For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

राशिभविष्य

06:01 AM Feb 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य

मेष

Advertisement

मनात नसताना प्रवास करावा लागू शकतो. गरज आणि आवड यातील फरक समजून पैसे खर्च करावेत. नाहीतर वायफळ खर्च होईल. कामाच्या ठिकाणी इतर लोक तुमच्या स्वभावाचा फायदा उचलू शकतात. पैशांची येणी वसूल करण्याची गरज आहे. तुम्ही ठरवले तर हातात घेतलेले काम पूर्ण कराल. विद्यार्थी वर्गाला अनुकूल काळ आहे. व्यावसायिकांनी थोडे सबुरीने काम घ्यावे.

पिवळा रूमाल जवळ ठेवावा

Advertisement

वृषभ

Advertisement

आळस झटकून कामाला लागण्याची गरज आहे. कामांचे नीट नियोजन केल्यास कामे वेळेवर पूर्ण होतील. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करून चालणार नाही. छोटे मोठे आजार नंतर मोठा त्रास देऊ शकतात. आर्थिक बाबतीत समाधानकारक आठवडा असेल. कामाच्या ठिकाणी सोबत काम करणाऱ्याबरोबर योग्य तो व्यवहार ठेवा. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्याने वैवाहिक जीवनात ताणतणाव वाढू शकतो.

हिरवे मूग दान द्यावे

मिथुन

तुमच्या बोलण्याचा लोक चुकीचा अर्थ काढून राग धरू शकतात. या आठवड्यात एकाच वेळी बरीच कामे करावी लागल्याने तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. शक्मयतो इतरांवर अवलंबून राहण्याचे टाळा. आर्थिक बाबतीमध्ये हा आठवडा सर्वसामान्य असेल. एखादी परिचित व्यक्ती किंवा मित्र आर्थिक सहाय्य मागेल जे पूर्ण करणे तुम्हाला जड जाईल. लहान भावंडांची काळजी वाटेल. ज्येष्ठ व्यक्तीचे सहकार्य प्राप्त होईल.

लाल फळ दान द्यावे

कर्क

आपण इतरांच्या स्वभावाला बदलू शकत नाही पण स्वत:च्या सवयींमध्ये बदल करू शकतो याची जाणीव करून देणारा आठवडा असेल. आर्थिक ताण तणाव आणि समस्या यांच्यावर मात कराल. यासाठी एखाद्या मित्राची मदत मिळेल. पूर्वी केलेल्या चांगल्या कृत्याचा परिणाम तुम्हाला दिसू शकतो. कुटुंबातील व्यक्तींसाठी जास्त कष्ट करावे लागतील. प्रेम संबंधांमध्ये काहीसा निराशेचा सूर असेल. वैवाहिक जोडीदाराचे म्हणणे समजून घ्या.

तीळ दान द्यावे

सिंह 

या आठवड्यात आरोग्याच्या छोट्या-मोठ्या तक्रारींना सामोरे जावे लागू शकते. खास करून अंगदुखी व डोकेदुखी त्रास देईल. जवळच्या व्यक्तींच्या वागण्याचा राग येऊ शकतो. खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करावे लागेल. प्रवास करत असताना सावध राहण्याची गरज आहे. कामे पूर्ण करण्याकरता इतरांची मदत घ्यावी लागली तर त्यात गैर काहीच नाही.

गरजूला पांघरूण दान द्यावे

कन्या

काही बाबतीमध्ये संघर्ष जाणवेल. हा संघर्ष आर्थिक किंवा भावनिक स्वरूपाचा असू शकतो. तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. छोट्या-मोठ्या आजारांनी त्रस्त होण्याची शक्यता आहे. कुणाकडे पैसे अडकले असतील तर ते वसूल करण्याकरता योग्य वेळ आहे. कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल. जितका शक्य आहे तितका स्वत:च्या कामाशी मतलब ठेवा.

फळांचे दान द्यावे

तूळ

मित्रांचा सहवास प्राप्त होईल आणि मित्रांमुळे चांगली मदतदेखील मिळू शकते. या आठवड्यात घरासाठी काही आवश्यक सामान खरेदी कराल. प्रिय व्यक्तीबरोबर बाहेर फिरायला जाऊ शकता. रोमँटिक स्वभावामुळे पार्टनर खूश असेल. या आठवड्यात कामे पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू नका, नुकसान होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य आठवडा असेल. व्यापारी वर्गाला जास्त मेहनत करावी लागेल.

कामाला जाताना सूर्याचे दर्शन घ्यावे

 वृश्चिक

चांगल्या कामांचे फळ चांगलेच मिळते याचा अनुभव येण्याची शक्मयता आहे. तुम्ही दुसऱ्यांकरता जे करता त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना जो फायदा होतो त्याने तुमचेही भले होते हे दाखवणाऱ्या घटना घडतील. कामाच्या ठिकाणी कष्ट करण्याला पर्याय नसेल. पण त्या कष्टाचे चीजही होईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीविषयी काळजी वाटू शकते. आठवड्याच्या शेवटी सूचक स्वप्ने पडतील.

गाईची सेवा करावी

धनु

आठवड्याच्या सुऊवातीलाच आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. उत्साहात कमी आणि आळस यामुळे कामे पूर्ण होण्याकरता अडथळे येऊ शकतात. या आठवड्यात तुमची भेट अशा एखाद्या व्यक्तीशी होऊ शकते. जिच्यामुळे अडचणी काही प्रमाणात कमी होतील. आठवड्याच्या मध्यावरती कामांचा वेग वाढवावा लागेल. सहकाऱ्यांशी जुळवून घेऊन कामे केल्यास चांगले परिणाम मिळतील. जुने मित्र भेटतील.

पिवळ्या कागदावर स्वस्तिक काढून जवळ ठेवा

मकर

या आठवड्यात काही प्रमाणात रिलॅक्स आणि हलके वाटेल. कामांमधील अडचणी दूर होतील. कामे पूर्ण होण्यास वेळ लागला तरी तुम्ही केलेल्या कष्टाचे चांगले फळ तुम्हाला प्राप्त होईल. मनातील प्लॅन किंवा गुप्त गोष्टी कितीही जवळचा मित्र किंवा मैत्रीण असली तरी सांगू नका. घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या पद्धतीविषयी काळजी वाटू शकते. मुलांच्या अभ्यासावरून आई-वडिलांमध्ये चिंतेचे वातावरण राहील. तब्येतीची योग्य ती काळजी घ्या.

मुंग्यांना साखर घालावी

कुंभ

या आठवड्यात काही घटना अशा घडू शकतात, की ज्यामुळे तुमचा स्वाभिमान किंवा इगो दुखावला जाण्याची शक्मयता आहे. अशावेळी मनावर संयम ठेवून भविष्यातील अप्रिय घटना टाळण्याचा प्रयत्न करा. धनप्राप्ती करता कष्टाचे प्रमाण वाढवावे लागेल. कुटुंबात एखादी घटना अशी घडेल, की ज्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल. पती-पत्नीमध्ये कलह बऱ्याच अंशी कमी होतील. आर्थिक नियोजन योग्य रीतीने केले तर फायदा होईल.

उगवत्या सूर्याचा फोटो जवळ ठेवा

मीन

चांगल्या संधी मिळण्याचे संकेत आहेत. या संधी जवळच्या नातेवाईकांमुळे किंवा मित्रांमुळे मिळतील. नोकरदार वर्गाला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी प्राप्त होऊ शकते. आठवड्याची सुऊवात मनपसंत व्यक्तीच्या भेटण्याने होईल. कामाच्या ठिकाणी इतरांच्या तुलनेत तुम्ही काही प्रमाणात रिलॅक्स असाल. कोर्टकचेरीच्या संदर्भात लेखी कामांना पूर्ण करताना सावध राहण्याचा इशारा देत आहे.

बत्तासे दान द्यावे

टॅरो उपाय:  नोकरी करणे म्हणजेच वरिष्ठांची हांजी हांजी करणे!! काही वेळा नको त्या ठिकाणी बदली होते आणि त्याचा मनस्ताप होतो. नोकरीतील त्रासाकरता किंवा   नोकरीत बदलीबाबत काही समस्या असल्यास तांब्याच्या भांड्यात लाल मिरचीचे दाणे टाकून सूर्यदेवाला अर्पण करावे. 21 दिवस असे केल्याने ही समस्या दूर होईल.

Advertisement
Tags :
×

.