राशिभविष्य
दि. 25-8-2024 ते 31-8-2024 पर्यंत
मेष
कर्तृत्वाला वाव आणि धडाडीला संधी मिळेल. हाती घेतलेल्या कामाला यश मिळेल. कित्येक संधी तुमच्या समोर उभ्या राहतील पण त्यातल्या योग्य संधीची निवड करणे महत्त्वाचे ठरेल. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य हेही महत्त्वाचे आहे. चिडचिड केल्याने तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. पारिवारिकदृष्ट्या हा काळ अनुकूल आहे. पैशांची आवक चांगली असेल.
काळा हाकीक जवळ ठेवावा.
वृषभ
सामाजिक कार्यामध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. या आठवड्यात तुमचा स्वभाव धार्मिकतेकडे झुकलेला असेल. शक्यतो आपल्या कामांवर लक्ष केंद्रित करा. दुसऱ्यांच्या कोणत्याही बाबतीमध्ये हस्तक्षेप करू नका. तब्येतीला जपण्याचा काळ आहे. या आठवड्यात पारिवारिक संतुष्टी अनुभवाला येईल. एखादे काम होता होता राहू शकते.
नारळाच्या झाडाला पाणी घालावे.
मिथुन
जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. एखाद्या वृद्ध व्यक्तीमुळे मानसिक चिंता वाढू शकते. सहकाऱ्यांबरोबर वर्तणूक चांगली ठेवा. निंदानालस्ती करणे टाळावे. एखाद्या स्त्राrमुळे फायदा होण्याची शक्यता आहे. पाण्याच्या ठिकाणी प्रवास करण्याचा योग संभवतो. या आठवड्यात मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत वेळ घालवाल.
केळीच्या झाडाजवळील माती जवळ ठेवावी.
कर्क
या आठवड्यात कामांमध्ये चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. तब्येतीच्या लहानसहान तक्रारी संभवतात. अकारण मन उदास होऊ शकते. एखाद्या व्यक्तीवरील अतिविश्वास धोकादायक ठरू शकतो. अनावश्यक वस्तुंवर अति खर्च होण्याची शक्यता आहे. परिवारातील सामंजस्य वाढेल.
तहानलेल्या पशुंसाठी पाण्याची सोय करावी.
सिंह
या आठवड्यात रागावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. कुटुंबीयांसोबत एखाद्या मंदिराला भेट देऊ शकता. कामाच्या ठिकाणी वादविवादाची शक्यता आहे. आपले काम बरे आणि आपण बरे हे धोरण ठेवावे. मंगलकार्य संभवते. या आठवड्यात कदाचित पैशाची तंगी जाणवू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रेमीजनांनी एकमेकाला उपहार द्यावा.
वृद्धाश्रमात फळांचे दान करावे.
कन्या
घाई गडबडीमुळे कामांमध्ये चुका होऊ शकतात. एखादी व्यक्ती तुमच्याकडून पैशांची मागणी करू शकते. या आठवड्यात थोडा एकटेपणा जाणवेल. वैवाहिक जीवनात थोडे चढ-उतार येतील. परिवारातील शांति भंग होऊ नये म्हणून प्रयत्न करावे. आपल्या अपेक्षा मर्यादित ठेवा.
निर्धन व्यक्तीला आर्थिक मदत करा.
तूळ
या आठवड्यामध्ये ताणतणावामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. लहानसहान गोष्टींमुळे मन खचून जाऊ नये याचा प्रयत्न करा. पुढे जाऊन यश तुमचेच आहे याची खात्री बाळगा. कोणाकडूनही कुठल्याही प्रकारचा उपहार स्वीकारू नये. आर्थिक नियोजन चुकू शकते. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. व्यवहार स्वच्छ ठेवा.
छत्रीचे दान करावे.
वृश्चिक
तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये विश्वास ठेवता येण्यासारखे कितीजण आहेत याचा साक्षात्कार करून देणारा हा आठवडा असेल. आयत्या वेळी कोण कामाला येतो हे तुम्हाला कळेल. घरातील एखाद्या व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटू शकते. पैशांच्या बाबतीमध्ये निष्काळजीपणा करू नका. प्रेमीजनांनी पुढचा विचार करावा.
लाल रंगाचा हात रुमाल जवळ ठेवावा.
धनु
कामाचा व्याप वाढेल शिक्षणासंबंधी कामामध्ये यश मिळेल. या आठवड्यामध्ये परिवारातील एखाद्या सदस्याच्या वैयक्तिक समस्यांविषयी चर्चा करावी लागू शकते. दीर्घकाळ लांबलेले एखादे काम पूर्ण होईल. लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. तुमचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी आक्रमक होऊ नका. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात.
लहान मुलांना शिक्षणासाठी मदत करावी.
मकर
तुमच्या जवळच्या व्यक्ती तुम्हाला मदत करण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत ती मदत नाकारू नका. या आठवड्यात काही बदलांना सामोरे जावे लागेल. हे बदल कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक आयुष्यात असू शकतात. तुम्ही पूर्वी केलेल्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला मिळेल. वैवाहिक जोडीदाराबरोबर काही महत्त्वाच्या बाबतीत चर्चा कराल. पैसे उधार देणे आणि घेणे टाळावे.
निळा हात रुमाल जवळ ठेवा.
कुंभ
काही महत्त्वाच्या बाबींमध्ये आर्थिक तजवीज नीट होईल ना याची काळजी वाटेल. या आठवड्यामध्ये काही बाबतींमध्ये संघर्षाला सामोरे जावे लागेल. माणसांना आणि परिस्थितीला नीट सांभाळून घ्यावे लागेल. योग्य कारणाकरिता खर्च होतो आहे ना याची काळजी घ्या. प्रेमींना विरोधाचा सामना करावा लागू शकतो.
कुंभाराकडची माती जवळ ठेवावी.
मीन
नवीन कामाकरता अर्ज करू शकाल. नवीन प्रकल्प हातात घ्याल. काही गोष्टींमध्ये लोकांची मदत घ्यावी लागू शकते. कोणत्याही कारणाने दुसऱ्यांवर काम टाकणे टाळा. तुमच्या आतला आवाज ऐका. तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. परिवारातील वातावरणाला सुखमय कराल. प्रेमींना उपहार मिळू शकतो.
जलचरांना कणकेचे खाणे घाला.
टॅरो उपाय : घरात कायम सुख शांती नांदावी याकरता एका असोल्या नारळावर कापूर ठेवून पेटवावा आणि नारळ घरभर फिरवावा. हा उपाय संध्याकाळी करायचा आहे.