For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य

06:05 AM Sep 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य
Advertisement

बुधवार दि. 18 ते मंगळवार दि. 24 सप्टेंबर 2024 पर्यंत

Advertisement

रिपीट टायटल

हा विषय नीट समजून घ्यायचा झाला तर आपल्याला ज्योतिष आणि अध्यात्म यातला दुवा असणाऱ्या ‘आत्मा’ या संकल्पनेचा नीट अभ्यास केला पाहिजे. एकीकडे पुनर्जन्म या संकल्पनेनुसार आत्मा पुनर्जन्म घेतो आणि दुसरीकडे आपण ज्या व्यक्ती मरण पावल्या आहेत त्यांचे श्राद्ध करतो, असे समजून की आपण केलेल्या श्र्रद्धेने, अन्नदानाने पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो. हा विरोधाभास नाही आहे का? हेही समजून घेऊया. अब्राह्मीक धर्म सोडले (म्हणजे इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म सोडला) तर जवळपास सगळ्या धर्मांमध्ये पुनर्जन्म ही संकल्पना आहे. केवळ भारतच नाही तर कित्येक देशांमध्ये पुनर्जन्म आठवणारी माणसे आहेत. मागच्या जन्मी आपण कोण होतो, आपले गाव कुठले, यापासून ते आपल्या नातेवाईकांनासुद्धा ते ओळखतात. आपणही सर्रास म्हणतो की, अमूक एक जन्म घेऊन या घरात आला. अविनाशी आत्म्याचा प्रवास हा शरीर सोडल्यानंतर त्या जन्मात केलेल्या कर्मानुसार एका विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी नवीन शरीर धारण करण्यामध्ये होतो. शरीर सोडल्यानंतर दुसरे शरीर धारण करण्यामधला जो काळ आहे, त्या काळामध्ये आत्मा कुठल्या स्थितीमध्ये असतो त्याला शास्त्रामध्ये वेगवेगळी नावे दिलेली आहेत. ज्याला प्रेत योनी, पितर योनी अशा वेगवेगळ्या अवस्थांची संज्ञा देता येते. आपल्याला हे माहीत नाही म्हणून आपण या ‘क्ष’ अवस्था असे म्हणूया. या ‘क्ष’ अवस्थेतल्या आत्म्यांचा आपल्या आणि आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम म्हणजेच पितरदोष किंवा पितृदोष इत्यादी. लक्षात घ्या, जिथे निर्मिती आहे तिथे निर्माता आहे. म्हणजेच आपल्याला हे शरीर ज्यांनी दिले त्यांचे आपल्यावरती कर्ज आहे. हिंदू धर्मामध्ये तीन ऋणांची चर्चा केलेली आहे. देवऋण, ऋषिऋण आणि पितृऋण. देवऋण फेडण्याकरता आपण यज्ञ याग वगैरे करतो किंवा त्यामध्ये सहभाग घेतो. धार्मिक उत्सवामध्ये भाग घेतो. आर्थिक सहाय्य करतो किंवा श्र्रमदान करतो. ऋषिऋण फेडण्याकरता आपण ज्ञानाचा प्रसार करतो आणि पितरांचे ऋण फेडण्याकरता आपण पिंडदान, श्राद्ध वगैरे करतो. याला ऋण म्हणण्यापेक्षा कर्तव्य म्हणणे मला जास्त योग्य वाटते आणि या कर्तव्यांचे पालन आपण केलेच पाहिजे. पण विषय इथे संपत नाही. कुंडली बघितल्यानंतर किमान दहा असे योग असतात ज्याच्यामधून आपल्याला हे कळू शकते की, एखाद्या कुटुंबाची वाईट अवस्था ही पितर कुपीत झाल्याने झाली आहे. इथे पितर या शब्दाचा अर्थ केवळ आपले आई-वडील, आजी-आजोबा, पणजी-पणजोबा किंवा त्यांचे आई-वडील अशा सात पिढ्यांपर्यंत जात नाही तर पूर्वजन्मी आपण जे होतो तेव्हा आपले पितर कोण होते मग तो जन्म कीटकाचा असेना, पशु-पक्ष्यांचा असेना, जलचरांचा असेना कोणाचाही का असेना अशा समस्त पितरांचा संदर्भ पितर किंवा पितृ या एका शब्दांमध्ये येतो इतकेच नाही तर असे नातेवाईकसुद्धा यात जमा होतात.

Advertisement

मेष

काही जप जाप्य करण्याची इच्छा होण्याची शक्मयता आहे. काही धर्माचरण करण्याची पण इच्छा होईल. हरकत नाही. ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. पुण्य गाठीशी मिळेल. वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद मिळतील. संतांचा सहवास मिळण्याची शक्मयता आहे. तीर्थयात्रेची संधी मिळाली तर संधीचा फायदा घ्या. एकंदरीत हा आठवडा आपल्याला सुखासमाधानाचा जाईल.

उपाय : मारुतीची उपासना करा.

वृषभ

आपल्या व्यवसायात भरभराट संभवते. वडिलार्जित व्यवसाय असेल तर वडिलांच्या सल्ल्याने व्यवसायातील निर्णय घ्या. त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या. नोकरीत असाल तर आपल्या कामाने ऑफिसमध्ये सर्वांवर छाप टाकाल. आपली पदोन्नती देखील होण्याची शक्मयता आहे. ऑफिसमध्ये सन्मान मिळेल. समाजात प्रतिष्ठा मिळेल. वडिलांचे सहकार्य व आशीर्वाद मिळतील.

उपाय : गणेशाची आराधना करा.

मिथुन

वडील भावंडांच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने गाठीभेटी होतील. मित्रपरिवारासोबत वेळ झकास जाण्याचा संभव आहे. नवीन वस्त्रांची, चांगल्या वस्तूंची खरेदी होईल. या निमित्ताने भेट वस्तूंची देवाणघेवाण होईल. असे अनेक प्रकारचे लाभ या आठवड्यात आपल्याला संभवतात. दिवस छान मजेत जातील. या लाभात साहजिकच खाण्याचीही चंगळ होईल. मस्त मजेत रहा.

उपाय : गणपती अथर्वशीर्षाची पारायणे करा.

कर्क

खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. निदान आपण पैसा खर्च करतो, तो कशावर खर्च करतो किंवा तो योग्य ठिकाणी खर्च होतो का हे आपल्याला पहावे लागणार आहे, म्हणून काळजी घ्या. शक्मयतो फालतू खर्च करू नका. गणपतीचे दिवस आहेत. शक्मयतो त्याची पूजाअर्चा करण्यात वेळ घालवा. गणपतीचे आशीर्वाद घ्या. नक्की फायदा होईल. वाहन जपून चालवा. कोर्ट केस चालू असेल तर शक्मयतो पुढे ढकला.

उपाय : शंकराची आराधना करा.

सिंह

मन चंचल होण्याची शक्मयता आहे. काही चिंता मनाला सतावत राहण्याचा संभव आहे. पण ही चिंता मन आणि शरीर दोन्ही जाळते. हे लक्षात घ्या आणि सर्व काही त्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पावर सोडून द्या. त्याची सेवा करा. मुलांच्या प्रगतीने, त्यांच्या उन्नतीने आपल्याला समाधान वाटण्याचा संभव आहे. ते पाहून आनंदित रहा. बाप्पाच्या आगमनाने सर्व घर आनंदित होईल. त्या आनंदात सहभागी व्हा.

उपाय : दर मंगळवारी माऊतीच्या देवळात जाऊन त्याचे दर्शन घ्या.

कन्या

आपल्या कुटुंबासोबत राहण्याचा आपल्याला आनंद मिळण्याची शक्मयता आहे. गणपती बाप्पांच्या आगमनाने आपण निश्चितच प्रफुल्लित असाल. खाण्याची चंगळ होणार आहे. आपल्या बोलण्याने आपण सर्वांना आनंदित कराल. या आठवड्यात देण्याघेण्याचे काही व्यवहार करणार असाल तर मात्र सांभाळून करा. वडिलोपार्जित संपत्तीसाठी काही चर्चा चालू असल्यास आपण काही न बोललेलेच बरे.

उपाय : ॐकाराचा जप करा.

तूळ

आपल्या कामावर आपले वरिष्ठ खुश होतील. आपल्या वडील भावंडांच्या सहवासात आपला वेळ छान जाण्याचा संभव आहे. नोकरीत असाल तर आपल्या हाताखालील लोकांचा सुद्धा आपल्याला चांगला पाEिठबा मिळण्याची शक्मयता आहे. कदाचित एखादा छोटा प्रवास आपल्या भावंडांबरोबर अथवा मित्र परिवाराबरोबर होण्याचा संभव आहे. कदाचित रेल्वेप्रवास असेल. त्या प्रवासाचा आनंद लुटा.

उपाय : घरातून बाहेर पडताना कपाळावर गंधाचा टिळा लावा.

वृश्चिक

मातेचा सहवास आपल्याला आनंद देऊन जाण्याची शक्मयता आहे. वाहन खरेदीचा विचार करीत असाल तर अवश्य तो विचार कृतीत आणा. आपल्या करियरच्या दृष्टीकोनातून नवीन काही शिकण्याच्या प्रयत्नात असाल तर नक्की तो प्रयत्न यशस्वी होईल. प्रयत्न अवश्य करा. प्रयत्नांती परमेश्वर. नवीन घर बांधणे अथवा घेणे या विचारात असाल तर मात्र पूर्ण विचार करूनच पावले उचला.

उपाय : मारुतीचे कोणतेही स्तोत्र दररोज वाचा.

धनु

मुलांच्या प्रगतीने समाधान मिळण्याची शक्मयता आहे. चिंता वाटणे साहजिक आहे. पण चिंता करू नका. त्यांची गाडी आता प्रगतीपथावर आहे. त्यांच्या विचारांना योग्य ती चालना मिळून योग्य मार्गावर आहे. लॉटरीसारख्या प्रकारातून आपल्याला अचानक धनलाभाची शक्मयता आहे. पण ते धन स्वीकारताना सारासार विचार करून स्वीकारा आणि योग्य त्या ठिकाणी त्याचा विनिमय करा.

उपाय : दत्तगुरुची उपासना करा.

मकर

प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार असे दिसते. खाण्यापिण्यावर थोडे बंधन ठेवण्याची गरज आहे. मन थोडे चंचल होईल. पण कटाक्षाने त्यावर बंधन घालणे गरजेचे आहे. कदाचित नोकरी टिकविण्यासाठी जास्तीत जास्त कष्ट करावे लागण्याचा संभव आहे. कामामध्ये चुकूनही चूक होऊ देऊ नका. कदाचित त्यामुळे बॉसकडून काही बाही ऐकून घ्यावे लागण्याची शक्मयता आहे. सांभाळून रहा.

उपाय : दर शनिवारी शनिला तेल वाहा.

कुंभ

आपल्या जोडीदाराकडून फारसे सहकार्य मिळण्याची शक्मयता या आठवड्यात तरी कमी दिसते. स्वतंत्र व्यवसायात असाल तर सध्या तो फारसा वाढविण्याच्या भानगडीत पडू नका. त्यातून फायदा मिळण्याचा संभव सध्या नाही आहे. आहे त्या परिस्थितीत तसेच चालू ठेवा. भागीदारीत असाल तर त्याच्याकडूनही काही पाठिंबा मिळणार नाही. एकंदरीत या आठवड्यात शांत राहून काम चालवा.

उपाय : कुठलेही शनिचे स्तोत्र म्हणा.

मीन

लॉटरीसारख्या इतर प्रकारातून द्रव्यलाभ संभवतो. पण ते द्रव्य योग्य मार्गाने येत असेल तरच स्वीकारा. नाहीतर नंतर पस्तावायची पाळी येण्याचा संभव आहे. परिवारातील व्यक्तींची काळजी घ्या. स्त्राrकडून अथवा वारसा हक्कातूनही धनलाभाची शक्मयता आहे. पण त्याही बाबतीत वरील नियमच लागू आहे. मन अस्वस्थ होण्याची शक्मयता आहे. पण काळजी नसावी. आपले काम प्रामाणिकपणे करीत रहा.

उपाय : रोज दशरथकृत शनिचे स्तोत्र म्हणा.

Advertisement
Tags :

.