For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशि भविष्य

06:01 AM May 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशि भविष्य
Advertisement

मेष

Advertisement

तब्येतीला सांभाळा. उन वाढत चाललेले आहे. कुठेही किंवा कुणाकडेही जाताना विचार करून जा. जिकडे आपला मान असेल तिथेच जावे. अन्यथा अपमान होण्याचा संभव आहे. नोकरावर जास्त विश्वास ठेवू नका. घरातील मौल्यवान वस्तू सांभाळा. लहान भावंडांचे सुख मिळेल. कोणत्याही कामाला हात घालताना पूर्ण विचार करून हात घाला. यश मिळण्याची शक्मयता आहे.

पांढरी मिठाई दान द्या

Advertisement

वृषभ

लॉटरी अथवा तत्सम प्रकारातून द्रव्यलाभ होण्याची शक्मयता आहे. पण त्या द्रव्याच्या हव्यासापायी चुकीचा मार्ग निवडू नका. नाहीतर खूप नुकसान होण्याचीही शक्मयता आहे. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. काहीतरी मानसिक व्यथा सतावत राहील. अथवा घरातील माणसाच्या तब्येतीची काळजी लागून राहील. सांभाळून रहा. मन चंचल होऊ देऊ नका.

विहिरीत नाणे टाका.

मिथुन

पैशाचा अपव्यय होऊ देऊ नका. योग्य त्या ठिकाणी खर्च करा. परदेशवारी करण्याची शक्मयता दिसते. ऊन वाढते आहे. बाहेर जाताना डोळ्यांना सांभाळा. वाहन जपून चालवा. जिथे जाण्याने आपली मानहानी होईल अशा ठिकाणी जाऊ नका. आध्यात्मिक मार्गाला लागण्याची शक्मयता आहे. त्या मार्गाला लागाल तर जीवनाचे सार्थक करून घ्याल. पण बुवाबाजीत फसू नका.

हिरवे पेन जवळ ठेवा

कर्क

परोपकार करावासा वाटेल, करा. अडचणीत असलेल्याची मदत करा. सत्संग घडण्याची शक्मयता आहे. संतांच्या संगतीत भाग्य उजळून निघेल. कुठेतरी दूरचा प्रवास अथवा तीर्थयात्रा घडेल. धार्मिकतेकडे वळाल. घरातील वृद्धांचा आशीर्वाद मिळेल. हा आठवडा सुखासमाधानात जाईल. वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घेऊन समाधानात आठवडा घालवा.

माशांना खाऊ घाला.

सिंह

मन चंचल होईल. त्यावर आळा घाला. मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत तर अस्वस्थ होणे, चिडणे, राग येणे अशा गोष्टी होतात. पण लक्षात ठेवा, आपल्या चिडण्याने, रागावण्याने त्या घडून गेलेल्या गोष्टीत काही फरक पडत नाही. निष्कारण आपल्याला मनस्ताप मात्र होतो. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा.  आपल्याला आनंद देण्याऱ्या गोष्टी आहेत त्याकडे लक्ष द्या, आनंद लुटा.

पक्ष्यांना पाणी द्या.

कन्या

हा आठवडा आपल्याला सुखदायी ठरणार आहे असे दिसते. जुन्या मित्रांचा अगर वडील भावंडांचा सहवास मिळण्याची शक्यता दिसते. द्रव्यलाभही होण्याची शक्यता दिसते. उंची भेटवस्तू मिळतील. समाजात मानसन्मान मिळेल. काही महत्त्वाकांक्षा बाळगून असाल तर धैर्याने व प्रामाणिकपणे काम करा. यश नक्की मिळेल. एकूण हा आठवडा तुम्हाला सर्व प्रकारचे लाभ देण्याची शक्यता आहे.

तुळशीला पाणी घाला.

तूळ

तब्येतीच्या बाबतीत अत्यंत जागरूक राहण्याची गरज आहे. विशेषत: पोटाचे विकार आणि संसर्गजन्य रोग त्रास देऊ शकतात. योग्य वैद्यकीय उपाययोजना करा. धनप्राप्तीच्या बाबतीत भाग्यवान असाल. अनपेक्षित ठिकाणाहून संधी   मिळतील. कुटुंबात एकोपा असेल. प्रवासाचे योग आहेत. नोकरदार वर्गाला  चांगली बातमी कळेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

अंघोळीच्या पाण्यात  चिमूटभर  हळद घाला

वृश्चिक

पैशांवरून घरामध्ये छोटी मोठी भांडणे होण्याची शक्मयता आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे वागणे  कुटुंबातील शांतीला  भंग करू शकते. ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. घरातील एखाद्या व्यक्तीला लागणे, कापणे भाजणे  यासारख्या घटनांचा सामना करावा लागू शकतो. दिलेला शब्द पाळाल तर नवीन संधी मिळण्याची शक्मयता आहे.

गायीला पालक खाऊ घाला

धनू

तीर्थयात्रेला जाण्याचे योग होत आहेत. उसने दिलेले पैसे परत मिळवण्याकरता योग्य काळ आहे. तब्येतीची विशेष काळजी करण्याची गरज नसली तरी छोटे मोठे आजार त्रास देऊ शकतात. या काळात कौटुंबिक कलह होऊ नये म्हणून विशेष प्रयत्न करावे लागतील. मातृतुल्य व्यक्तीच्या तब्येतीविषयी काळजी वाटू शकते. जमिनीचे व्यवहार सध्या टाळा. ऑफिसमध्ये असंतुलित वातावरण असेल.

लाल गाईला चारा घाला

मकर

तब्येतीच्या बाबतीत अत्यंत जागरूक राहण्याची गरज आहे. विशेषत: पोटाचे विकार आणि संसर्गजन्य रोग त्रास देऊ शकतात. योग्य वैद्यकीय उपाययोजना करा. धनप्राप्तीच्या बाबतीत भाग्यवान असाल. अनपेक्षित ठिकाणाहून संधी   मिळतील. प्रवासाचे योग आहेत. नोकरदार वर्गाला चांगली बातमी कळेल.  वैवाहिक जीवन सुखमय असेल.

अंघोळीच्या पाण्यात  चिमूटभर  हळद घाला

कुंभ

लहान सहान कारणावरून घरात होणाऱ्या भांडणामुळे वीट येऊ शकतो. आर्थिक प्राप्ती करता अथक प्रयत्न करावे लागतील. अपेक्षा नसलेल्या ठिकाणी नुकसान होण्याचा संभव आहे. सावध रहा. जमिनीच्या किंवा प्रॉपर्टीसंबंधी महत्त्वाचे व्यवहार करण्याकरता योग्य काळ आहे. योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळू शकतो.

धार्मिक ठिकाणी पाच केळी  द्यावी

मीन

कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने आणि आर्थिक प्राप्तीच्यादृष्टीने हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. एखादा निर्णय घेताना घरातील सगळ्यांचे मत विचारात घेणे  फायद्याचे ठरेल. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवरती थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, पुढे याचा त्रास होऊ शकतो. कौटुंबिक किंवा व्यावसायिक कामाकरता प्रवास करावा लागू शकतो.

औदुंबराला पिवळा दोरा बांधा

 टॅरो उपाय : निसर्गाने काही वस्तूंना  वरदान दिले आहे असे म्हणायला हरकत नाही.   उडणारी कापसाची म्हातारी  प्रत्येकाने पाहिली असेल.   सुदैवाने जर तुम्हाला अशी उडणारी कापसाची म्हातारी (एक बीज असते  आणि त्याच्या बाजूला  पांढरे केस असतात)  सापडली  तर  अत्यंत नाजूकपणे  तिला पकडून  थोडी हळद लावून  तिजोरीत ठेवले  तर पैशाची बरकत येते.

Advertisement
Tags :

.