For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य

06:01 AM Jun 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य
Advertisement

रविवार दि.23 ते शनिवार दि. 29 जूनपर्यंत

Advertisement

मेष  

तुमच्या मनात नसताना लोक तुम्हाला सल्ला देण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे राग येण्याची शक्मयता आहे. ऑफिसमध्ये भांडण होण्याची शक्मयता आहे. या काळात तुमचे वर्तन अधिक आक्रमक असेल. वैवाहिक जीवनात काही आंबट, काही गोड असेल. विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल. नातेसंबंध, संधी आणि विरोध गुऊवारी तुमच्या आयुष्यात एकत्र येऊ शकतात.

Advertisement

मंदिरात जाण्याचा परिपाठ ठेवा.

वृषभ

घरातील एखाद्या व्यक्तीच्या वर्तनामुळे संपूर्ण घराचे वातावरण बिघडू शकते,   अशा वेळी समजूतदारपणा दाखवणे गरजेचे असेल. उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी समन्वय वगैरे निर्माण करणे आवश्यक आहे. रविवारी जिव्हाळ्याच्या क्षेत्रात निराशा येईल आणि सोमवारी तुम्हाला तुमच्या अनुभवातून माहिती मिळेल.

माशांना तांदूळ द्या

मिथुन

या आठवड्यात तुमचे लक्ष काम आणि आरोग्यावर असेल. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने जीवनात आनंद येईल. पैशाचा अपव्यय टाळा. तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. आपण आपल्या जोडीदाराचा विचार करत नाही असे जोडीदाराला कधीही वाटू देऊ नका. तुमच्या कल्पकतेमुळे  कित्येक कामांना वेळेवर पूर्ण होण्यासाठी मदत मिळेल आणि यासाठी तुमचे सहकारी तुमचे आभार मानतील.

चांदीचा तुकडा जवळ ठेवा

कर्क

तुमचा प्रभाव, करिष्मा आणि सर्जनशील प्रवृत्ती या आठवड्यात शिखरावर असतील. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांची अभ्यासाची आवड वाढेल. प्रेम संबंध दृढ होतील. व्यवसायात लाभ आणि प्रगतीच्या संधी मिळतील. तुम्ही विजयाच्या मार्गावर आहात. पण या काळात आपल्या कुटुंबाकडे लक्ष कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल.

9 वर्षाच्या आत वय असलेल्या 11 मुलांना प्रत्येकी 11-11 पेढे खाऊ घाला.

सिंह

नोकरदार लोकांच्या जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील, तुम्ही सध्या काय करत आहात आणि तुम्ही करत असलेले संपर्क भविष्यात फायदेशीर ठरतील. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या, त्याला तुमची गरज भासू शकते.  व्यावसायिकांना कुठल्याही गोष्टीला घाबरण्याची गरज नाही. थोडी रिस्क घ्यावी लागली तरी पुढे येणारा नफा चांगला असेल.

चांदीची भरीव गोळी जवळ ठेवा

कन्या 

नुकताच प्रवास झाला असल्यामुळे थोडा शीण जाणवेल, पुन्हा प्रवासाचा योग आहे पण शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. बाहेर किंवा फिरायला जाण्यापूर्वी घराच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था करा, कुटुंबात कोणाशी तरी वाद होऊ शकतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी उतावीळ होऊ नका, कदाचित तुम्ही ज्या भावनांना प्रेम समजता त्या फक्त आकर्षण असतील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.

पावसाळ्यातले पाणी घरात जपून ठेवा

तूळ

मुलांची अवास्तव गोष्टींकडे आवड वाढेल. व्यवसायात नवीन करार होतील. कायदेशीर बाबींमध्ये गाफिल राहू नका. प्रयत्न आणि सहकार्याने सुसंगतता येईल. नवीन संबंध फायदेशीर ठरतील. आर्थिक योजना राबविण्यात येतील. नवीन नोकरी मिळण्याची शक्मयता आहे. वाहनामुळे इजा होऊ शकते. मुलांकडून मदत मिळेल.

कोणतेही काम सुऊ करण्यापूर्वी पाण्याचा एक घोट पिऊन काम सुरू करा.

वृश्चिक

उत्पन्नाचे स्रोत वाढतील. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना तुमच्या आईसाठी आणि तुमच्यासाठी काहीसा त्रासदायक असू शकतो. या काळात प्रसारमाध्यमांशी संबंधित क्षेत्रातही लाभ होण्याची शक्मयता आहे. दिखाऊपणापासून दूर रहा. नवीन योजना राबवता येतील. महान लोकांच्या भेटीगाठी होतील. स्वयं अध्ययनाची आवड वाढेल.

हिरवा रंग शक्यतो कुठेही वापरू नका.

धनू

एखादी नको असलेली जबाबदारी अंगावर पडण्याची शक्मयता आहे पण याला संधी समजून ती मनापासून पूर्ण करण्याचे निश्चित करा, फायदा होईल. नवीन कामात व्यस्तता वाढेल. एखाद्या नातेवाईकाच्या किंवा स्वत:च्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. राजकीय क्षेत्रातील लोकांसाठी चांगला काळ आहे.

रात्री पाण्यात मूग डाळ भिजवून सकाळी ती कबुतरांना टाका.

मकर 

एखादी व्यक्ती जाणून बुजून तुमच्या कामांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकते. अशावेळी सबुरीने घेऊन, डोके शांत ठेवून त्याचा प्रतिकार कसा करता येईल, याचा विचार करा. घरातील वातावरण चांगले दिसणार नाही, सासरच्या मंडळींचा तणाव असू शकतो, आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. काळजी घ्या.

पिवळ्या रंगाची लाकडे जाळून त्याची राख नदी किंवा समुद्रात सोडून द्या.

कुंभ

प्रेमसंबंधांमध्येही काही मतभेद निर्माण होतील. त्यांच्याशी संबंधित बाबींना गंभीर टप्प्यावर आणण्याची गरज नाही, आत्मविश्वासाची कमतरता असेल. काही कामे होता होता राहतील. पण त्याकरता दुसऱ्यांना जबाबदार ठरवण्यापेक्षा ती कामे का झाली नाहीत त्याचा खोलवर विचार करणे आवश्यक आहे. इतरांवर अवलंबून राहणे सोडावे लागेल.

केशराचा टिळा कपाळावर लावा.

मीन

बहीण भावांसोबत विचारांच्या समन्वयाचा अभाव राहील. सहकाऱ्यांशी संबंधात दुरावा येईल. व्यक्तिमत्त्व कमकुवत दिसेल. या काळात एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पावर किंवा एखादे महत्त्वाचे काम पूर्ण व्हावे, अशी तीव्र इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण करण्याकरता तुम्ही जीवापाड प्रयत्न कराल.

कुमारिकांचा आशीर्वाद घ्या.

टॅरो उपाय: काही लोकांची नजर फार वाईट असते, त्यांनी एखाद्या गोष्टीचे कौतुक केले किंवा एखाद्या माणसाचे कौतुक केले की लगेच नुकसान होण्याची शक्यता असते. अशावेळी मीठ, मोहरी, थोडेसे केस, लसूण आणि कांद्याची टरफले,   सुकलेली मिरची विस्तवावर टाकावी आणि त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरून  फेकून द्यावी. जळल्यावर घाण वास आला तर नजर होती हे नक्की.

Advertisement
Tags :

.