For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

राशिभविष्य

06:01 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य

उपायच उपाय. . .  तोडगेच तोडगे!!!! 

Advertisement

(भाग - 3)

आपल्या घरात दिवसातून एकदा तरी शंख ध्वनी वाजलाच पाहिजे. शंखध्वनीची फ्रिक्वेन्सी ही युनिव्हर्सल फ्रिक्वेन्सीला आकर्षित करते आणि त्यामुळे घरात रोगराई आणि नकारात्मकता राहत नाही. शंखजलाचा शिडकाव घरातील नकारात्मकता दूर करतो आणि घरात होणारे अकारण वादविवाद कमी होतात. दक्षिणावर्ती शंखाला तिजोरी किंवा दुकानाच्या गल्ल्यात ठेवल्यास  दरिद्रतेचा नाश होतो. आपल्या घरात एखाद्या जागेला निगेटिव्हिटी जास्त वाटत असेल तर तिथे एका काचेच्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये सैंधव मीठ घालावे पाण्याचा रंग जर बदलला तर तिथे समस्या आहे हे नक्की. बेडरूममध्ये कुठल्याही देवतेचा फोटो चुकूनही लावू नये. काही अति शहाणे वास्तूवाले बेडरूममध्ये राधाकृष्णाचा फोटो लावायला सांगतात. अहो जरा विचार करा राधा आणि कृष्णाचे नाते काय? असा फोटो बेडरूममध्ये लावणे योग्य आहे का? आणि लावलाच तर ‘पती-पत्नी और वो’ ही शक्मयता निर्माण होणार नाही का? म्हणून बेडरूममध्ये कुठलाही देवतेचा फोटो लावणे योग्य नाही. बेडरूममध्ये उष्टी भांडी ठेवल्यास आपल्या जीवनसाथीच्या तब्येतीवर परिणाम होतो हे नक्की. तेव्हा असे चुकूनही करू नका. जेवण केव्हाही स्वयंपाक घरातच करावे. काही लोक देवळात जातात, देवाला नमस्कारदेखील करतात आणि प्रदक्षिणा घालताना देवाच्या पाठीमागील भिंतीवर देखील डोके टेकवतात. श्र्रद्धेचा भाग जरी वेगळा असेल तरी हे शास्त्रात कुठेही उल्लेखित नाही. उलट विग्रहाच्या मागे कधीही डोके टेकून नमस्कार करू नये. विशेषत: कृष्णाच्या, गणपतीच्या विग्रहाच्या बाबतीत हे लागू होते. असे करून पुण्यक्षय होतो यात शंका नाही. ज्यांची तब्येत वारंवार बिघडते किंवा ज्यांचा बऱ्याचदा अॅक्सिडेंट झालेला आहे किंवा अॅक्सिडेंटची भीती असते अशांनी आपल्याजवळ तुरटीचा एक तुकडा कायम ठेवावा. काळ्या कपड्यामध्ये तुरटी बांधून  घराच्या प्रत्येक रूममध्ये ठेवली तर समृद्धी यायला वेळ लागत नाही. महागडे उपाय करण्यापेक्षा हा उपाय कितीतरी श्रेष्ठ आहे. ज्याला नजर लागते त्याला तुरटीने डोक्मयापासून पायापर्यंत स्पर्श करा. सात वेळा उतरवावी आणि जाळावी. पती-पत्नीमध्ये कायम बेबनाव होत असेल तरी प्राचीन उपाय आहे तो म्हणजे ज्या कॉटवर पती-पत्नी  झोपतात त्याचा एक पाय अर्धा इंच वर करावा.  आपल्याकडे  साडेसाती  किंवा पनोती याची प्रचंड भीती आहे. (जी खरोखर नाहक आहे) शनिदेव हा एकमात्र वायुकारक ग्रह आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ  शांत चित्ताने कमीत कमी 20 दीर्घ श्वसन करणे  हा जालीम उपाय आहे. कित्येक लोक साडेसाती आहे म्हटल्यानंतर देव देव करायला लागतात आणि सांगायची गोष्ट म्हणजे त्यांचे कष्ट आणखीन वाढतात. म्हणून हात जोडून सांगतो, जसे आहात तसे रहा. भीतीपोटी खूप जास्त देव देव केल्याने कुठलेही कष्ट दूर होत नाहीत उलट  मानसिक अपंगत्व येते. त्यामुळे भीती पहिल्यांदा काढून टाका. शनि महाराजांची मकर राशी गुडघे दाखवतात आणि शनिदेव शुक्राच्या तूळ राशीमध्ये उच्च असतात. म्हणून शनी महादशेमध्ये, साडेसाती किंवा पनोतीमध्ये जे लोक आपल्या बायकोला राणीसारखे ठेवतात त्यांना कष्ट कमी होतात ते सत्य. कोणत्याही प्रकारचे कष्ट दूर करण्याचा रामबाण उपाय म्हणजे पिंपळाच्या खोडाला कच्चा धागा गुंडाळणे. पिंपळाच्या झाडाला शनिवारी दूध मिश्रित पाणी घातल्याने आणि तिथे दिवा लावल्याने खूप फायदा होतो. शत्रू पिडा कमी व्हावी म्हणून एक रामबाण उपाय सांगत आहे. मातीच्या पात्रात ब्रांडी दारू घ्यावी. त्यात आपला चेहरा बघावा आणि जिथे भैरव मंदिर आहे तिथे हा ठेवून द्यावा. हे कालाष्टमी दिवशी किंवा राहूकाळात किंवा सूर्यास्ताच्या वेळेला करावे.

Advertisement

मेष

Advertisement

जीवनात अनेक सकारात्मक बदल होतील. जमीन किंवा वाहन खरेदी शक्मय आहे. काही लोकांना भागीदारीसह नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्मयता आहे. पैशाची आवक होण्याचे नवीन मार्ग मोकळे होतील. तुम्ही घर दुऊस्त करण्याची योजना करू शकता, परंतु तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्य सुधारेल. भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल.

उपाय: कामाला निघताना निर्माल्य जवळ ठेवा

वृषभ 

आर्थिक बाबतीत भाग्यवान राहाल. व्यवसायात विस्तार होईल. कायदेशीर बाबींमध्ये तुमचा विजय होईल. भौतिक सुखसोयी आणि संपत्तीत वाढ होईल. वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होईल. आर्थिक निर्णय अतिशय हुशारीने घ्या आणि पैशाच्या बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. कुटुंबात सुख-शांती नांदेल.

उपाय :हळदीची गाठ पिंपळाखाली ठेवा

मिथुन

उत्पन्न वाढीचे नवीन स्रोत निर्माण होतील. भागीदारी व्यवसायात आर्थिक लाभ होईल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. व्यावसायिक जीवनातील समस्या दूर होतील. कार्यालयात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.  तुम्ही तुमच्या घराची दुऊस्ती करून घेऊ शकता किंवा तुमच्या मुलांच्या आवडत्या वस्तू देऊ शकता.

उपाय: सुगंधी अत्तर वापरा

कर्क

हा आठवडा सामान्य असेल. जास्त खर्चामुळे मन अस्वस्थ राहू शकते. तुमच्या खर्चावर लक्ष ठेवा. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवा. काही लोक आज नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकतात. आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. तथापि, आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि आपल्या भावंडांशी चांगले संबंध ठेवा.

उपाय :वाहत्या पाण्यात कोळसे सोडा

सिंह

आयुष्यात अनेक रोमांचक वळणे येतील. पाहुण्यांच्या आगमनामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. भागीदारीसह नवीन प्रकल्प सुरू करू शकता. दीर्घकाळापासून थकित पैसे परत मिळतील. काही लोकांच्या नोकरीत बदल होण्याची शक्मयता आहे. गुंतवणुकीचे निर्णय सावधपणे घ्या, अन्यथा तुमचे पैसे बुडू शकतात. कुटुंबासोबत काही क्षण घालवा.

उपाय :डाव्या आंगठ्या खाली 24 लिहा

कन्या

तुम्ही तुमच्या नैसर्गिक नेतृत्वगुणांचा उपयोग करून तुम्हाला नवीन दिशेने नेण्यास सक्षम आहात. तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची, काहीतरी नवीन करून पाहण्याची आणि उत्साहाने तुमची आवड जोपासण्याची हीच योग्य वेळ आहे. तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर आहात. तुम्ही वैद्यकीय गोष्टींवरही खर्च करू शकता.

उपाय: काजळाची डबी काळ्या भिकाऱ्याला दान द्या

तूळ

आर्थिक बाबतीत महत्त्वाचे बदल होतील. जमीन किंवा वाहन खरेदी शक्मय आहे. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात सुरू असलेल्या आर्थिक वादातून आराम मिळेल. तुमच्या करिअरमध्ये नवीन यश प्राप्त होईल. अविवाहित लोकांना कोणीतरी खास भेटेल. वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील.

उपाय: घरात गोमुत्र ठेवा

वृश्चिक

कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. मात्र, विरोधक कार्यालयात सक्रिय राहतील, त्यामुळे त्रास थोडा वाढू शकतो. व्यवसायासाठी वातावरण अनुकूल राहील. करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी मिळतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. रात्री वाहन चालवणे टाळा आणि वाहतूक नियमांचे पालन करा.

उपाय: देवीला लिंबांची माळ अर्पण करा

धनु

आर्थिक स्थिती सुधारेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे सुरू होतील. कार्यालयात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. कामातील आव्हाने दूर होतील. तथापि, पैशाशी संबंधित निर्णय अतिशय हुशारीने घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि पैशांची बचत करा. तुम्हाला तुमच्या वडिलांचे सहकार्य मिळेल.

उपाय : सायंकाळी कापरावर लवंग जाळा

मकर

कौटुंबिक जीवनात किरकोळ समस्या येतील. घरातील जबाबदाऱ्या वाढतील. आज घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायाशी संबंधित निर्णय अतिशय हुशारीने घ्या. भागीदारी व्यवसायातून आर्थिक लाभ होण्याची शक्मयता आहे. करिअरच्या प्रगतीसाठी नवीन संधी शोधा. आज तुम्हाला नातेवाईकांकडून काही हृदयद्रावक बातम्या मिळू शकतात.

उपाय: कपिला गायीला गूळ पोळी द्या

कुंभ

भौतिक सुखसोयी आणि संपत्तीत वाढ होईल. ऑफिसमध्ये नवीन ओळखी होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. जीवनात नवीन गोष्टी एक्सप्लोर करा. यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि मानसिक शांती मिळेल. काही लोकांना आज मालमत्तेशी संबंधित कायदेशीर वादातून दिलासा मिळू शकेल.

उपाय : निळे फूल नाल्यात टाका.

मीन

कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगा. तुमचे मन जास्त खर्चामुळे अस्वस्थ राहू शकते. ऑफिसमधील कामाच्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील. आव्हानांना घाबरू नका. त्यामुळे प्रगतीचा मार्ग सुकर होईल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.

उपाय :काळ्या शाईचा वापर टाळा

Advertisement
Tags :
×

.