For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य

06:01 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य
Advertisement

अंक म्हणे ज्योतिषाला. . . (पूर्वार्ध)

Advertisement

अंकांची दुनिया विस्मयकारी तरी आहे. पण उपयोगी सुद्धा आहे. न्यूरोलॉजीच्या अनेक शाखांपैकी आपण चायनीज पद्धतीचा विचार करत आहोत. कुआ किंवा मिंग गुआ क्रमांक आठ महत्त्वाकांक्षी सिद्धांतावर आधारित आहे. कुआ म्हणजे पा कुआ, प्रत्येक बाजूला त्रि-आव्रुती असलेले आठ बाजू असलेले अष्टकोनी चिन्ह. पा म्हणजे ‘आठ’ तर कुआ म्हणजे ‘त्रि-आव्रुती’, म्हणून पा कुआ हे नाव. हे आठ दिशा दाखवते. तुमचा वैयक्तिक कुआ क्रमांक तुमची जन्मतारीख आणि लिंगानुसार मोजला जातो. एकदा तुम्ही तुमचा कुआ क्रमांक तयार केल्यावर तुम्हाला तुमच्या चार शुभ दिशा आणि टाळण्याच्या चार दिशा कळतील .. तुमचा कुआ क्रमांक जाणून घेतल्याने तुम्हाला आधार देणाऱ्या दिशानिर्देशांचा फायदा घेता येतो आणि नसलेल्या दिशानिर्देश टाळता येतात. यशाची दिशा-कामाच्या ठिकाणी आणि महत्त्वाच्या फोन कॉल्स करताना किंवा कॉन्फरन्स/मीटिंगमध्ये तुमची प्रतिभा दाखवायला उपयोगी आहे. आरोग्याची दिशा ही दिशा झोपणे, खाणे किंवा विश्र्रांती घेणे यासाठी उत्तम दिशा आहे. जर तुमची तब्येत खराब असेल, तर तुम्ही बरे होत असताना ही दिशा तुम्हाला मदत करेल. प्रेमाची दिशा नाते संबंध सुधारण्याकरता रात्रीच्या जेवणाच्या टेबलावर तुमच्या प्रेमाच्या दिशेला तोंड केल्याने प्रेम वाढते, नाते संबंध सुधारतात. अभ्यास/वैयक्तिक वाढ ही तुम्हाला एकाग्र ठेवण्यासाठी आणि ज्ञान आत्मसात करण्यात मदत करण्यासाठी अभ्यास करताना तुमच्या अभ्यास/वैयक्तिक प्रगतीच्या दिशेने तोंड करून बसा, यश मिळते. तुमच्या कुआ क्रमांकाची गणना करण्यासाठी तुमच्या जन्म वर्षाचे शेवटचे दोन अंक घ्या आणि अंक जोडा, जोपर्यंत तुम्ही ते एका अंकात कमी करत नाही तोपर्यंत ते जोडत रहा.

2000 पूर्वी जन्मलेल्या महिलांकरता: 1. तुमच्या जन्माच्या वर्षातील शेवटच्या दोन संख्या जोडा आणि ते एका अंकावर आणा. 2. 5 मध्ये तुमचा एक अंक जोडा. गरज असल्यास, हा नंबर एका अंकावर आणा. 3. हा तुमचा कुआ क्रमांक आहे. जर तुम्ही 2000 नंतर जन्मलेली स्त्री असाल तर 5 ऐवजी 6 जोडा. उदाहरण: 7 मे 1945 रोजी जन्मलेल्या स्त्रीचा. 4 + 5 = 9 जोडा. नंतर 5+ 9= 14 जोडा. एक अंक 1 + 4 = 5. हाच तुमचा कुआ क्रमांक आहे.  2000 पूर्वी जन्मलेले पुऊषांनी 1. तुमच्या जन्माच्या वर्षातील शेवटच्या दोन संख्या जोडा आणि ते एका अंकावर आणा. 2. क्रमांक 10 मधून तुमचा एक अंक वजा करा. 3. हा तुमचा कुआ क्रमांक आहे. वर्ष 2000 नंतर जन्मलेल्या पुऊषासाठी, 10 ऐवजी 9 मधून वजा करा. महत्त्वाचे: 2009 आणि 2018 मध्ये जन्मलेल्या पुऊषाचा कुआ क्रमांक 9 असेल. उदाहरण: 8 सप्टेंबर 1992 रोजी जन्मलेल्या पुऊषाचा. 9 + 2 = 11 जोडा. एकेरी अंक कमी करा म्हणजे 1 + 1 = 2. नंतर 10 - 2 + 8. ख्ल्a संख्या 8 आहे.

Advertisement

महत्त्वाची सूचना: जर तुमचा जन्म जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये झाला असेल, तर तुमची जन्मतारीख मागील वषी येते की नाही हे तपासण्यासाठी चंद्र दिनदर्शिकेचा संदर्भ घेणे महत्त्वाचे आहे. कारण चंद्राचे नवीन वर्ष प्रत्येक वषी वेगळ्या तारखेला सुरू होते. उदाहरणार्थ, जर तुम्ही 26 जानेवारी 1979 रोजी जन्मलेल्या स्त्री असाल तर तुम्ही चायनीज चंद्र पॅलेंडर तपासाल, तर तुम्हाला दिसेल की घोड्याचे वर्ष 7 फेब्रुवारी 1978 ते 27 जानेवारी 1979 पर्यंत होते. या गणनेत वापरून हे वर्ष 1978 मध्ये बदलते. या कुवा क्रमांकाचा आपल्या रोजच्या आयुष्यात कसा उपयोग करून घ्यायचा ते पुढच्या वेळेला सांगतो पण त्याआधी जर हा कुवा नंबर हिरव्या शाईने डाव्या हाताच्या मनगटावर लिहून  त्याच्याभोवती सर्कल काढल्यास नशीब साथ देते हे नक्की. . .

मेष

आपला हा आठवडा कुटुंबासोबत छान जाईल. आपल्या वाणीने आपल्या कुटुंबावर चांगली छाप पाडाल. पण बोलताना कदाचित चुकून कुणाचे मन दुखावणार नाही ना, याची पण काळजी घ्या. पैतृक संपत्तीबद्दल काही चर्चा सुऊ असेल तर शांतपणाने प्रŽ सुटण्याची शक्मयता आहे. आपला काही देण्या-घेण्याचा कुठे व्यवहार चालला असेल तर त्यात फायदा होण्याची शक्मयता आहे.

उपाय: मारुतीची आराधना करा.

वृषभ

नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामावर आपले वरिष्ठ खूश होतील. आपले प्रेसेंटेशन छान होण्याची शक्मयता आहे. आपल्या भावंडासमवेत किंवा मित्रासमवेत हा आनंद आपला द्विगुणित होण्याची देखील शक्मयता आहे. आपल्याला यावेळी कदाचित आपल्या नोकरांचे सहकार्य मिळेल. छोटे प्रवास-सहली घडतील. पण प्रवासात भलते धाडस कऊ नका.

उपाय:दत्तगुरूंची उपासना करा.

मिथुन

‘मातृदेवो भव’ या उक्तीप्रमाणे मातेचा सहवास, मातेचे प्रेम या आठवड्यात आपल्याला पुरेपूर मिळणार आहे. तुम्ही पण मातेची काळजी घ्या. तिला प्रेम द्या. जमिनीचे काही देण्या-घेण्याचे व्यवहार असतील तर काही अंशी मार्गी लागण्याची शक्मयता आहे. वाहन घेण्याचा विचार चालला असेल तर त्या बाबतीत पुढे पाऊल उचलाल. एकंदरीत हा आठवडा चांगला जाईल.

उपाय: तहानलेल्याला पाणी पाजा.

कर्क

संततीकडून काही चांगली वार्ता समजण्याची शक्मयता आहे. आपण काही विद्या प्राप्त करण्यासाठी प्रयत्नात असाल तर प्रयत्न सफल होण्याची शक्मयता आहे. लॉटरीसारख्या तत्सम प्रकारातून अचानक धनलाभ होण्याची शक्मयता आहे किंवा आपल्याला कविता लेखनाची आवड असेल तर त्या आवडीतून आपल्या हातून काहीतरी चांगले कार्य घडण्याची शक्मयता आहे.

उपाय: महादेवाची उपासना करा.

सिंह

या आठवड्यात आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी जास्तीत जास्त कष्ट करावे लागण्याची शक्मयता आहे. पण तब्येतीस सांभाळून कष्ट करावेत. या कष्टामुळे शरीर पीडा होण्याची पण शक्मयता आहे. मन चिंतीत होईल. मनाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करा. नोकरीसाठी प्रयत्नात असाल तर थोडी विलंबानेच नोकरी मिळेल. पण sती नोकरी चांगली मिळण्याची शक्मयता आहे.

उपाय: हनुमान चालीसा वाचा.

कन्या

जोडीदाराबरोबर आठवडा चांगला जाण्याची शक्यता आहे. पण छोट्या छोट्या गोष्टीवर वाद घालू नका. शक्यतो समजुतीने घ्या. जोडीदाराच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवा. तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होण्याचा संभव आहे. स्वतंत्र व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी जोडीदाराचा सल्ला अवश्य विचारात घ्या. फायदा होईल. पण कुठेही अति अधाशीपणा करु नका. संयम असू दे.

उपाय: कुलदेवीची आराधना करा.

तूळ

अचानक धनलाभाची शक्मयता आहे. पण त्याच्या पाठी लागून चुकीचा मार्ग अवलंबू नका. नाहीतर नसत्या कचाट्यात सापडाल. वाहन जपून चालवा. सासरकडून काहीतरी फायदा संभवतो. पण सावध रहा. शत्रूपक्ष ही तुमचे नुकसान करण्यासाठी टपून बसलेला असण्याची शक्मयता आहे. या आठवड्यात कोणतीतरी मानसिक चिंता आपल्याला सतावत रहाण्याची शक्मयता आहे.

उपाय: तहानलेल्याना पाणी द्या.

वृश्चिक

धर्म रक्षणाचे अथवा धर्माचे कार्य तुमच्या हातून घडण्याची शक्मयता आहे. पित्याचे सहकार्य, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. दूरच्या प्रवासाची अथवा तीर्थयात्रा घडण्याची शक्मयता आहे. एखादे सूचक स्वप्न पडण्याचा संभव आहे. गुऊकृपायोग आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. भाग्योदयाची सुरवात होईल. संतसंगतीत रहाण्याचा प्रयत्न करा.

उपाय: होईल तितका योग्य तो परोपकार करा.

धनु

आपला जर वैयक्तिक व्यवसाय असेल तर व्यवसायाला चढती कमान लागण्याची शक्मयता आहे. नोकरीत असाल तर पदोन्नती होण्याची अथवा वेतनवाढ होण्याची शक्मयता आहे. आपल्यास मानमरातब मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. कर्ज मिळविण्यासाठी प्रयत्नात असाल थोड्या प्रयत्नाने मिळण्याची शक्मयता आहे. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला छान जाईल असे दिसते.

उपाय: घरातून बाहेर पडताना कपाळावर गंध लावण्याची सवय ठेवा.

मकर

हा आठवडा आपल्या भावंडासोबत व मित्रांसोबत आनंदात जाण्याची शक्मयता आहे. कोणत्यातरी समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल. काही उंची वस्तूंची खरेदी कराल, अथवा उंची वस्तू गिफ्ट म्हणून मिळण्याची शक्मयता आहे. समाजात प्रतिष्ठा लाभेल. आपली महत्वाकांक्षा वाढीस लागेल आणि ती पूर्ण करण्यास काही धाडस करावे लागण्याची शक्मयता आहे.

उपाय: रामनाम जप करा.

कुंभ

खर्चावर नियंत्रण ठेवा. अपव्यय होऊ देऊ नका. योग्य त्या ठिकाणी शक्मयतो खर्च करा. एखादी गोष्ट मिळविण्यासाठी खर्च कराल, पण हाती काहीच लागणार नाही, असे व्हायला नको. अध्यात्मिक मार्गाला लागल्यास फायदाच होईल. वाहन जपून चालवा. आणि वाहतुकीचे नियम आवश्य पाळा. कायद्याच्या कचाट्यात सापडू नका. सांभाळून रहाण्याची गरज आहे.

उपाय:प्रत्येक शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनीचे दर्शन घ्या.

मीन

मनावर ताबा ठेवण्याची नितांत गरज आहे. एवढ्या तेवढ्या गोष्टीला डोक तापवून घेऊ नका आणि कोणत्याही गोष्टीची अति आशा, अति लोभ कऊ नका. जोडीदाराशी समजुतीने वागा. त्याचे सहकार्य आपल्याला अतिशय चांगल्या रीतीने  मिळेल. पण शांततेने आणि समजुतदारपणे वागा, म्हणजे हा आठवडा आपला छान जाईल. सद्सद्विवेक बुद्धी वापरा व काम करा.

उपाय: दर मंगळवारी मारु तीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या.

Advertisement
Tags :

.