महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राशिभविष्य

06:00 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गुण मिलन चुलीत घाला 

Advertisement

दि. 15.5.24 च्या खजानात हा मथळा वाचल्यानंतर बऱ्याच लोकांना राग आला. बऱ्याच लोकांना वाईट वाटले. इतक्मया वर्षांपासून चालू असलेली ही सिस्टीम आम्ही तुमचे लेखन वाचून सोडून द्यावी का असे प्रŽही मला विचारण्यात आले. इतक्मया वर्षापासून चालू असलेली सिस्टीम म्हणजे काय याचे उत्तरच कुणाला माहीत नाही कारण ही कधी सुरू झाली, कुणी सुरू केली हेच कुणाला ठाऊक नाही.  कुठल्याही क्लासिकल टेक्स्टमध्ये केवळ चंद्राच्या नक्षत्रावरून आणि चंद्राच्या राशीवरून  दोन जीवांच्या  पुढच्या प्रवासाच्या बाबतीत सगळ्या गोष्टींबद्दल

Advertisement

प्रेडिक्शन करता येते याचा सविस्तर उल्लेख आहे. यावर कोणताही सुजाण ज्योतिषी विश्वास ठेवणार नाही. कुंडलीमध्ये बारा घरे, बारा राशी, 27 नक्षत्रे,  बारा  ग्रह  या सगळ्यांना वगळून  फक्त चंद्र,  चंद्राची रास  आणि चंद्राचे नक्षत्र  यावरून  सगळ्या बाबतीत प्रेडिक्शन कसे बरे करता येईल? अष्टकूट  मिलान  ज्याला सामान्य भाषेमध्ये  आपण किती गुण   मिळाले  असे म्हणतो  ते फक्त यावरूनच आहे.  मग बाकीचे  11 ग्रह, अकरा राशी, बारा भाव, 26 नक्षत्रे  यांचा  वधू-वरांच्या आयुष्यावर काहीच परिणाम होत नाही असे त्यांना म्हणायचे आहे काय?  भारताच्या उत्तरेकडे,  महाराष्ट्र,  गुजरात,  राजस्थान,  आंध्र प्रदेश  यातील काही भाग इथे फक्त अष्टकूट मिलनालाच महत्त्व दिले जाते, जे संपूर्णपणे चुकीचे आहे. या उलट दक्षिणेकडे इतक्मया गोष्टींकडे लक्ष दिले जाते की  वधू-वरांचे लग्न ठरणे मुश्कील होऊन बसते. वराह  मिहीर यांच्या बृहत जातक आणि  बृहत संहिता  यांच्या  संदर्भाने जर विचार केला तर वधू आणि वर परीक्षेतील एक टक्कासुद्धा  आपण आजकालच्या वधू-वरांना लावू शकत नाही. काही ठिकाणी  दशकूट मिलान पाहिले जाते. जेव्हा उपवर वधू वरांचा विवाह ठरवण्याकरता ज्योतिषाकडे पालक येतात त्यांनी काही महत्त्वाचे प्रŽ ज्योतिषाला विचारले पाहिजेत  आणि ज्योतिषाने त्या प्रŽांची उत्तरे  आपल्या ज्ञानाप्रमाणे प्रामाणिकपणे दिली पाहिजेत. केवळ किती गुण मिळाले आणि पुढे यांचे ठीक राहील ना हे प्रŽच मुळी  अत्यंत  त्रोटक  आहेत, अपूर्ण आहेत. ज्या पाच मुद्यांना सर्वाधिक महत्त्व दिले गेले पाहिजे ते हे 1. वधू आणि वरांच्या शारीरिक संबंधांमध्ये काही अडचण येणार नाही ना किंवा शरीर संबंधाच्या दृष्टीने हे दोघे योग्य आहेत का? स्वस्थ,  निरोगी  आणि आनंदपूर्ण नाते हे वैवाहिक संबंधांमध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका पार पडते यात कोणालाही संशय नसावा. पूर्वी विवाहाच्या निमंत्रण पत्रिकेमध्येही देव ब्राह्मण आणि गुऊंच्या आशीर्वादाने अमुकचा शरीर संबंध अमुकीशी करण्याचे योजिले आहे असा उल्लेख आढळतो असे ऐकिवात आहे. काळ बदलला आणि  शरीर संबंधांच्या बाबतीमध्ये असलेले भ्रम, प्रकृती आणि विकृती यात पुसट होत चाललेली रेषा, आपल्या शारीरिक गरजांबद्दल निर्भीडपणे मते मागण्याची वृत्ती (जी योग्यच आहे) आणि वेगवेगळ्या पद्धतीचे संबंध अस्तित्वात आले. असेक्सुअल, बायसेक्सुअल, होमोसेक्सुअल. अनेक गोष्टींचा ज्योतिषांनी आणि जातकांनी   विचार  करायला हवा  असे माझे मत आहे 2. मानसिक पातळीवरती  या दोघांमध्ये जास्त अंतर नसेल ना किंवा  एकमेकाला मानसिकदृष्ट्या हे  सपोर्ट करू शकतील ना?  3. संततीच्या बाबतीत वरामध्ये किंवा वधूमध्ये काही दोष  नसेल ना किंवा अपत्य प्राप्तीमध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतात का? आजकाल कित्येक लोक स्वखुशीने अपत्य नको ही भूमिका घेतात, अनाथ मुलाला दत्तक घेण्याचे ठरवतात. याचाही विचार व्हायला हवा.  4.आरोग्याची कुठलीही तक्रार एकमेकासाठी घातक ठरू शकते का किंवा कुंडलीमध्ये दीर्घकालीन अनारोग्याचे योग आहेत का? आणि शेवटचा 5. दोघांचे आयुष्यमान  एकमेकाला पूरक आहे ना म्हणजे एक अल्पायू आणि दुसरा दीर्घायू अशी परिस्थिती नाही ना?

वाचकहो, जे मुद्दे वर दिलेले आहेत ते जर तुम्हाला पटत असतील तरच या लेखाचा उद्देश साध्य होत आहे असे मला वाटते. सध्या परिस्थिती अशी आहे की  वधू-वरांच्या कुंडल्या घेऊन गेल्या की पहिल्या दोन गोष्टी चेक केल्या जातात. त्या म्हणजे मंगळ दोष आणि एक नाड दोष. आजच्या काळामध्ये या दोन्ही दोषांना  चुलीत नव्हे तर बंबात घालायची गरज आहे. 12,1,4,7,8 या ठिकाणी मंगळ  दिसला रे दिसला की मंगळदोष आहे किंवा सौम्य मंगळ आहे. कडक मंगळ आहे.  असे सांगणारे ज्योतिषी आहेत. मुळात सौम्य मंगळ आणि कडक मंगळ यांची व्याख्या आजकालच्या बाजारू पुस्तकातच आढळते. कुठल्याही क्लासिकल टेक्स्ट वरून त्यांनी ही व्याख्या घेतलेलीच नाही तर ज्योतिषाची चार पुस्तके वाचून प्राप्त झालेल्या उथळ ज्ञानामुळे यांचे हे स्टेटमेंट असते. जेव्हा  या बाबतीमध्ये (मंगळाच्या) विवेचन झाले त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. युद्धे, रोगराई यांचे प्रमाण खूप जास्त होते. बालविवाह पद्धत आणि पुऊषसत्ताक समाज यांचा काळ होता. वराचे वय 40 तर वधूचे वय 18, 12  असे असायचे.  त्या काळात कदाचित या ‘सो कॉल्ड’ मंगळ दोषाचा विचार होत असावा. ज्योतिषांनी आणि जातकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे आपल्या मनात हे फिक्स केले पाहिजे की जवळजवळ अशा 14 कंडिशन्स आहेत जिथे मंगळ दोष नाहीसा होतो. मुळात मंगळ हा दोष नाही हा मंगळ योग आहे, मंगल करणारा योग आहे  आणि मुख्य म्हणजे याचा संबंध वधूच्या किंवा वराच्या सेक्सुअल टेडन्सी याच्याशी आहे. त्यामुळे मंगळदोषाची शांती केल्यानंतर दोघांमध्ये विवाह होऊ शकतो  किंवा मंगळ दोषाची शांती करायला लागेल आणि त्यामुळे विवाह होईल यासारखी बकवास गोष्ट नाही. कित्येक ठिकाणी वयाच्या 28 वर्षानंतर मंगळ दोष पाहू नये  असा उल्लेख आढळतो. आजकाल वधू-वरांचा विवाह हा मुळात 28व्या वर्षानंतरच होताना  दिसतो मग या दोषाला  महत्त्व का? केवळ काही लोकांचा गल्ला भरण्यासाठी  की  आपण ही शांती करून घेतले या फसव्या मानसिक समाधानासाठी?

मेष

धावपळ वाढेल. कागदोपत्री व्यवहार करताना दुसऱ्यांची मदत घ्यावी लागेल.  संततीची काळजी घ्या. त्यांच्या वागण्यात चंचलता, अस्थिरता येण्याची शक्मयता आहे. सांभाळा. बाकी त्यांच्या अभ्यासात प्रगती असेल. पण योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ल्यांची त्यांना गरज भासण्याची शक्मयता आहे. अचानक धनलाभाची शक्मयता आहे.

उपाय : गरीबाला खायला द्या.

वृषभ

स्वभावाला मुरड घालावी लागेल. तुमचा मूळ स्वभाव उफाळून वर येण्याची शक्मयता आहे. जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल पण त्यातही तुमच्या मताची किंमत केली जात नाही असे जाणवेल. मातेच्या आणि स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्या. आपल्या कामाशी प्रामाणिक रहा. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.

उपाय : हनुमान चालीसा पारायण करा.

मिथुन

कर्ज वाढू देऊ नका. फोनमुळे मानसिक शांतता भंग होईल. वडील भावंडाचे सहकार्य मिळेल. आपल्याला नोकरीमध्ये अथवा आपल्या व्यवसायामध्ये फायदा होण्याची शक्मयता दिसत आहे. समाजात आपल्याला मानमरातब प्रतिष्ठा मिळेल. मित्र मैत्रिणींच्या सहवासात आनंदात दिवस घालवाल. त्यांचेसुद्धा आपल्याला सहकार्य लाभेल.

उपाय : लक्ष्मीची आराधना करा

कर्क

बाकीच्या सगळ्या कामांना दुय्यम समजून या काळात कुटुंबाकडे लक्ष द्यावे लागेल. आपल्या बोलण्याने समोरच्या माणसावर छाप पाडाल. परंपरेने आलेल्या संपत्तीचा व्यवस्थित विनियोग विचारपूर्वक करा. कुटुंबातील सदस्य सामंजस्याने राहतील आणि ते तसेच रहावेत यासाठी तुमचे प्रयत्न असतील. सरकारी कामे यशस्वी होतील.

उपाय :दत्ताची उपासना करा.

सिंह

अवास्तव घटनांची भीती वाटेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. खर्च करताना तो योग्य ठिकाणी खर्च होतो का याची शहानिशा करा. आपल्या वागण्यावर निर्बंध घाला. नंतर पश्चातापाची वेळ देऊ नका. आरोग्याकडे लक्ष द्या. खाण्यापिण्यावर नियंत्रण असू द्या. क्षणिक आनंदासाठी आरोग्याशी खेळ करू नका. कामाच्या ठिकाणी अति विश्वास ठेवल्याने नुकसान होईल.

उपाय :पक्ष्यांना पाणी द्या.

कन्या

शुक्रवारी मनासारखी घटना घडेल. स्वत:च्या आणि जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. गुंतवणुकीतून फायदा होईल. लॉटरीचे तिकीट काढून नशीब आजमावून पहायला हरकत नाही. कामाच्या ठिकाणी आपल्या कामामध्ये बुद्धी चातुर्य दाखविण्याची संधी मिळाली तर सोडू नका. या काळात संततीकडे जास्त लक्ष द्यावे लागेल असे दिसते.

उपाय: तुळशीला पाणी घाला.

तूळ

राग हा माणसाचा मोठा शत्रू आहे हे लक्षात ठेवा. त्यावर नियंत्रण ठेवल्यास पाचो उंगलिया घी में अशी अवस्था दिसत आहे. पैसा व नावलौकिक दोन्ही आपल्याला मिळण्याची शक्मयता दिसत आहे. वरिष्ठ आपल्यावर खूश असतील. वडिलांचे योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळेल. हा आठवडा आनंदात जाईल.

उपाय :मुक्मया प्राण्यांना खाऊ घाला.

वृश्चिक

जोडीदाराचे सुख छान मिळेल. स्वत:चा काही व्यवसाय असेल तर प्राप्ती चांगली होईल पण पार्टनर असेल तर वादावादी किंवा बेबनाव संभवतो.  नोकरी असेल तर त्यात प्रगती होईल. काही किरकोळ खटके उडण्याची शक्मयता आहे. त्यामुळे शक्मयतो वादविवाद टाळा. चोरीस गेलेली एखादी वस्तू किंवा द्रव्य मिळण्याची शक्मयता आहे.

उपाय -गरजूंना मदत करा.

धनु

वेळेचा सदुपयोग केला तर हा काळ अतिशय आनंदात जाईल. वेळ सत्कारणी घालवा. एखादी छान सहल काढा. पण आनंद साजरा करताना दुसऱ्यांना पण आनंदी करा. त्यांचाही आशीर्वाद घ्या. म्हणजे तुमचा आनंद द्विगुणित होईल. दानधर्म करा. सत्संगाचा लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे पुढचे नियोजन कुणाला सांगायच्या भनगडीत पडू नका.

उपाय : गाईला खाऊ घाला.

मकर

घर खरेदी विक्रीच्या बाबतीत निराशा होऊ शकते. मातेच्या तब्येतीची काळजी घ्या. स्थावर इस्टेटीच्या संदर्भात कोणत्या तरी कटकटीतून तुम्ही जाण्याची शक्मयता आहे. वाहन जपून चालवा. वाहन पार्क करताना योग्य ठिकाणी करा. कोणत्याही परिस्थितीत शांत राहण्याचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये प्रामाणिक रहा आणि फालतू गप्पा टळा.

उपाय : लक्ष्मीपूजन करा.

कुंभ

कामाच्या ठिकाणी कामे वेळेवर पूर्ण करण्यात दमछाक होईल. ऑफिसमध्ये आपल्या कामाची चांगली चुणूक दाखवाल. पण थोडे कष्ट करावे लागतील. भावंडांचे चांगले सहकार्य लाभेल. एखादा छोटा प्रवास घडण्याची शक्मयता आहे. आपली कर्तबगारी व बुद्धी यांची सांगड व्यवस्थित घालाल. एकंदरीत हा आठवडा सुखकारक जाईल.

उपाय- मुंग्यांना साखर घाला.

मीन

कौटुंबिक आणि कामकाजाच्या कारणाने मन अस्थिर होण्याची शक्मयता आहे. कसली तरी हुरहूर मनाला लागून राहील. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. मन चिंती ते वैरी न चिंती असे होऊन जाईल. पण अशा चिंतेने तब्येतीची हेळसांड होईल हेही लक्षात घ्या. आणि तब्येतीला सांभाळा. संततीची चिंता वाटू शकते. आर्थिक प्रलोभनात अडकू नका.

उपाय - नामस्मरण करा.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article