राशि भविष्य
दि. 11-8-2024 ते 17-8-2024 पर्यंत
मेष
अपेक्षित रिझल्ट मिळण्याकरता काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. आर्थिक उलाढाल करत असताना एखादी समवयीन व्यक्ती मदत करू शकते. रोजच्या व्यवहारांमध्ये बुद्धिमत्तेचा चांगला उपयोग करून घ्या. प्रिय व्यक्तीशी वाद संभवतो. कुटुंबीयांसोबत पिकनिकला जाऊ शकता.
काळा रंग वापरू नका.
वृषभ
स्वत:च्या बाबतीत, आपल्या कुटुंबीयांच्या बाबतीमध्ये वैद्यकीय समस्या जाणवतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या मनातील प्लॅन्स इतरांना अगोदरच कळल्यामुळे थोडी अडचण होण्याची शक्यता आहे. मीटिंगमध्ये किंवा वरिष्ठांशी बोलताना शब्द जपून वापरा.
बेलपत्र जवळ ठेवावे.
मिथुन
तुमच्यातील व्यवहारचातुर्य आणि पुढील विचार करून पाऊल टाकण्याची वृत्ती यामुळे काही अडचणींवरती सहजपणे मात कराल. या आठवड्यात कुठल्या ना कुठल्या गोष्टींमध्ये कॉम्प्रमाईज करावे लागू शकते. परिचित व्यक्तीकडून आर्थिक नुकसानीची संभावना आहे.
लाल कपडा दान द्या.
कर्क
आर्थिक उलाढाल करत असताना एखादी समवयीन व्यक्ती मदत करू शकते. रोजच्या व्यवहारांमध्ये बुद्धिमत्तेचा चांगला उपयोग करून घ्या. प्रिय व्यक्तीशी वाद संपवतो. कुटुंबीयांसोबत पिकनिकला जाऊ शकता. नातेसंबंध सुधारण्यासाठी प्रयत्न कराल.
काळा रंग वापरू नका.
सिंह
अगदी क्षुल्लक कारणामुळे तब्येत बिघडू शकते. मित्रमंडळी सोबत एखाद्या पिकनिकला जाण्याचा प्लॅन कराल. बाहेरील खाणे खाताना किंवा पार्टी करताना स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. या आठवड्यात कुठल्या ना कुठल्या गोष्टींमध्ये तडजोड करावी लागू शकते.
निळे फूल पाण्यात सोडा.
कन्या
आरोग्य, कुटुंब आणि धनप्राप्ती यामध्ये असलेला संघर्ष प्रकट होईल, पण सबुरीने काम घ्या. तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग होऊ शकतो. मालमत्तेसंबंधी व्यवहार क्वचित राहू शकतात. एजंट लोकांना फायद्याचे दिवस आहेत पण कष्ट जास्त करावे लागतील.
रिकामे साखरेचे पोते घरी ठेवा.
तूळ
तुमचा प्रत्येक मुद्दा बरोबर असला तरी कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दल माहिती करून न घेता ठाम मत बनवल्यामुळे काही लोक तुमचा विरोध करतील. व्यावसायिकांना प्रत्येक पाऊल सांभाळून उचलणे गरजेचे असेल. कॉम्पिटेशनमुळे किंवा इतर काही कारणामुळे व्यवसायावर परिणाम होऊ शकतो.
वृश्चिक
जुने नातेसंबंध कामी येतील. पैशाची देवाणघेवाण करत असताना सावध राहिले पाहिजे. मन विचलित करणारी एखादी घटना घडू शकते. तुमच्या मित्रमंडळींपैकी एखादी व्यक्ती नको त्या गोष्टीचा आग्रह करेल ज्याला नाही म्हणणेच योग्य ठरेल.
धार्मिक ठिकाणी फळे वाटा.
धनू
घरातील कामांकरता किंवा काही नवीन सजावटी करता पैसे खर्च होतील, पण समाधान मिळेल. शेजाऱ्यांशी वाद टाळावा. हाताखालील व्यक्तींकडून चूक घडेल. नोकरीत तणाव जास्त वाढेल. बोलताना सांभाळून बोला नाही तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो.
जोड केळे धार्मिक ठिकाणी ठेवा.
मकर
लहानशा आजारामुळे मन:स्ताप होऊ शकतो. वैद्यकीय बाबतीत खर्च होणार असे दिसते. ऐकावे जनाचे करावे मनाचे याप्रकारे वागाल तर मन:स्ताप होणार नाही. बुधवार, गुरुवार महत्त्वाची बातमी कळेल वास्तव जगातील अडचणींना सामोरे जाताना कुटुंबीयांची साथ मिळेल.
मध दान द्या.
कुंभ
मच्या मताची किती किंमत आहे हे पाहूनच मत व्यक्त करा. अपेक्षित रिझल्ट मिळण्याकरता काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. या आठवड्यामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका.
पावसाचे पाणी अंघोळीला वापरा.
मीन
तब्येतीची तक्रार जाणवू शकते. शक्यतो प्रवास टाळा. कॉम्पिटेशनमुळे किंवा इतर काही कारणामुळे व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. जुने नातेसंबंध कामी येतील. रिकामे साखरेचे पोते घरी ठेवा. घरात सहज ठेवलेली गोष्ट न सापडल्यामुळे शोधाशोधीत बराच वेळ जाईल.
पक्षांना दाणे घाला.
टॅरो उपाय : तुमच्या वैवाहिक जीवनात भांडणे होत असतील तर ही समस्या सोडवण्यासाठी ज्योतिषशास्त्राrय उपायांचा अवलंब करावा. पती-पत्नीमधील भांडणे कमी करण्यासाठी बेडरूममध्ये पोपटांच्या जोडीचे पेंटिंग लावावे. असे केल्याने प्रेम वाढेल आणि मनातील कटुता संपुष्टात येईल.