राशिभविष्य
मेष
कुटुंबातील वातावरण चांगले रहावे याकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. आजारापासून सावध राहावे लागेल. लोक चांगुलपणाचा फायदा घेतील. तुमच्या जवळच्या मित्रांकडून तुमची फसवणूकदेखील होऊ शकते, पैसा जमा करण्यासाठी आणि बचत करण्यासाठी वेळ अनुकूल नाही. वाहन काळजीपूर्वक चालवा आणि केवळ अत्यावश्यक कामांसाठीच घराबाहेर पडा.
केशरी टिळा कपाळावर लावा.
वृषभ
ऑफिसमध्ये काम करत असताना एखाद्या व्यक्तीशी भांडण होऊ शकते आणि त्याचा नंतर पश्चात्तापसुद्धा होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या मित्रांशी सावधगिरी बाळगावी लागेल, कारण या काळात मित्रही शत्रू बनू शकतो. मानसिक संघर्षामुळे तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होईल. काळजी करू नका आणि मनापासून काम करा, तुम्हाला फायदा होईल.
कुत्र्याला खाऊ घाला
मिथुन
नक्की काय करावे याच्याबाबतीत संभ्रम उत्पन्न होण्याचा योग होत आहे. कन्फ्युजनमध्ये असाल तर दुसऱ्यांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. व्यापारी आणि उद्योजकांसाठी हा काळ आव्हानात्मक असेल. व्यवसायाच्या विकासासाठी खर्च केलेला पैसा भविष्यात चांगले परिणाम देईल. गुंतवणुकीतही चांगला परतावा मिळण्याची आशा आहे. प्रयत्न करत राहिल्यास यश निश्चित आहे.
अंगावर चांदी धारण करा.
कर्क
भावनांच्या आहारी जाऊन काहीही साध्य होणार नाही याची पुरेपूर जाणीव या आठवड्यात होईल. व्यवसायात नवीन योजना सुरू होतील. पैसा आणि आर्थिक बाबींसाठी हा काळ चांगला राहील. या काळात तुम्ही आर्थिक लाभाची अपेक्षा करू शकता. यावेळी प्रेम प्रकरणांमध्येदेखील तुम्हाला यश मिळण्याची शक्मयता आहे.
दरवाजावर लोखंडी कुलूप न लावता अन्य धातूंचा विचार करा.
सिंह
नको असलेली जबाबदारी अंगावर पडल्यामुळे चिडचिड होण्याची शक्मयता आहे. तुमच्या बाबतीत गैरसमज पसरण्याची शक्मयता आहे. या काळात तुम्ही भागीदारी आणि सहकार्याची कामे चांगल्या प्रकारे कराल. नोकरीत केलेली कामे फलदायी ठरतील. व्यवसायात नवीन योजनांवर काम करू शकता. गुंतवणूक वाढवण्यासाठी देखील ही चांगली वेळ आहे.
दूध आणि साखर दान करा.
कन्या
वेळ कमी आणि कामे जास्त असे प्रसंग येण्याची शक्मयता आहे जवळच्या नातेवाईकांशी एखाद्या विषयावर चर्चा होईल. वारा आणि वातावरणापासून स्वत:ची काळजी घ्या. संसर्ग टाळण्यासाठी वेळेवर औषध घ्या, वडिलांशी मतभेद होऊ शकतात पण काळजी करू नका, लवकरच सर्व काही ठीक होईल. सर्व निर्णय विचारपूर्वक घ्या.
काळे किंवा पांढरे तीळ पाण्यात सोडा.
तूळ
आजूबाजूच्या व्यक्तींचे वागणे तुमच्या हातात नाही हे मनात पक्के ठरवा आणि त्यानुसार त्यांच्याशी वागण्याचा प्रयत्न करा. मनस्ताप होणार नाही. तुम्ही कठोर परिश्र्रम केल्यास प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात, तुमचे काही पैसे आरोग्य आणि औषधावर खर्च होऊ शकतात. सामाजिक कार्यात यश मिळेल. मनात शांती आणि आनंदाची भावना राहील.
मंदिरात केळी दान द्या.
वृश्चिक
नवीन कामे मिळण्यामध्ये किंवा हातात असलेली कामे पूर्ण होण्यामध्ये खर्च येऊ शकतात, पण त्यामुळे मानसिक स्थितीही बिघडू देऊ नका. अडकलेले पैसे मिळू शकतात, आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. धार्मिक श्र्रद्धा वाढेल. तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठीदेखील जाऊ शकता.
इंधनाच्या लाकडाचे 4 तुकडे 4 दिवस वाहत्या पाण्यात सोडा.
धनु
धनप्राप्तीच्या मार्गामध्ये काही अडथळे येण्याची शक्मयता आहे. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य प्राप्त होईल. जवळच्या व्यक्तीकडून महत्त्वाची सूचना मिळेल. पैशाच्या बाबतीत हा काळ अस्थिर ठरू शकतो. तुमच्या मार्गात काही अडथळे येतील, पण तुम्ही त्यावर मात कराल. स्त्रीच्या मदतीने तुमची जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील.
काळ्या तिळाचे लाडू गूळ घालून माशांना टाका.
मकर
आजूबाजूच्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपल्या गावाकडे लक्ष द्या ऑफिसमध्ये काही गडबड होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल आणि ते त्यांच्या बुद्धिमत्तेने त्यांची परिस्थिती मजबूत करू शकतील. मुले उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करतील. आज तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनातही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
कुमारीकांची सेवा करा.
कुंभ
तुमच्या ज्ञानाचा उपयोग इतरांपेक्षा तुम्हाला व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी गुपित उघडे केल्याने नुकसान होईल. बदलत्या हवामानामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते, पालकांशी मतभेद होण्याची शक्मयता आहे. तुम्ही निर्णय घेतल्यास आणि मानसिक बळावर काम केले तर तुम्हाला सुखद परिणाम मिळतील आणि अडचणींना तोंड देण्यासाठी सदैव तयार रहाल.
हरभऱ्याची डाळ वाहत्या पाण्यात सोडा.
मीन:
परीक्षेचा काळ आहे, प्रत्येक पाऊल जाणीवपूर्वक उचलले पाहिजे. तुमचे गुप्त शत्रू तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतील. विचारपूर्वक बोला आणि तुमचे बोलणे कुणालाही दुखावणार नाही याची काळजी घ्या. आजच्या वातावरणात गोड बोलूनच तुम्ही तुमचे काम इतरांकडून करून घेऊ शकता हे लक्षात ठेवा.
काळा-पांढरा असा दुरंगी कुत्रा पाळा, अशा कुत्र्यांची देखभाल करा.
टॅरो उपाय: बऱ्याच घरांमध्ये एक अशी व्यक्ती असते की कोणाचेही ऐकत नाही, मन मानेल तसे वागते, अशा व्यक्तीमुळे घरात भयंकर उपद्रव होतो आणि मुख्य म्हणजे अशा व्यक्तीला घरातून काढताही येत नाही. अशावेळी त्या व्यक्तीचे थोडे केस, काळी मिरी आणि गंजलेला खिळा एका आकड्याच्या पानात काळ्या कपड्यात बांधून नदीच्या पात्रात जड दगडाखाली ठेवावे, त्या व्यक्तीचा त्रास कमी होतो