For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य

06:02 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य
Advertisement

(प्रासंगिक- रामनवमी- रामदास स्वामी महाराज जयंती)

Advertisement

वर्णमालेमध्ये  ‘र’  हे 27 वे अक्षर आहे. ‘आ’ हे दुसरे  तर ‘म’   हे  25 वे अक्षर आहे. या सगळ्याची बेरीज केली तर 27+2+25= 54 !  म्हणजे एकदा आपण ‘राम’ हा शब्द उच्चारला की, त्याची बेरीज 54 होते.  म्हणून ‘राम राम’ म्हणजे 54 अधिक 54 = 108! 108 वेळेला रामनाम म्हणण्याचे, म्हणजे एक माळ रामनामाची केल्याचे फळ एकदा राम राम म्हणल्याने मिळते. म्हणून रामदास स्वामी महाराज महाराजांनी एकमेकाला  ‘राम राम’  म्हणून अभिवादन करण्याचा रिवाज सुरू केला. पण नक्की राम म्हणजे कोण हो? संत कबीराच्या शब्दात, ‘एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा, एक राम है जगत पसारा, एक राम है जगत से न्यारा!!!’ कबीरांनी राम कोण हे अतिशय सुंदररित्या सांगितलेल्या आहे. एक अयोध्येचा, दशरथाचा मुलगा, एक प्रत्येकात विराजमान असलेला, एक ज्याने संपूर्ण ब्रम्हांडाला व्यापलेले आहे आणि या सगळ्यांपेक्षा वेगळा हा चौथा! म्हणजे आपण ज्या रामाला आडवतो तो प्रतिकात्मकरित्या जरी दशरथाचा मुलगा असला तरी आपला उद्देश हा आदी रामाला- आत्मारामाला पुजण्याचा असतो! जो धर्म, जात, पंथ या सर्वांच्या पलीकडचा आहे. बुध कौशिक ऋषींना भगवान शंकरांनी स्वप्नामध्ये सांगितलेली  रामरक्षा सिद्ध कशी करावी ते सांगतो. चैत्र पौर्णिमेला 11 अंगुल लांबीच्या  पांढऱ्या कागदावरती काळ्या शाईने उत्तरेकडे तोंड करून डाव्या हाताच्या  वरच्या कोपऱ्यात आणि उजव्या हाताच्या खालच्या कोपऱ्यात ‘श्रीराम’  लिहावे. उजव्या हाताच्या वरच्या कोपऱ्यात आणि डाव्या हाताच्या खालच्या कोपऱ्यात ॐ लिहावे. मधल्या जागेमध्ये सुऊवातीला श्री गणेशाय नम:  पासून सुऊवात करावी. मग रामरक्षेच्या 11 ओळी लिहाव्यात. कागदाच्या   मागे लिहू नये. अशी संपूर्ण राम रक्षा लिहून काढावी. स्तोत्र पूर्ण झाले की तीन वेळेला ओमकार लिहावा. 11 दिवसात रामरक्षा लिहून पूर्ण करावी.   त्याचदिवशी किंवा कोणत्याही पौर्णिमेला एका पाटावर तांदळाच्या आसनावरती ही पोथी ठेवून यथासांग पूजन करावे. मग राम रक्षा स्तोत्राचे 11 पाठ करावे. आसनासाठी वापरलेल्या तांदळाचा भात करून नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर राम रक्षेचा किमान एक पाठ रोज करावा. अशा रीतीने रामरक्षा सिद्ध झाल्यानंतर स्वत:साठी आणि इतरांसाठीही आपण कवच तयार करू शकतो. या रामनवमीचा संयोग म्हणजे या रामाला आपले सर्वस्व मानले त्या स्वामी रामदासांचा जन्मही याच दिवशी आहे. जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात ‘काय सांगू आता संतांचे उपकार । मज निरंतर जागविती ।। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई । ठेविता हा पायी जीव थोडा ।। सहज बोलणे हित उपदेश । कऊनी सायास शिकविती ।। तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती । तैसे मज येती सांभाळीत ।।’ आज आपण मानसशास्त्र, बिहेवियरल थेरपी अशा गोष्टींबद्दल चर्चा करतो. जगात सर्वोत्कृष्ट असलेल्या मॅनेजमेंट स्टडीजमध्ये सेल्फ मॅनेजमेंट किंवा स्वत:चे नियोजन कसे करावे हे शिकवले जाते, पण स्वामींनी 16 व्या शतकामध्ये मनोबोध आणि दासबोधच्या स्वरूपात संपूर्ण मानवजातीला दिशा दाखवली. म्हणून बोला संत रामदास स्वामी महाराज की, सियावर रामचंद्र की. . .जय

मेष

Advertisement

कुटुंबात राहूनही थोडे अलिप्तच रहाल. आपल्याला कौटुंबिक सुख मिळण्याची शक्मयता आहे. पण आपल्याला कसली तरी चिंता सतावत राहील. त्यामुळे कुटुंबात असूनही नसल्यासारखे रहाल. काळजी नसावी. आपल्या वाणीने सर्वांची मने जिंकाल. आपल्याला जर लेखनाची आवड असेल तर आवर्जून त्याकडे लक्ष द्या. त्यात आपल्याला यश मिळण्याची शक्मयता आहे.

उपाय: गुरूची आराधना करा.

वृषभ

या आठवड्यात तुम्ही छोट्याशा प्रवासाला जाण्याची शक्मयता आहे. आपले शेजारी आपल्याला चांगली साथ देतील. ते आपले हितचिंतक असतील. सहकार्याने रहा. आपल्या घरातील अथवा आपल्या कार्यक्षेत्रातील नोकरांकडून आपल्याला मदत मिळण्याची शक्मयता आहे. नोकरीमध्ये आपल्या हातून काही विशेष कार्य उत्तम तऱ्हेने सफल होण्याची शक्मयता आहे.

उपाय: मारूतीची उपासना करा.

मिथुन

नवीन घर बांधणे अगर विकत घेणे अशा काही प्रयत्नात असाल तर त्या कामाला गती मिळण्याची शक्मयता आहे. कदाचित भूमिगत काही मौल्यवान वस्तू मिळण्याची शक्मयता आहे. पण या सगळ्याला मातेची मात्र परवानगी, आशीर्वाद घ्या आणि मग कामाला सुऊवात करा. मातेच्या आशीर्वादाशिवाय सर्व काही निष्फळ आहे. हे कायम लक्षात ठेवा. त्याशिवाय आपली आपण प्रगती कऊ शकत नाही.

उपाय: कुलदेवतेची उपासना करा.

कर्क

या आठवड्यात आपल्या चातुर्याचा कस लागणार असे दिसते. कोणतेही काम करताना चातुर्य हे लागतेच. मग ते ऑफिसमध्ये असो अगर घरात असो काम करून घेणे हे चातुर्याचे काम आहे. एखादी विद्या संपादन करावीशी वाटेल. आज रामनवमी आहे. एखाद्या मंत्राचे जप करावेसे वाटले तर अवश्य करा. त्यातून नक्की फायदाच होईल. अचानक धनलाभाची पण शक्मयता आहे.

उपाय: रामनाम जप करा.

सिंह

काहीतरी शारीरिक पीडा संभवते. त्यामुळे तब्येतीकडे लक्ष द्या. सध्या उन्हाळा खूप वाढला आहे. नोकरावर फार विश्वास ठेऊ नका. कदाचित नुकसान होण्याची शक्मयता आहे. फुकटचे सल्ले कुणाही देऊ नका. आणि स्वत:ला अपमानित करून घेऊ नका. घरातील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. या आठवड्यात काही कारणाने मन शंका, चिंता यांनी ग्रासलेले असण्याची शक्मयता आहे.

उपाय: श्री रामाची उपासना करा.

कन्या

या आठवड्यात जोडीदाराबरोबर वेळ चांगला जाईल. आपला स्वतंत्र काही व्यवसाय करीत असाल तर दैनंदिन प्राप्ती चांगली होण्याची शक्मयता आहे. पण निष्कारण कुठल्या वादविवादात पडू नका. एखादी विस्मरणात गेलेली अथवा चोरीस गेलेली वस्तू सापडण्याची शक्मयता आहे. कुठल्या तरी करारावर शिक्कामोर्तब करावयाचा किंवा सही करायची झाल्यास विचारपूर्वक करा.

उपाय: दुर्गा देवीची आराधना करा.

तूळ

लॉटरी अथवा तत्सम प्रकारातून द्रव्यलाभ होण्याची शक्मयता आहे. पण कोणती तरी चिंता सतावत राहील. द्रव्यलाभ योग्य मार्गाने मिळाला तरच स्वीकारा. त्यासाठी चुकीचा मार्ग वापरू नका. नाहीतर निष्कारण फसले जाण्याची शक्यता आहे. स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्या. उन्हाळा वाढत चालला आहे. उष्माघातासारख्या विकाराला बळी पडू नका.

उपाय: महादेवाचे पूजन करा.

वृश्चिक

भाग्य उजळून निघण्याची शक्मयता आहे. मिळालेल्या संधीचा योग्य तो उपयोग करून घ्या. सत्संगाचा लाभ होण्याची शक्मयता आहे. त्याचा लाभ घ्या. संतांचा थोरा-मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. तीर्थयात्रेला जाण्याची संधी मिळेल. संधी सोडू नका. रामाचा आशीर्वाद घ्या आणि चांगले धार्मिक कार्य करण्याचा प्रयत्न करा. कदाचित परदेश प्रवासही घडण्याची शक्मयता आहे.

उपाय: संकटनाशन हनुमान स्तोत्र म्हणा.

धनु

आपल्या व्यवसायात भरभराट होण्याची लक्षणे दिसत आहेत. कष्टाचे फळ चांगलेच मिळते. नोकरीत असाल प्रमोशन अथवा पगारात वाढ होण्याची शक्मयता आहे. मान-सन्मान मिळण्याची शक्मयता आहे. तुमचे वरिष्ठ खुश होतील. आपल्याला समाजात मानाचे स्थान प्राप्त होईल. वडिलांना सुख द्याल. आपली प्रगती बघून वडील आनंदित होतील. आपल्या कामानिमित्त परदेश गमनाचादेखील विचार कराल.

उपाय: तहानलेल्याला पाणी आणि भुकेल्याला खाणे द्या.

मकर

समारंभाचे दिवस आहेत. आपले नातेवाईक, भावंडे, मित्रपरिवार भेटण्याची शक्मयता आहे. आपल्या जवळच्या लोकांमध्ये आपला आठवडा आनंदात जाईल. सर्व तऱ्हेच्या लाभाची, सुखाची प्राप्ती होईल. उंची वस्तूंची खरेदी होण्याची शक्मयता आहे किंवा उंची वस्तू भेटवस्तूच्या स्वऊपात मिळेल. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला एक छान अनुभव देऊन जाईल.

उपाय: कुलदेवतेची उपासना करा.

कुंभ

वाहन अतिशय सावधानतेने चालवा. उगाचच कुणाशी पंगा घेण्याच्या भानगडीत पडू नका, म्हणजे वादावादीत पडू नका. त्यामध्ये तुमचेच नुकसान होण्याची शक्मयता आहे. निष्कारण खर्च होण्याची देखील शक्मयता आहे. सांभाळून रहा. शत्रूपीडा होण्याची शक्मयता आहे. आपल्या कामाशी प्रामाणिक रहा. अन्यथा नुकसान संभवते. परदेश गमनाचीही शक्मयता आहे.

उपाय: संतसंगत करा.

मीन

मनाला आवर घाला. मन अतिशय चंचल होईल. उन्हापासून स्वत:ला जपा. आपल्या आयुष्यात आपण जे ध्येय ठरविले आहे, त्याकडे जाण्याचा कसोशीने प्रयत्न कराल. पण हे करताना स्वत:ला सांभाळा. आपल्या बुद्धीचा कस लागेल. आपली महत्वाकांक्षा आपण पूर्ण कराल, अशी शक्मयता आहे. पण सत्शीलतेने वागा. आपला नावलौकिक होईल. स्वत:ची तब्येत सांभाळा.

उपाय:- दत्तगुरूंची उपासना करा.

Advertisement
Tags :

.