For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य

06:15 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य
Advertisement

बुधवार 21 ते मंगळवार 27 ऑगस्ट 2024

Advertisement

आता तुम्ही म्हणाल की, इंग्रजी प्रोनोलॉजी किंवा ध्वनी कंपन शास्त्राचा उपयोग मराठी, कानडी किंवा हिंदी इत्यादी भारतीय भाषांमधील नावांवर आपण कसा काय लावू शकतो? कारण स्पष्ट आहे, ज्या शब्दाचे अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहेत त्या शब्दाचे प्रतिसाद आपल्या मनात आणि अंतर्मनात उमटत असतात आणि त्याप्रमाणे परिणाम घडत असतो. मागच्या वेळेला चर्चा केलेल्या ‘प्रसाद’ या नावामध्येसुद्धा आपण मराठी भाषेतील ध्वनी कंपन शास्त्राचा अभ्यास केला तर ‘साद’ हा शब्द येतो. साद या शब्दाचा अर्थ हाक मारणे. कित्येक वेळेला अशा लोकांना मदती करता इतर लोकांची गरज लागते हे पाहण्यात आलेले आहे. हेच विश्लेषण एका स्त्राrच्या ‘साधना’ (SAD-HANA) नावासाठी लागू आहे. अविनाश नावाचे अनेक लोक अकाली डिप्रेस्स होताना पहावयास मिळू शकते किंवा त्यांच्या जीवनात खूप संघर्षांना सामोरे जात असल्याचे पाहिले आहे. कारण स्पष्ट आहे. अविनाश नावात ‘विनाश’ हा शब्द आहे जो विनाश दर्शवतो. आणखी एक नाव मनोज घेऊ. या नावात सामील असलेले ध्वनी ‘मनुष्य आणि नाही’ (MAN-NO-J). असा मनुष्य गतिशील आणि महत्त्वाकांक्षी स्वभाव, आनंदात रस आणि कोणतेही कार्य पूर्ण करणे यासारख्या सकारात्मक गुणांचे प्रतिनिधित्व करतो. पण त्यानंतर आलेला NO म्हणजे ‘नाही’ त्याला असे गुण धारण करताना खूप त्रास देतो. त्यामुळे, मनोजला त्याच्या वैयक्तिक जीवनात तसेच व्यावसायिक जीवनात अपयश/संघर्ष येऊ शकतो. तो पुरुषार्थी नसल्यामुळे (MAN-NO), त्याचा जोडीदार त्याच्यावर आनंदी असेलच असे सांगता येत नाही, ज्यामुळे त्याच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतात. नोकरी मिळण्यास विलंब होऊ शकतो. नोकरी मिळाल्यानंतरही त्याच्या नोकरीत मैत्रीपूर्ण वातावरण नसू शकते. त्याने व्यवसाय केला तर तोटा दिसेल. हाच नियम मनोरमा आणि मणि या नावांना लागू होतो. मनोरमा नावात मनुष्य आहे आणि नाही (MAN-NO). याचा अर्थ तिला पुऊषाची गरज नाही. ती पुरुषी कामे करेल आणि तिच्या पतीवर वर्चस्व गाजवेल. यामुळे तिचे पतीपासून वेगळे होणे किंवा घटस्फोट होणे अशा घटना घडू शकतात. मणी नावात मन आणि नी समाविष्ट आहे. येथे NI हा नकारात्मक ध्वनी आहे जो ऱ्ध् म्हणून घेतला पाहिजे. राजमणी, रमणी, मनोहरी इत्यादी नावांवरही हाच परिणाम दिसून येतो. आधीच्या चर्चेत रमणीचे निरीक्षण करा ज्यात RAM मेंढा आहे. हा आवाज बकरीचे प्रतिनिधित्व करतो. ही व्यक्ती स्वभावाने हट्टी आणि स्वार्थी असू शकते. अशी व्यक्ती आपले निर्णय बदलणार नाही. इतर उदाहरणांची नावे रमेश आणि रामराव आहेत. त्याचप्रमाणे, विनोद नावामुळे अपयश आणि त्रासदायक जीवन येते कारण त्यात विन (विजय) आणि नाही (WIN-NO).  तसेच, नवीन जेथे आपण ना (नाही) आणि विन (विजय) पाहू शकतो. त्यामुळे हे लोक फारसे यशस्वी दिसत नाहीत. DI, DY, DHI इत्यादी ध्वनी असलेली नावे अंत दर्शवतात. उदाहरणार्थ, राजकुमारी डायनाचा अकाली वाहन अपघातात मृत्यू झाला. आपल्याला माहिती आहे की, महात्मा गांधी देखील त्यांच्या नावातील ध्वनी ‘धी’चे बळी होते. हा दृष्टिकोन आपल्या देशाच्या नावापर्यंत वाढवा, INDIA (DI) जे अंतर्गत दु:ख आणि संघर्षाचे प्रतिनिधित्व करते. या नावामुळेच नैसर्गिक साधनसंपत्तीने भरलेला आणि प्रतिभावान लोकांचा देश असला तरीही समृद्ध होण्यासाठी अपार कष्ट आहेत. त्याला भारत म्हणणे हा एक चांगला पर्याय आहे. Su सु’ने नाव सुरू झाले की कायदेशीर आणि पोलीस अडचणीत येण्याचा धोका असतो. एल् चा अर्थ खटल्यासारखा वाटतो. त्यामुळे सुमन, सुरेंद्र, सुनील ही नावे रोज नवीन प्रसंगांशी झगडताना पाहिली जातात. सुनील या नावाचे निरीक्षण करा. ज्याच्या शेवटी शून्य आहे. NILजे आजार किंवा शून्य दर्शवते. एकतर त्याला आरोग्याच्या विकाराने ग्रासले असेल किंवा तो त्याच्या आयुष्यात कोणतीही संपत्ती जमा करू शकत नाही. सुधा, सुशीला, सुजाता, सुगुणा इत्यादी नावांवरही हाच परिणाम दिसून येतो. ईश्वर, नागेश्वर, राजेश्वर या नावांमध्ये ध्वनी युद्ध आहे. यामुळे त्यांचे जीवन नेहमीच लढाईसारखे होईल. त्यांना किमान यश मिळविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. ते इतरांच्या हितासाठी बोलत असले तरी त्यांचा गैरसमज होतो.

Advertisement

मेष

नोकरीत असाल तर आपल्या कामावर आपले वरिष्ठ खुश होऊन आपली पदोन्नती होण्याची शक्मयता आहे. स्वतंत्र व्यवसायात असाल तर उद्योगात भरभराट होण्याचा संभव आहे. आपल्या वडिलांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आपल्याला चांगले लाभेल. समाजात आपल्याला मानमरातब, प्रतिष्ठा लाभण्याची शक्मयता आहे. एकंदरीत हा आठवडा आपल्याला सुख-समाधान देऊन जाईल.

उपाय : महादेवाची उपासना करा.

वृषभ

हा आठवडा आपल्याला उत्तम जाणार असे दिसते. सणासमारंभाच्या निमित्ताने भावंडांच्या गाठीभेटी होण्याची शक्मयता आहे. आपल्या मित्रांच्याही भेटी होतील. काही चांगल्या वस्तूंची खरेदीपण होईल किंवा वस्तू भेट म्हणून सुद्धा मिळण्याची शक्मयता आहे. समाजात एक प्रकारचे प्रतिष्ठित स्थान प्राप्त होण्याचा संभव आहे. या आठवड्यात आपण सर्व दृष्टीने फायद्यात आहात असे वाटते.

उपाय : रोज घरातून बाहेर पडताना कपाळावर गंध लावा.             

मिथुन

सणा-सुदीचे दिवस आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च हा होणारच असे वाटते. पण सांभाळून खर्च करा. हातातील पैसा योग्य ठिकाणी खर्च करा. परदेश गमनासाठी खर्च होण्याची पण शक्मयता आहे. आपण कदाचित यावेळी देवाधर्मात रमत असाल तर खूपच चांगली गोष्ट आहे. त्यातून आपल्याला आनंद मिळण्याचीही शक्मयता आहे.

उपाय : महालक्ष्मीची उपासना करा.

कर्क

मन चंचल होण्याची शक्मयता आहे. त्याला ताब्यात ठेवण्याची गरज आहे. भरकटू नका. मनावर आणि आपल्या बोलण्यावर आपण संयम ठेवण्याची नितांत गरज आहे. जोडीदाराबरोबर थोडे संयमाने घ्या. त्याचे सहकार्य नक्की मिळेल. कामामध्ये नाव कमविण्याची इच्छा आपण नक्की बाळगून असाल. पण तिथे पण थोडा संयम पाहिजे असे वाटते. प्रामाणिकपणे काम करा. यश मिळेल.

उपाय : नित्यनेमाने ॐ नम: शिवायचा जप करा.

सिंह

या आठवड्यात आपल्या वाणीवर संयम ठेवण्याची गरज आपल्याला भासणार आहे. कुटुंबातील व्यक्तींचे म्हणावे तितके सहकार्य मिळण्याची शक्मयता कमी वाटते. पण शांत रहा. वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत काही चर्चा चालू असेल तर उगाच सल्ले द्यायला जाऊ नका. देण्याघेण्याचा व्यवहारही काही करत असाल तर तो सध्या लांबणीवर टाका. शक्मयतो शांत राहण्याचा प्रयत्न करा.

उपाय : हनुमान चालीसाचा नित्य पाठ करा.

कन्या

या आठवड्यात भलते साहस करू नका, असे ग्रह सांगत आहेत. आपल्या धाकट्या भावंडांसोबत अथवा मित्रांसोबत काही मतभेद होण्याची शक्मयता आहे. मनाची चंचलता वाढल्यामुळे आपल्या कामात म्हणावे तसे लक्ष लागण्याची शक्मयता कमी आहे. त्यामुळे आधी मनाला शांत करा आणि मग प्रयत्नपूर्वक लक्ष द्या. खाण्या-पिण्याची चंगळ होण्याची शक्मयता आहे. पण पोटाची काळजी घ्या.

उपाय : अपंगाना मदत करा.

तूळ

सगळी सुखे एकीकडे आणि सर्वांपलीकडचे आईचे सुख एकीकडे. त्या सुखाला तोड नाही. या आठवड्यात आपल्याला मातृसुखाचा पुरेपूर आनंद लुटता येण्याची शक्मयता आहे. वाहन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तो विचार पूर्णत्वाला जाण्याची शक्मयता आहे. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत काही देण्या-घेण्याचे व्यवहार करत असाल तर पूर्ण विचारांती कराल तर यश मिळण्याची शक्मयता आहे.

उपाय : रोज तुळशीला पाणी घाला.

वृश्चिक

मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या मार्गदर्शनाची मुलांना गरज भासण्याची शक्मयता आहे. अचानक धनलाभाची म्हणजे लॉटरी वगैरे तत्सम प्रकारातून लाभाची शक्मयता आहे. आपल्याकडून काही उपासना पण घडण्याचा संभव आहे. हरकत नाही त्या उपासनेमुळे कदाचित आपल्याला ऊर्जा मिळेल आणि आपल्या विचारांना चालना मिळेल. मुलांच्या प्रगतीसाठी याचा निश्चित उपयोगच होईल.

उपाय : दर मंगळवारी मारुतीच्या देवळात जाऊन दर्शन घ्या.

धनु

नोकरीच्या शोधार्थ असाल तर सरकारी नोकरी मिळण्याची शक्मयता आहे. थोडे कष्ट घ्यावे लागतील, पण यश मिळेल. आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी लागेल. काहीतरी चिंता मन खात राहील. पण चिंतेने आरोग्य बिघडण्याची शक्मयताच जास्त असते. त्यामुळे चिंता सोडा आणि सतर्क रहा. आरोग्याची काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे. शांत रहा.

उपाय : सद्गुरुची उपासना करा.

मकर

या आठवड्यात जोडीदाराचे सहकार्य मिळण्याची शक्मयता कमीच आहे. पण धीराने घ्या. संयमानेच सर्व काही साध्य होते. आपला भागीदारीत व्यवसाय असेल तर त्याच्याकडूनसुद्धा सहकार्याची अपेक्षा सध्या ठेवू नका. नसत्या वादावादीतही पडू नका. त्याने काहीच साध्य होणार नाही. कोर्टात काही केस चालली असल्यास पुढची तारीख घ्या. गडबड नको. यश मिळण्याची शक्मयता सध्या कमी आहे.

उपाय : शनि महात्म्य वाचा.

कुंभ

लॉटरीसारख्या प्रकारातून अचानक धनलाभ होण्याची शक्मयता आहे. पण लॉटरी व्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने आलेल्या पैशाचा सहजासहजी स्वीकार करू नका. तो पैसा किती योग्य व कोणत्या मार्गाने आलेला आहे याची शहानिशा करा आणि मगच स्वीकारा. अन्यथा पश्चात्तापाची वेळ येण्याची शक्मयता आहे. मन चंचल, अस्वस्थ होण्याची शक्मयता आहे. स्वत:ला सांभाळा.

उपाय : दर शनिवारी शनिला तेल वाहा.

मीन

आपल्याकडून काही धर्माचे कार्य घडण्याची शक्मयता आहे. जप-तपादी पुण्य कार्यामध्ये आपला हा आठवडा जाण्याची शक्मयता आहे. ज्यामुळे तुमच्या मनाला एक सात्विक समाधान व आनंद मिळेल. देवदर्शनासाठी लांबचा प्रवास घडण्याची देखील शक्मयता आहे. संतांचा सहवास मिळेल. आपणास काही सूचक स्वप्ने पडण्याचा संभव आहे. घरातील वृद्ध मंडळींचे सहकार्य व आशीर्वाद मिळेल.

उपाय : दररोज श्री दशरथकृत शनि अष्टकम् वाचा.

Advertisement
Tags :

.