राहून आपण वित्तीय नियोजन उत्तम प्रकारे करू शकाल. नोकरीच्या ठिकाणी स्थिती आपणास अनुकूल असल्याने आपण लक्ष देऊन कामे कराल. असे असले तरी काही कामांच्या बाबतीत गोंधळ होऊन त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल.

लहान मुलांना खाऊ वाटा.

तूळ

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण जर शासकीय नोकरीत असाल तर चौकशीचा हिस्सा व्हाल. व्यवसायासंबंधित एखाद्या समस्येचा आपणास त्रास होण्याची शक्मयता आहे. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून न घेतल्यामुळे कटुता वाढण्याची शक्मयता आहे. कौटुंबिक जीवन आनंदमय राहील. घरात प्रेम वाढेल.

अंबर अत्तर लावा.

वृश्चिक

मित्रांचा सहवास घडेल. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आपण नवीन काही करण्याचा प्रयत्न कराल. आपल्या हातून समाज कल्याणाचे एखादे कार्य होऊ शकेल. प्रकृती नाजूक होण्याच्या शक्मयतेमुळे आरोग्याची काळजी घ्यावी. एखाद्या परिचित व्यक्तीकडून मदत मिळेल. नोकरी करणाऱ्यांचे त्रास वाढण्याची शक्मयता असल्याने त्यांनी कामात काळजी घ्यावी.

उजव्या कानामागे काजळ लावा.

धनू

व्यापारीवर्गास चांगला फायदा होऊन प्राप्तीत वाढ होईल. लोकप्रियता वाढेल. कामासाठी लोक येतील आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल. त्याचबरोबर आपल्या खर्चातसुद्धा वाढ होईल. निष्कारण आपला बडेजाव दाखविण्याचा प्रयत्न केल्यास आपली आर्थिक स्थिती खालावू शकते. आरोग्यासाठी हा आठवडा तितकासा अनुकूल नाही.

केशराचा टिळा लावावा.

मकर 

आठवड्याचे सुरुवातीचे दिवस प्रवासासाठी अनुकूल असल्याने त्या दरम्यान प्रवास करावा. आपणास एखादी दुखापत होण्याची, ताप येण्याची किंवा खोकला होण्याची शक्मयता आहे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्यच राहील. वैवाहिक जीवनात मात्र आपणास आनंद अनुभवायला मिळेल. नोकरी करणाऱ्यांची कामगिरी चांगली होईल. वैवाहिक जीवन आनंदमय होईल.

8 उडीद जवळ ठेवा.

कुंभ

आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आपल्या जबाबदाऱ्या पार पाडून जोडीदारास योग्य तितकी साथ देऊ शकाल. कुटुंबात काही समस्या निर्माण होऊन वाद होतील. अशा परिस्थितीत आपणास मध्यस्थी करावी लागेल. नोकरीत आपल्या परिश्र्रमाचे यथोचित फळ मिळाले तरी काही व्यक्ती आपल्या विऊद्ध कट कारस्थान रचण्याचा प्रयत्न करतील.

काळा दोरा मनगटाला बांधावा.

मीन

नोकरी करणाऱ्यांचा हा आठवडा सुवर्णाक्षराने लिहिला जाईल. आपल्या कामाची प्रशंसा होऊन त्याचे चांगले फळ आपणास मिळेल. व्यापारीवर्गासाठी हा आठवडा काहीसा आव्हानात्मक असू शकतो. वैवाहिक जीवन परिपूर्ण असल्याने एकमेकांप्रती आकर्षण असल्याचे जाणवेल. संपत्तीतून काही लाभ होईल. कौटुंबिक वातावरणात सकारात्मकता दिसून येईल.

कवडी जवळ ठेवा.

 

कर्जाच्या समस्येने त्रस्त असाल आणि महागाईमुळे तुमचे उत्पन्न कमी होत असेल तर तंत्रशास्त्राची ही युक्ती नक्की वापरा. यासाठी सुपारीच्या पानावर थोडी तुरटी आणि शेंदूर बांधून संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोठ्या दगडाने दाबून ठेवा. हे करत असताना तुम्हाला कोणीही पाहू नये हे लक्षात ठेवा. हा उपाय सलग तीन बुधवारी करावा.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article