For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

राशिभविष्य

06:01 AM Feb 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य

मेष

Advertisement

सासरच्यांशी वाद होण्याची शक्मयता आहे. जोडीदारांमध्ये तणाव निर्माण होईल. आक्रमकतेने कोणतेही मोठे पाऊल उचलू नका आणि आपल्याकडून समस्येचे निराकरण करण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करा. नोकरदार लोकांनी हे लक्षात ठेवावे की, त्यांना कामाच्या ठिकाणी कठोर परिश्र्रम करावे लागतील. परंतु स्मार्ट वर्कची मदतदेखील घ्यावी लागेल.

तुळशीला पाणी घाला.

Advertisement

वृषभ 

Advertisement

व्यावसायिकांसाठी हा आठवडा चांगला राहील. या आठवड्यात या राशीच्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायात वाढ होऊ शकते. याशिवाय संपत्तीत वाढ होण्याची शक्मयताही चांगली आहे. तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी विचारपूर्वक एखाद्याची नियुक्ती करण्याचा प्रयत्न करा. कारण दुसऱ्याच्या चुकीमुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.

धार्मिक ठिकाणी मुळा दान द्या.

मिथुन

आर्थिक व्यवस्थापन आणि गुंतवणूक करण्यात व्यस्त रहाल. या आठवड्यात मीटिंग आणि योजनांमध्ये व्यस्त असाल आणि वैयक्तिक जीवनासाठी वेळ मिळणार नाही. आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही कोणत्याही योजनेत पैसे गुंतवले तर ते फायदेशीर ठरेल. पैशाचे रोख व्यवहार टाळावेत आणि स्वत:साठी थोडा वेळ काढावा. मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.

सुगंधी स्नान करा

कर्क

या राशीच्या लोकांना त्यांच्या काही कृतींबद्दल पश्चात्ताप होईल. ज्यामुळे त्यांचे भागीदार आणि मित्रांसोबतचे संबंध खराब होऊ शकतात. त्याची भरपाई करण्यासाठी, ते या आठवड्यात अतिरिक्त प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतील. या आठवड्यात त्यांनाही त्यांच्या कामाची चिंता राहील. कोणताही निर्णय घाईने न घेण्याचा सल्ला दिला जातो.

दूध दान द्या

सिंह  

लोक कामाच्या ठिकाणी आक्रमकपणे वागतील आणि कनिष्ठांशी उद्धटपणे वागतील. नोकरी सोडण्याचा विचार करू शकता. कोणत्याही विशेष कारणाशिवाय चिडचिड जाणवेल. आक्रमक वागणुकीमुळे आणि चिडचिडेपणामुळे कुटुंबातही वाद होऊ शकतात. अशा परिस्थितीत कौटुंबिक वाद टाळून शांत रहावे.

चंदनाचा टिळा लावावा.

कन्या

या आठवड्यात कामानिमित्त प्रवास कराल, त्यात यश मिळेल. नवीन कामाच्या करारावर स्वाक्षरी कराल. ज्यामुळे आर्थिक फायदा होईल. वैयक्तिकरित्या,  भागीदारांसाठी प्रयत्न कराल आणि त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिक्रिया प्राप्त करतील. या आठवड्यात आपल्या वैयक्तिक नातेसंबंधांकडे लक्ष देणे आवश्यक आहे जेणेकरून संबंध अधिक दृढ होतील. व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर काळ आहे.

पिंपळाचे पान जवळ ठेवा

तूळ

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आळशीपणाने भरलेला असेल. ते कामावर सक्रिय राहणार नाहीत किंवा कामावर जास्त लक्ष देणार नाहीत. हे तणाव आणि जास्त कामामुळे असू शकते. त्यांना 1-2 दिवस विश्र्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय जास्त विचार करणे टाळावे लागेल. जास्त विचार केल्याने तणाव वाढू शकतो आणि आरोग्य बिघडू शकते.

काजळाची डबी जमिनीत पुरावी.

वृश्चिक

या आठवड्यात भावंडांशी किंवा चुलत भावांशी व्यवहार करण्यात अडचणी येण्याची शक्मयता आहे. कौटुंबिक वादाला सामोरे जावे लागू शकते. त्यांच्यात मतभेद किंवा वाद होऊ शकतात. पण त्यामुळे त्यांच्या नात्याला हानी पोहोचणार नाही. या संपूर्ण आठवड्यात कामाच्या समस्यांमुळे निराश राहू शकता. याचा अर्थ नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी काम संथ किंवा निराशाजनक असू शकते.

अत्तर दान द्या

धनु

या राशीचे लोक त्यांच्या मित्रांना त्यांच्या व्यवसायात मदत करण्यात व्यस्त राहतील. सल्ला देण्याचा प्रयत्न करा पण जर तुम्हाला त्या सल्ल्याबद्दल किंवा तुमच्या मताबद्दल पूर्ण विश्वास असेल तरच. या काळात बरेच संपर्क साधाल. ज्याचा उपयोग भविष्यात व्यावसायिक वाढीसाठी करू शकाल. हे संपर्क इतर कोणाशीही शेअर करू नका व ते स्वत:साठी ठेवा.

मोरपीस जवळ ठेवा.

मकर

या आठवड्यात उदास वाटू शकते आणि जोडीदारासमोर रडणेदेखील होऊ शकते. तुमचा जोडीदार तुमचे सांत्वन करेल.  सामान्य स्थितीत येण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. लोकांसाठी कामातून वेळ काढणे आणि जोडीदार आणि कुटुंबासोबत वैयक्तिक वेळ घालवणे महत्त्वाचे आहे. त्याचवेळी, व्यावसायिकदृष्ट्या थोडे अधिक काम करावे लागेल.

केळीच्या झाडाची पूजा करा.

कुंभ

नवीन मित्रांच्या भेटीमुळे तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तुमचे कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होईल. या राशीच्या लोकांना या आठवड्यात व्यवसायात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. या राशीच्या व्यावसायिकांनी लक्षात ठेवावे की, त्यांनी घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नये. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला व्यवसाय वाढवण्याचा विचार करावा.

सोनेरी पेन गिफ्ट द्या.

मीन

sत़ुमचा हा आठवडा खूप व्यस्त असेल. कामात व्यस्त असाल आणि काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त तास काम करावे लागेल. तुमच्या कामगिरीबद्दल वरिष्ठांकडून नकारात्मक टिप्पण्या मिळू शकतात. ज्यामुळे तुम्ही नाराज होऊ शकता. मीन राशीच्या लोकांनी निराश होण्याची गरज नाही, फक्त तुमचे काम मनापासून करत रहा. यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या कामाचे फळ लवकरच मिळू शकेल.

हळकुंड जवळ ठेवा

टॅरो  उपाय: - झिबू चिन्हे हे देवदूताचे प्रतीक आहेत आणि ते स्वत:ची ऊर्जा  निर्माण करतात. तुम्ही त्यांना जितके जास्त काढाल तितके तुम्हाला त्यांच्याकडून अधिक फायदा मिळेल. पुढील झिबू चिन्ह हे कोणत्याही ध्येय प्राप्ती करता वापरू शकता. तुम्ही हे चिन्ह थेट शरीरावर काढू शकता. (हिरवा रंग) किंवा हे फ्रेम करा आणि डेस्क, ध्यान कक्ष, ड्रॉईंग रूम, कामाची जागा, बेडरूममध्ये ठेवा. सकारात्मक वर्तमान काळात तुमची ध्येये लिहा.

Advertisement
Tags :
×

.