For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य

06:01 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य
Advertisement

मेष

Advertisement

चांगल्या संधी मिळण्याचे संकेत आहेत. या संधी जवळच्या नातेवाईकांमुळे किंवा मित्रांमुळे मिळतील. नोकरदार वर्गाला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी प्राप्त होऊ शकते. आठवड्याची सुऊवात मनपसंत व्यक्तीच्या भेटण्याने होईल. कामाच्या ठिकाणी इतरांच्या तुलनेत तुम्ही काही प्रमाणात रिलॅक्स असाल. कोर्टकचेरीच्या संदर्भात लेखी व्यवहार पूर्ण करताना सावध रहा.

बत्तासे दान द्यावे

Advertisement

वृषभ

मनात नसताना प्रवास करावा लागू शकतो. गरजा आणि आवड यातील फरक समजून पैसे खर्च करावेत. नाहीतर वायफळ खर्च होईल. कामाच्या ठिकाणी इतर लोक तुमच्या स्वभावाचा फायदा उचलू शकतात. पैशांची येणी वसूल करण्याची गरज आहे. तुम्ही ठरवले तर हातात घेतलेले काम पूर्ण कराल. विद्यार्थी वर्गाला अनुकूल काळ आहे. व्यावसायिकांनी थोडे सबुरीने घ्यावे.

पिवळा रुमाल जवळ ठेवावा

मिथुन

काही बाबतीमध्ये संघर्ष जाणवेल. हा संघर्ष आर्थिक किंवा भावनिक स्वऊपाचा असू शकतो. तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. छोट्या-मोठ्या आजारांनी त्रस्त होण्याची शक्मयता आहे. कुणाकडे पैसे अडकले असतील तर ते वसूल करण्याकरता योग्य वेळ आहे. कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल. जितका शक्मय आहे तितका स्वत:च्या कामाशी मतलब ठेवा.

फळांचे दान द्यावे

कर्क

या आठवड्यात काही प्रमाणात रिलॅक्स आणि हलके वाटेल. कामांमधील अडचणी दूर होतील. कामे पूर्ण होण्यास वेळ लागला तरी तुम्ही केलेल्या कष्टाचे चांगले फळ तुम्हाला प्राप्त होईल. मनातील प्लॅन किंवा गुप्त गोष्टी कितीही जवळचा मित्र किंवा मैत्रीण असली तरी सांगू नका. घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या पद्धतीविषयी काळजी वाटू शकते. मुलांच्या अभ्यासावरून आई-वडिलांमध्ये चिंतेचे वातावरण राहील. तब्येतीची योग्य ती काळजी घ्या.

मुंग्यांना साखर घालावी

सिंह

या आठवड्यात काही घटना अशा घडू शकतात की, ज्यामुळे तुमचा स्वाभिमान किंवा इगो दुखावला जाण्याची शक्मयता आहे. अशावेळी मनावर संयम ठेवून भविष्यातील अप्रिय घटना टाळण्याचा प्रयत्न करा. धनप्राप्ती करता कष्टाचे प्रमाण वाढवावे लागेल. कुटुंबात एखादी घटना अशी घडेल की ज्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल. पती-पत्नीमध्ये कलह बऱ्याच अंशी कमी होतील. आर्थिक नियोजन योग्य रीतीने केले तर फायदा होईल.

उगवत्या सूर्याचा फोटो जवळ ठेवा

कन्या

आळस झटकून कामाला लागण्याची गरज आहे. कामांचे नीट नियोजन केल्यास कामे वेळेवर पूर्ण होतील. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करून चालणार नाही. छोटे मोठे आजार नंतर मोठा त्रास देऊ शकतात. आर्थिक बाबतीत समाधानकारक आठवडा असेल. कामाच्या ठिकाणी सोबत काम करणाऱ्या बरोबर योग्य तो व्यवहार ठेवा. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्याने वैवाहिक जीवनात ताणतणाव जाणवू शकतो.

हिरवे मूग दान द्यावे

तूळ

तुमच्या समस्या मित्रांसोबत शेअर केल्याने त्यांच्या सल्ल्याने मदत होईल, विद्यार्थी यश मिळवतील. तुमच्या दैनंदिन दिनक्रमात अडथळा आल्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. वैवाहिक जीवनातही काही प्रमाणात अशांतता राहील. उत्स्फूर्तपणे नफा मिळण्याची शक्मयता असू शकते, म्हणून जोखीम घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, परंतु ध्येयाबद्दल फारसे गांभीर्य राहणार नाही.

मजुरांना दूध दान द्यावे

वृश्चिक

अज्ञात स्रोताकडून अनपेक्षित आनंददायी बातम्या येतील. उत्कृष्ट नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा एक शुभ काळ आहे. विवाह किंवा प्रेमप्रकरणासाठी वेळ संमिश्र्र आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेचा सदुपयोग करता येईल. कामाच्या ठिकाणीही प्रतिकूलतेला सामोरे जावे लागेल. नंतरच्या काळात थोडी सुधारणा होईल आणि तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकू शकाल.

घार्मिक जागी दीप दान करा

धनु 

कार्यक्षेत्रातील प्रगतीमुळे तुम्ही समाधानी असाल. पती आणि पत्नी यांनी एकमेकांसोबत थोडा वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा, बिघडलेल्या गोष्टींना सुधारण्यात वेळ घालवाल. आपल्या पैशांचा सुज्ञपणे वापर करा. तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्याची क्षमता तुमच्यात आहे, यावेळी तुमच्या करिअरमध्ये प्रगती शक्मय आहे. अविवाहितांसाठी लग्नाच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

कोहाळा दान द्या

मकर

भूतकाळ विसरून वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी नवीन संधींमध्ये तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थी वर्ग अभ्यासात पूर्ण पैसा देऊ शकणार नाही, प्रेमप्रकरणातही दृढता येईल. व्यवसायात नवीन योजना अमलात आणल्या जातील. अनियमिततेमुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अडथळे येतील. शब्दांवर संयम ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत इच्छित पदोन्नतीची शक्मयता आहे. बचत वाढेल. तुमचा प्रभाव वाढेल.

 3 लवंगा दिव्यात घालाव्या

कुंभ

घर बदलाची चर्चा होऊ शकते, मालमत्तेतून लाभ होण्याची चिन्हे आहेत. तुम्ही आधीच तोडलेल्या संबंधांमुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. मुलांच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते. काही अडचणी उपस्थित होतील, संघर्ष सोडवताना प्रभावाच्या कमकुवत स्थितीमुळे कठीण होईल. म्हणून शॉर्टकटचा अवलंब न करता सुरक्षित मार्गाने पुढे जा. योजनेनुसार काम केले जाऊ शकत नाही.

5 हळकुंड जवळ ठेवावे

मीन

टीका आणि विरोधाचा सामना करावा लागू शकतो. जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन व्यावहारिक बनवण्याचा प्रयत्न करा. जवळपास प्रत्येक स्तरावर तडजोड करणे आवश्यक आहे, तुम्हाला धीर धरावा लागेल आणि एखाद्या गोष्टीच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा आणू नये, आरोग्याबाबत जागरूक रहावे, शिक्षण, स्पर्धेत यशस्वी व्हाल.

हळदीचा टिळा लावा

टॅरो उपाय : काही वेळा असे होते की लहान मुलांना अन्न अंगाला लागत नाही.   कितीही पौष्टिक आहार दिला तरी  शरीर सुकल्या सुकल्यासारखेच असते. अशावेळी वैद्यकीय उपचारांबरोबरच खालील उपाय करून पहावा. कोणत्याही शनिवारी  मुलाला पाठीवर झोपवावे. पाठीवर तिळाचे तेल व्यवस्थित चोळावे. खाण्याचे पान  चावून चावून चोथा झाल्यानंतर मुलाच्या पाठीवर कण्यावर चोळावे. हा उपाय आईने करावा.

Advertisement
Tags :

.