For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशीभविष्य

06:20 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशीभविष्य
Advertisement

वक्री शनिचे परिणाम

Advertisement

विज्ञान आपल्याला दाखवते की आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गांवर एका दिशेने फिरतात, म्हणजे मागे जाणारे ग्रह केवळ उलट दिशेने फिरताना दिसतात. कारण आपण त्यांना पृथ्वीवरील आपल्या दृष्टीकोनातून पाहतो. तरीही, ज्योतिषशास्त्रात, ग्रहांची स्पष्ट प्रतिगामी गती आवश्यक वैश्विक उलथापालथ करते असे मानले जाते. प्रत्येक ग्रह वेगळ्या गतीने फिरतो आणि विशिष्ट रीतीने आपण कसे विचार करतो, वागतो आणि अनुभवतो, यावर प्रभाव टाकून, विशिष्ट वारंवारतेने कंपने करतो असे मानले जाते. जेव्हा एखादा ग्रह प्रतिगामी होतो, तेव्हा त्याची शक्ती कमी होते आणि आम्हाला आमचे पुढील मार्ग धीमे करण्यासाठी, प्रतिबिंबित करण्यासाठी आणि पुन्हा परिभाषित करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. प्रतिगामी गतीच्यादरम्यान विसंगती आणि वाईट सवयी अनेकदा प्रकाशात आणल्या जातात, सुधारणेची क्षेत्रे हायलाइट करतात. शनि- चिकाटी, भव्य रचना आणि शिस्तीचा ग्रह आहे. जेव्हा वलय असलेला हा ग्रह मागे सरकतो तेव्हा तो आपल्याला स्वत:चे नियम बनवण्यास प्रवृत्त करतो. जसजसे प्रशिक्षणाची चाके बंद पडतात आणि आम्ही स्वत:ला वाचवायचे बाकी असतो, तसतसे आम्हाला काही कठीण कर्मिक धड्यांचा सामना करावा लागू शकतो ज्यामुळे आम्हाला अधिक जबाबदार लोक बनविण्यात मदत होईल. तथापि, शनिची प्रतिगामी सगळ्याच बाबतीत अंधकारमय नाही. तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न, परिश्र्रम आणि अंत:करणाने केले तर, जेव्हा तो थेट पुढे जाईल (मार्गी होईल) तेव्हा तुम्हाला चांगली परतफेड मिळेल हे निश्चित. समजा तुम्ही एखादे काम करायला बाहेर पडला आहात, अर्धा रस्ता गेल्यानंतर तुम्हाला आठवते की एखादी वस्तू    किंवा एखादे काम करायचे राहून गेले आहे, तुम्ही परत फिरता ते काम पूर्ण करता आणि मग पुन्हा आपल्या मार्गाला लागता. वक्री ग्रहाच्या बाबतीमध्ये असेच होते. वक्री ग्रहाला तुम्ही यादृष्टीने पाहू शकता की, त्याच्याकडे राहिलेली कामे पूर्ण करण्याकरता प्रचंड ताकद आलेली आहे. शनी महाराज हे मुख्य रूपाने न्यायदेवता हा रोल निभावतात. त्यामुळे ज्यांनी त्यांच्या मनाविऊद्ध कामे केलेली आहेत, म्हणजे अनीती, भ्रष्टाचार, कारण कुणाला त्रास देणे, नीतिमत्ता सोडून वागणे त्यांना येणारा काळ हा अवघड जाणार यात काही शंका नाही. एकंदर  परिणाम  विचारात घ्यायचे झाले तर सूर्याची स्थिती, नक्षत्र आणि योग यांचा विचार करता असाध्य रोगांवरती औषध सापडणे, नवीन व्हॅक्सिन तयार होणे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी घटना घडणे, भ्रष्टाचारी लोकांचे पितळ उघडे पडणे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट,   सीबीआय यांच्या धाडी पडणे, त्यात मोठे लोक सापडणे, न्यायालयीन व्यवस्थेमध्ये  बदल होणे, जन आंदोलन होणे यासारख्या घटना पहायला मिळतील. अडीच वर्षांत शनि एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. शनि सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत आहे आणि या राशीत वर्षभर राहील. म्हणजेच यावषी शनिचे संक्रमण होणार नाही. पण शनि प्रतिगामी आणि मार्गी दोन्ही राहील. सूर्यपुत्र आणि कर्माचा दाता शनि 29 जून 2024 रोजी रात्री 11:40 वा. कुंभ राशीत प्रतिगामी (वक्री) झाला आहे. शनिच्या हालचाली, नशीब किंवा स्थितीतील बदलांचा संपूर्ण जगावर परिणाम होतो, त्यामुळे सर्व राशींवर शनिच्या प्रतिगामी प्रभावाविषयी जाणून घेऊया. वैदिक ज्योतिषात शनि हा जबाबदार ग्रह मानला जातो. तो एक शिक्षक आहे आणि लोकांना पद्धतशीरपणे जगायला शिकवतो. या वैशिष्ट्यांच्या आधारे एखादी व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनातील उद्दिष्टे साध्य करू शकते. शनि व्यक्तीला आपली ऊर्जा योग्य दिशेने वापरण्याची परवानगी देतो. जर तुम्ही तुमची उर्जा योग्य प्रकारे वापरली तर तुमच्या कृतींचे सकारात्मक परिणाम होतील, परंतु जर तुम्ही तुमची ऊर्जा चुकीच्या उद्देशासाठी किंवा चुकीच्या दिशेने वापरत असाल तर तुम्हाला नकारात्मक परिणाम मिळतील. कुंभ राशीतील शनिच्या प्रतिगामी गतीचा इतर सर्व राशींवर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया.

मेष राशीसाठी शनिदेव दहाव्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे. आता तुमच्या अकराव्या घरात प्रतिगामी होईल. करिअरबद्दल बोलायचे झाले तर नोकरदार लोकांसाठी शनिची प्रतिगामी स्थिती अनुकूल मानली जाते. या काळात सर्व अडचणी असूनही तुम्ही तुमच्या कामात चांगले यश मिळवाल. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना शनि प्रतिगामी काळात चांगला नफा मिळेल. मेष राशीच्या लोकांना पैसे मिळवण्यात अडचणी आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते.

Advertisement

वृषभ राशीमध्ये, शनी 9 व्या आणि 10 व्या घराचा स्वामी आहे आणि सध्या तुमच्या 10 व्या घरात प्रतिगामी आहे. या स्थितीमुळे शनिदेवाला करिअरमध्ये उतरती कळा लागू शकते. कौटुंबिक वाढीचे समान परिणाम आपण पाहतो. वृषभ राशीच्या लोकांवर जास्त कामाचा ताण असू शकतो. ज्यामुळे त्यांची शक्ती आणि वेळ वाया जाऊ शकतो.  या लोकांना व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक बाजूने, कुंभ राशीतील शनि प्रतिगामी तुम्हाला चांगले आर्थिक लाभ देईल, परंतु तरीही तुम्ही बचत करू शकणार नाही.

मेष

या आठवड्यात आपल्या नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या भेटीगाठीत वेळ छान जाण्याची शक्मयता आहे. एखाद्या घरगुती समारंभात सहभागी व्हाल. काही मौल्यवान वस्तूंची देवाण घेवाण होण्याचाही संभव आहे. समाजात श्रेष्ठत्व, प्रतिष्ठा मिळण्याचीही संभावना आहे. या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या आपल्याला लाभ होण्याची शक्मयता आहे. आनंदी रहा.

उपाय: मारूतीची उपासना करा.

वृषभ

हा आठवडा आपल्याला खर्चिक जाणार असे दिसते. सांभाळून खर्च करा. विनाकारण खर्च नको. तब्येतीला सांभाळून रहा. वाहन जपून आणि नियमांचे पालन करून चालवा. परदेशगमनाची संधी आली तर दुर्लक्ष करू नका. आलेल्या संधीचा फायदा घ्या. नाहीतर नंतर पश्चाताप करून काही फायदा नसतो. एकूण हा आठवडा आपल्याला सांभाळून रहायला सांगतो आहे.

उपाय: शक्यतो रोज कुलदेवतेची पूजा करा.

मिथुन

स्वभाव थोडा चिडचिडा होण्याचा संभव आहे. पण शक्मयतो मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक वेळी तुम्हीच बरोबर असता असे नाही. समोरील माणसाच्या दृष्टीकोनातून ते बरोबरच असेल. समजून घेण्याचा प्रयत्न करा व शांत रहा. जोडीदाराला समजून घ्या. त्याचे तुम्हाला नक्कीच सहकार्य असेल. तुमच्या काही विशिष्ठ कार्यासाठी तुम्हाला शाबासकीची थाप मिळेल.

उपाय: रोज संध्याकाळी देवासमोर तुपाचा दिवा लावा.

कर्क

आपल्या कुटुंबासोबत हा आठवडा छान घालवाल. रोजच्या दैनंदिन संसारिक कटकटीतून हा आठवडा आपल्याला सुखावह जाण्याची शक्मयता आहे. त्याचा पुरेपूर आनंद घ्या. वडिलोपार्जित संपत्तीबाबत काही चर्चा वाटाघाटी चालल्या असतील तर तुमच्या मनासारखे घडण्याची शक्मयता आहे. आपल्या बोलण्यातून आपल्या बुद्धीची कुवत लोकांना चांगलीच कळेल आणि तुमची छाप पडेल.

उपाय: मुक्या प्राण्यांना खाऊ घाला.

सिंह

कष्टाचे फळ नक्की मिळेल. काळजी कऊ नका. आपल्या भावंडासोबत, मित्रपरिवारासोबत हा आठवडा छान जाईल. नोकरीत अथवा उद्योगधंद्यात आपले ध्येय गाठण्यासाठी थोडे जास्त प्रयत्न करावे लागण्याची शक्मयता आहे. आपल्या कामावर अथवा कामाच्या पद्धतीवर वरिष्ठ खूश होतील. कामासाठी अगर मित्रासोबत छोटे मोठे प्रवासही घडण्याची शक्मयता आहे. खाण्यापिण्याची चंगळ होईल.

उपाय: श्री गणेशाची आराधना करा.

कन्या

या आठवड्यात आपल्याला वाहन सुख भरपूर आहे. मातेचा सहवास या आठवड्यात आपल्याला खूप सुखावून जाण्याची शक्मयता आहे. मातेची काळजी घ्या. तिचा आशीर्वादच आपल्याला तारून नेतो. काही जमिनीच्या देवाणघेवाणीचा विचार चालला असेल तर विचारपूर्वक व सांभाळून करा. काही भूमिगत धन पण मिळण्याची शक्मयता आहे. मिळेल त्या सुखाचा शांतपणे उपभोग घ्या.

उपाय: हनुमान चालीसाचे पाठ करा.

तूळ

मुलांकडे, त्यांच्या अभ्यासाकडे, त्यांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. त्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्यास त्यांना तुमच्या मदतीची अपेक्षा असण्याची शक्मयता आहे. विद्यार्थ्यांनो, मन चंचल होण्याची शक्मयता आहे. पण प्रयत्नाने मन ताब्यात ठेवायला शिका. नवीन काही शिकण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर नक्की यश मिळेल. प्रयत्न अवश्य करा.

उपाय: दर सोमवारी शंकराला बेल वाहा.

वृश्चिक

तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या नकळत तुमचे गुप्त शत्रू तुम्हाला त्रास देण्याची शक्मयता आहे. सांभाळून रहा. चोरापासून आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवण्याची गरज आहे. हा आठवडा तुम्हाला अतिशय सावधतेने कार्य करण्यास सांगतो आहे. काळजी कऊ नका. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नियमितपणा आणि सावधानता असली तर यश मिळण्यास वेळ लागणार नाही.

उपाय: रोज कपाळाला गंध लावूनच बाहेर पडा.

धनु

आपल्या दैनंदिन प्राप्तीमध्ये वाढ होण्याची चिन्हे आहेत. आपली नोकरी जर रोजगारीवर असेल तर पगार वाढण्याची शक्मयता आहे. स्वतंत्र व्यावसायिक असाल तर आपल्या पत्नी/पतीचा सल्ला घेण्यास हरकत नाही. कदाचित तो सल्ला तुम्हाला अनुकूल असेल. आणि व्यवसाय भागीदारीत असेल तर मग भागीदाराचा सल्ला घ्यावाच. जोडीदाराचे सहकार्य चांगले असेल.

उपाय : दर गुरूवारी मंदिरात जाऊन दत्त दर्शन घ्या.

मकर

वाहन सांभाळून व नियमांचे पालन करून चालवा. अन्यथा पस्तावाची पाळी येण्याची शक्मयता आहे. अचानक धनलाभ संभवतो. पण ते धन चांगले व चांगल्या मार्गाने येते की नाही याकडे मात्र लक्ष ठेवा. या आठवड्यात मन थोडे चंचल, अस्वस्थ राहण्याची शक्मयता आहे. शक्मयतो कारणाशिवाय झाडाझुडपात जाणे टाळा. स्वत:ला आणि इतरांनाही सांभाळा.

उपाय: दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनीला तेल वाहा.

कुंभ

शक्मय होईल तेवढे धर्माचरण, तपाचरण करीत रहा. साडेसाती सुऊ आहे. स्वत:च्या कामात किंवा व्यवसायात प्रामाणिक राहिलात तर शनीच्या परीक्षेत तुम्ही पूर्णपणे पास व्हाल. मन चंचल होण्याची शक्मयता आहे. शांत राहण्याचा प्रयत्न करा. वडिलांची काळजी घ्या. शक्मयतो त्यांच्या सोबतच रहा. त्यांच्या सल्ल्यानेच वागा. तेच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील.

उपाय: इष्टदेवतेचे नामस्मरण करा.

मीन

‘कष्टाविण फळ ना मिळते’ या उक्तीची आपल्याला प्रचिती या आठवड्यात येण्याची शक्मयता आहे. आपल्याला कष्ट तर करावे लागणारच आहेत. पण त्याचे फळ आपल्याला आता मिळण्याची दाट शक्मयता आहे. मानमरातब मिळेल. समाजातील दर्जा वाढेल. नोकरीत असाल तर प्रमोशन मिळण्याची शक्मयता आहे. व्यवसायात असाल तर उद्योगधंद्यात प्रगती होण्याचा संभव आहे.

उपाय:महालक्ष्मीची उपासना करा.

Advertisement
Tags :

.