राशिभविष्य
मेष
या आठवड्यात तुम्ही नवीन लोकांना भेटाल आणि ते तुमच्या करिअरसाठी खूप फायदेशीर ठरेल. तुम्हाला पैशाशी संबंधित काही नवीन संधीदेखील मिळू शकतात. तुमचा एखादा जुना मित्र तुमची काही प्रभावशाली लोकांशी ओळख करून देऊ शकतो. नोकरी करणारे लोकदेखील चांगले काम करतील आणि त्यांच्या कामाची प्रशंसा करतील. कौटुंबिक जीवनात गोष्टी खूप चांगल्या असतील.
पक्ष्यांना बाजरी घालावी
वृषभ
परिश्र्रम आणि समर्पणाचे फळ तुम्हाला मिळेल. नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. जीवनात नवीन गोष्टी शोधण्यात अजिबात संकोच करू नका. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ तुमच्या मेहनतीची आणि वचनबद्धतेची प्रशंसा करतील. आयुष्यात अनेक रोमांचक वळणे येतील. तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्या खर्चावर लक्ष ठेवा.
आपले जुने वस्त्र एखाद्या गरजूला दान द्यावे
मिन
तुम्ही नवीन लोकांना भेटू शकता ज्यांच्याशी तुम्ही संबंध सुरू करू शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आव्हानांना सामोरे जावे लागेल, परंतु त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करावा लागेल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या. मात्र, आरोग्याबाबत जास्त काळजी करण्याची गरज नाही. उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून पैसे मिळू शकतात. काही लोकांना पेमेंट संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
अन्नदान करा
कर्क
कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. रोमँटिक जीवन चांगले राहील. तुम्ही ऊर्जा आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल आणि तुमच्या कामात नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी तयार असाल. जीवनात प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मोठे यश मिळेल. घरामध्ये जमीन किंवा वाहन खरेदीची शक्मयता राहील.
उडीद दान द्यावे
सिंह
ऊर्जा आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा आणि जीवनात काही जोखीम घेण्यास अजिबात संकोच करू नका. कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक स्थिती मजबूत असेल, परंतु भावा-बहिणींमध्ये पैशांवरून वाद वाढू शकतात. त्यामुळे मन अशांत राहू शकते. उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून आर्थिक लाभ होईल.
जलाशयातील पाच दगड पुजावे
कन्या
तुमच्या आयुष्यात नवीन व्यक्तीचे स्वागत करण्यास तयार रहा. व्यावसायिक जीवनात तुम्ही ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असाल. तुम्हाला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी काही नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि तुम्ही अंतिम मुदतीपूर्वी सर्व कामे पूर्ण करू शकाल. आर्थिक बाबतीत सावध रहा. उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून आर्थिक लाभ होईल आणि हा आठवडा आनंद आणि समृद्धीचा असेल.
औदुंबराला दूध मिश्रित पाणी घाला
तुळ
बोलण्यात सौम्यता राहील. करिअरमध्ये नवीन यश मिळवाल. धार्मिक कार्यात ऊची राहील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. नोकरी-व्यवसायासाठी वातावरण अनुकूल राहील. जुन्या मित्रांना भेटू शकता. नोकरीत स्थान बदलण्याची शक्मयता आहे. भावनांमध्ये चढउतार होऊ शकतात. भावनिक होऊन घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका.
लोखंडी तवा दान द्यावा
वृश्चिक
सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिक जीवनात प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. ऑफिसमध्ये अनावश्यक वाद टाळा. आर्थिक स्थिती सुधारेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्मयता आहे. आशा-निराशेच्या भावना होतील. बौद्धिक कार्यातून आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळतील. दिनचर्या थोडी विस्कळीत होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
रविवारी नारळाच्या झाडाखालील माती घरी ठेवावी
धनु
सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. कामातील आव्हाने स्वीकारण्यासाठी आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. कठोर परिश्र्रम आणि समर्पण यांचे फळ मिळेल. नोकरीत बदलाचे संकेत आहेत. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक जीवनात किरकोळ समस्या येतील. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. आईच्या तब्येतीत सुधारणा होईल. तुम्हाला तुमच्या प्रियजनांचे सहकार्य मिळेल.
फिरोजा रत्न जवळ ठेवावे.
मकर
पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद संभवतो. कुटुंबातील स्त्री वर्गाचे वागणे खटकू शकते. तब्येतीला सांभाळावे लागेल. जुने दुखणे डोके वर काढू शकते. किमती वस्तूंना सांभाळून ठेवा. मित्रांवरती विश्वास ठेवणे महागात पडू शकते. आपल्या योजना केवळ आपल्यापर्यंत ठेवा. तुमच्या स्वभावाचा फायदा तुमचे सहयोगी उचलू शकतात. वरिष्ठांचे अतिरिक्त काम करावे लागेल.
जलाशयातील पाच दगड पुजावे
कुंभ
घरातील सदस्य जर अनाठाई मागणी करत असतील किंवा तुमचे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोचत नसेल तर त्यांना समजावून आपला मार्ग न सोडणे हे बरे. पैशांच्या बाबतीमध्ये सुदैवी असाल. घरातील एखादी वस्तू गहाळ होणे किंवा फुटणे तुटणे यासारख्या घटना घडतील. मित्रमंडळींमध्ये आपला अपमान होऊ देऊ नका. तब्येतीला सांभाळावे लागेल.
आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ घालावे
मीन
तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे तुमच्या बद्दलचे मत काय आहे त्याबद्दल लक्ष न दिलेले बरे. काही बाबतीत घरातील लोकांशी आणि संबंधित सहकर्मींशी वाद संभवतो. आपली बाजू योग्य असल्यास न झुकलेले बरे. संततीबद्दल काळजी वाटू शकते. पैशांची आवक सर्वसामान्य असेल. लोकांशी गोड बोलून कामे करून घ्यावीत. प्रेमींकरता सबुरीचा संदेश आहे.
आपले जुने वस्त्र एखाद्या गरजूला दान द्यावे
टॅरो उपाय: लोकांना आकर्षित करण्याकरता प्रत्येकाला वाटत असते की आपण जे काम हातात घेतले आहे ते पूर्ण व्हावे आणि त्यातून लाभ व्हावा. याकरिता लोकांना भेटावे लागते, त्यांना कन्विन्स करावे लागते. हा तोडगा लोकांना आपल्या बाजूने वळवण्याकरता आहे. कोणत्याही मिटींगला जाण्यापूर्वी उंबराचे फळ हातावर चिरडावे. हात न धुता वाळू द्यावे आणि मीटिंगमध्ये लोकांशी हात मिळवावा. लोक तुमच्या बाजूने होतील.