महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राशिभविष्य

06:01 AM Jan 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उपायच उपाय. . . तोडगेच तोडगे!!!

Advertisement

 आजच्या पालकांना सतवणारा सगळ्यात मोठा  प्रश्न म्हणजे आपल्या मुलांचा विवाह. त्याला अनेक कारणे आहेत. पहिली गोष्ट पूर्वी ज्या वयामध्ये विवाह व्हायचा आणि आता ज्या वयामध्ये विवाह होतो त्यामध्ये प्रचंड अंतर आहे. शिक्षण,  करियर हे त्यातले महत्त्वाचे घटक. समाज कोणताही असो, शिक्षणाच्या बाबतीत आणि कार्याच्या बाबतीत समजूतदारपणा आला आहे, असे म्हणायला हरकत नाही. पण त्यामुळे होते काय की, विवाहाचे योग्य वय उलटून जाते आणि त्यानंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येते. एक लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीचा विवाह 24 व्या किंवा 25 व्या वषी झाला म्हणून तुमचा विवाह किंवा तुमच्या मुलांचा विवाह त्याच वयात व्हायला हवा, असे काही नाही.

Advertisement

काही समाजांमध्ये लवकर विवाहाची प्रथा आहे. पण त्याही समाजामध्ये  आजकाल विवाहाला विलंब ही नवीन गोष्ट राहिलेली नाही. ही पिढी नवीन आहे,  यांचे विचार वेगळे आहेत, त्यामुळे पालकांनी आपली मते मुलांवर लादणे हे बरोबर नाही आणि शक्मयही नाही. झालेला विवाह टिकणे हे सुद्धा आजकाल अवघड झालेले दिसते, बरोबर ना? आज-काल पालकांचा प्रŽ विवाह कधी होईल? यापेक्षा झालेला विवाह नीट टिकेल ना? असा असतो. विवाह चांगल्या घरी चांगल्या व्यक्तीशी व्हावा म्हणून एक प्राचीन तोडगा सांगत आहे. उपवर मुला-मुलीने काशाची ताटली/थाळी घ्यावी. त्यात तूप आणि गूळ यांचे मिश्र्रण तयार करावे. हे मिश्र्रण वाहत्या स्वच्छ पाण्यामध्ये सोडून द्यावे. ताटली तिथेच धुवावी. त्या दिवशीचे दोन्ही वेळचे जेवण ते त्याच ताटलीमध्ये करावे. हा उपाय बुधवारी करायचा आहे आणि जोपर्यंत योग्य स्थळ मिळत नाही तोपर्यंत करायचा आहे. दुसरा एक उपाय म्हणजे आंब्याच्या पानावर एक स्वस्तिक हळदीचे काढावे आणि एक स्वस्तिक कुंकवाचे काढावे. हळदीच्या स्वस्तिकावर कुंकवाच्या अक्षता घालाव्या, कुंकवाच्या स्वस्तिकावर हळदीच्या अक्षता घालाव्या आणि ते आंब्याचे पान पिंपळाखाली प्रार्थनापूर्वक ठेवून यावे. हा उपाय एकादशी दिवशी करायचा आहे, पण त्या दिवशी रविवार नसावा. लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरामध्ये सायंकाळच्या वेळेला कांदा लसूण न घातलेला फोडणीचा भात प्रसाद दाखवून लोकांमध्ये वाटल्यासदेखील विवाहासाठी अनुकूल योग तयार होतात. घरात कुठेही हिंसात्मक दृश्य असलेले चित्र किंवा त्या चित्रातून निगेटिव्हिटी जाणवत असता कामा नये.

आजकाल सोफा कम बेड सगळीकडे पहायला मिळतो. ज्यावर आपण झोपतो  त्याला खाली बॉक्स असतो आणि त्यात ठोसून ठोसून सामान भरलेले असते. पण यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि आळस वाढतो हे लक्षात घ्या. उशीला आणि उशीच्या कव्हरला वेळोवेळी धूप देणे हे अत्यंत आवश्यक आहे. कुंडलीतील बारावा भाव आणि त्याचा स्वामी हा झोपेचा कारक समजला जातो. झोप येत नसेल तर त्या ग्रहाची उपासना गरजेची आहे. आपली कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाची फाईल ज्या देवतेकडे आहे ती देवता. कुलदेवतेला सोडून इतर देवतांची उपासना करणे म्हणजे आपल्या आई-वडिलांना सोडून दुसऱ्यांच्या घरी पाणी भरल्यासारखे आहे. म्हणून किमान वर्षातून एकदा तरी आपला कुलाचार आणि कुलदेवतेला जाणे चुकवू नये.

मेष

तुम्हाला गुऊची साथ मिळत आहे. त्याचा उपयोग करून घ्या. कोणती तरी विद्या मिळवण्याची धडपड करत असाल तर आणि थोड्याशा प्रयत्नाने आपले ध्येय गाठू शकाल. संततीची पण प्रगती चांगली होईल. त्यांचे अभ्यासाकडे लक्ष लागेल. सध्या परीक्षेचे वातावरण आहे. त्यांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज लागेल. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष कऊ नका.

उपाय :चुकून सुद्धा कोणाचेही वाईट चिंतन करू नका.

वृषभ

मन अस्वस्थ राहण्याचा संभव आहे. मनाला आवर घाला. नोकर-चाकरांपासून सावधान रहा. नुकसान होण्याची शक्मयता आहे. सांभाळून रहा असा हा आठवडा तुम्हाला सांगत आहे. विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास केला पाहिजे. कष्टाने सर्व काही साध्य होते. टेन्शन घेऊ नका. पण सतर्क रहा. काहीतरी शारीरिक पीडा संभवते. तेव्हा जपून रहा.

उपाय: तहानलेल्यांना पाणी द्या.

मिथुन

आनंदही आनंद आहे. जोडीदाराबरोबर छान वेळ घालवाल. स्वत:चा काही वैयक्तिक व्यवसाय करत असाल तर चांगली प्राप्ती होण्याचा संभव आहे. व्यवसायातील भागीदारापासूनही फायदा होण्याचा संभव आहे. त्याचे आणि तुमचे व्यावसायिक संबंध थोड्याफार प्रमाणात बिघडले असतील तर सामंजस्याने घ्याल. उगाच वाद वाढवू नका. हा आठवडा छान जाईल.

उपाय: सदाचाराने वागा.

कर्क

पत्नीकडून धनलाभ होण्याची शक्मयता आहे किंवा लॉटरी वगैरे मधूनही धनलाभ होण्याची शक्मयता आहे. लॉटरीचे तिकीट काढून नशीब आजमावून पाहण्यास हरकत नाही. पण कोणती तरी मानसिक चिंता सतावण्याची शक्मयता आहे. मन शांत ठेवा. आणि धनलाभाच्या अपेक्षेमध्ये अनैतिक मार्ग स्वीकाऊ नका. धीर धरा.

उपाय: नामस्मरण करा.

सिंह

आपल्याला भाग्याची साथ लाभत आहे. संत संगती घडेल. धार्मिक कार्याकडे मन झुकेल. साक्षात्कारी स्वप्ने पडण्याचा संभव आहे. वृद्धांचे आशीर्वाद मिळतील. तीर्थयात्रा घडेल. जी कार्ये कराल त्यात यश मिळण्याची शक्मयता आहे. गुऊचा आशीर्वादही आपल्याला लाभत आहे. त्यामुळेच यश, प्रतिष्ठा, मानसन्मान आणि द्रव्यलाभ मिळण्याचा संभव आहे.

उपाय: दत्तगुरुंची उपासना करा.

कन्या

उद्योग-धंद्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. वडिलांची संपूर्ण मदत आपल्याला मिळेल. त्यांच्या आशीर्वादाने आपण यश मिळवाल. कर्ज मिळविण्यासाठी प्रयत्न करत असाल तर यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत असाल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी संपादन कराल. नोकरीत बदली-बढतीचे योग संभवतात.

उपाय: कुलदेवतेची उपासना करा.

तूळ

सर्व प्रकारचे लाभ संभवतात. काहीतरी निमित्ताने भावडांची भेट होईल. त्यांच्या सोबतचा काळ अत्यंत आनंदात जाईल. भावंडांचे प्रेम संपादन कराल. हा आठवडा आपल्याला खेळीमेळीच्या वातावरणात जाईल. कोणत्यातरी समारंभात सहभागी व्हाल. चांगले मित्र भेटतील. चांगल्या उंची वस्तूंची प्राप्ती होण्याची शक्मयता आहे.

उपाय: मुक्मया जनावरांना खाऊ घाला

वृश्चिक

खर्चाकडे लक्ष द्या. अपव्यय होऊ देऊ नका. या आठवड्यात फार खर्च होण्याची शक्मयता आहे. योग्य त्या ठिकाणीच सांभाळून खर्च करा. वाहन जपून चालवा. अपघात होण्याची शक्मयता आहे. सांभाळून रहा. कोणाशी उगाचच वादविवाद करायला जाऊ नका. अपमानित होण्यापेक्षा ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ या उक्तीप्रमाणे शांततेने वागा.

उपाय: सूर्याची उपासना करा.

धनु

हा आठवडा आपल्याला छान जाणार असे दिसते. आपल्या स्वभावात चैतन्य आल्यासारखे वाटेल. सगळीकडे सगळेच छान, छान आहे असे वाटू लागेल. रामरायांची प्रतिष्ठापना झाल्याने सगळीकडे आनंदमय वातावरण असेलच. पण तुम्ही त्यात विशेष रंगून गेलेले असाल. आपल्याला धनलाभ होण्याचीही शक्मयता आहे.

उपाय: आईचा सतत आशीर्वाद घ्या.

मकर

या आठवड्यात आपल्याला कौटुंबिक सुख भरपूर मिळेल. कामानिमित्त आपण कुटुंबापासून दूर रहात असाल तर या आठवड्यात सर्वांशी भेट होईल. आपला वेळ आनंदात जाईल. तुमच्या बोलण्याने तुम्ही सर्वांचे मन जिंकाल आणि सर्वाना आनंदी कराल. काही देण्याघेण्याचा व्यवहार असेल तर सांभाळून करणे कधीही इष्ट. आपल्या विद्वत्तेचे कौतुक होईल.

उपाय : तुळशीला पाणी घाला.

कुंभ:

नोकरी करत असाल तर आपल्या कामाने इतरांवर छाप पाडण्यात यशस्वी व्हाल. आपल्या कामाचे कौतुक तर होईलच पण आपल्या कष्टाचेही चीज होईल. व्यवसायात असाल तर आपला व्यवसाय वाढवण्यामागे आपले प्रयत्न असतील व ते प्रयत्न सफलही होतील. लहान भावंडांची भेट होईल. लहान भावंडासोबत आपला वेळ छान जाईल. खाण्याच्याबाबतीत मात्र थोडे बंधन घालावे किंवा पथ्य पाळावे.

उपाय : गुरुंची पूजा करा.

मीन

माता, वाहन, गृह या सर्वांचे सुख या आठवड्यात आपल्याला मिळण्याची शक्मयता आहे. मातेची सर्व इच्छा पूर्ण करा, तिला प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. तिच्या आशीर्वादाशिवाय आपल्याला काही मिळू शकत नाही हे लक्षात घ्या. आपण  विद्या मिळवत असाल तर त्यात तुम्ही सफल व्हाल. हा आठवडा आपल्याला छान जाईल.

उपाय:- मंदिरात जाऊन देवदर्शन घ्या.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article