For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

राशिभविष्य

06:01 AM Jan 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य

मेष

Advertisement

हा आठवडा चढ-उतार घेऊन येणार आहे. तुम्हाला या कालावधीत वेळापत्रकानुसार काम करण्याची गरज आहे. वास्तविक कौटुंबिक जीवनात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणीही वेळ प्रतिकूल राहू शकतो. नोकरदार वर्गाला ऑफिसमध्ये पॉलिटिक्सचा सामना करावा लागू शकतो. आईच्या तब्येतीची काळजी घ्या.

मुंग्यांना साखर घाला

Advertisement

वृषभ

Advertisement

राजकारणात यश मिळू शकते. जे तुम्हाला विरोध करतात, ते या काळात तुमच्यासमोर काहीही बोलू शकणार नाहीत. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला जाणार आहे. यावेळी तुम्ही तुमच्या जुनाट आजारांपासून मुक्त होऊ शकता. आर्थिक बाबतीतही सावध राहण्याची गरज आहे. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार देत असाल तर त्याची पूर्ण चौकशी करूनच निर्णय घ्या.

आंबट गोड मिठाई  दान द्या

मिथुन

कामात अडथळे येऊ शकतात. जी कामे आत्तापर्यंत फक्त मनात होती, ती आता प्रत्यक्षात येऊ शकतात, पण त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. तसेच घरातील सर्व काही सुरळीत होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण कराल आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न कराल. आरोग्याच्या दृष्टीने सावध राहण्याची गरज आहे.

सुगंधी अत्तर लावा

कर्क 

तुमचा वाईट काळ संपला आहे. या काळात तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता. पण कुणावरही अति विश्वास ठेवू नका. या काळात तुम्हाला तुमच्या मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. स्पर्धांचा निकाल विद्यार्थ्यांसाठी चांगला राहील. एखाद्या समारंभामध्ये भाग  घ्याल.  ज्यामध्ये  जुने मित्र आणि  थोरामोठ्यांच्या  भेटी होतील. तब्येतीच्या बाबतीत निष्काळजी राहू नका.

चौमुखी दिवा लावा

सिंह 

हा महिना प्रेम प्रकरणांसाठी खूप अनुकूल असणार आहे. जुन्या मित्राशी अचानक भेट होण्याची शक्मयता आहे, जी फायदेशीर ठरेल. वर्गातील विद्यार्थी या काळात खूप मेहनत घेतील. या राशीचे लोक जे लग्नासाठी पात्र आहेत, त्यांची वैवाहिक इच्छा या महिन्यात पूर्ण होऊ शकते. तसेच, जे विवाहित व्यक्ती सतंतीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना सुखाचा लाभ मिळेल.

पक्ष्यांना खाऊ घाला

कन्या

या काळात शत्रूंपासून थोडे सावध राहा, नाहीतर शत्रू तुमचे नुकसान करण्यात यशस्वी होतील. वैवाहिक जीवनातही दोघांमध्ये वाद होऊ शकतो. शत्रूंच्या गुप्त कारस्थानांपासून सावध राहण्याची गरज आहे, कठोर परिश्र्रम करावे लागतील. मंगल कार्यामध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. समाजामध्ये  नावलौकिक वाढेल. घरामध्ये वाद संभवतो.

वाहत्या पाण्यात नाणी टाका

तूळ 

प्रॉपर्टीशी संबंधित काम करू शकता. एवढेच नाही तर या काळात तुम्ही तुमचे नवीन घरदेखील बनवू शकता. व्यवसायात नफा सामान्यपणे मिळत राहील. तसेच तुमच्या नशिबाचा तारा उंचावर राहील. या आठवड्यात तुम्ही नवीन वाहनदेखील खरेदी करू शकता. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. तुमचा मान-सन्मान वाढेल. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

पिंपळाला प्रदक्षिणा घाला

वृश्चिक

आठवडा तुमच्यासाठी आनंदाचा असेल. तुमची रखडलेली कामे या काळात पूर्ण होतील, तसेच नोकरीत बढती मिळण्याची शक्मयता आहे. तुम्ही लांबच्या प्रवासालाही जाऊ शकता. नोकरीच्या ठिकाणी तुमचा सन्मान वाढेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा स्नेह लाभेल. तब्येतीच्या जुन्या तक्रारी डोके वर काढू शकतात,   त्यामुळे वैद्यकीय  सल्ला घ्यायला वेळ करू नका.

लिंबाच्या झाडाला पाणी घाला

धनु  

उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. विद्यार्थी वर्गासाठी काळ थोडा प्रतिकूल राहू शकतो. तब्येतीच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. खाण्यापिण्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. विनाकारण कायदेशीर अडचणीत अडकणे टाळा. पेपरवर्क करताना पेपर काळजीपूर्वक वाचा. एखाद्याचे भले करायला जात असताना नुकसान होण्याची शक्मयता जास्त आहे.

अन्नदान करा

मकर

आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. खाण्यापिण्याच्या सवयींवर शक्मयतो नियंत्रण ठेवा. मित्रांसोबत चांगले संबंध ठेवा. एखाद्या गोष्टीमुळे मानसिक त्रास होऊ शकतो. यावर उपाय म्हणून तुम्ही कुत्र्यांना आणि पक्ष्यांना खायला द्यावे, यामुळे तुमचे मन तर शांत होईल. आजूबाजूच्या लोकांमध्ये आपले कोण आणि परके कोण हे ओळखणे आवश्यक आहे.

मोरपीस जवळ ठेवा

कुंभ 

स्थिती फारशी अनुकूल दिसत नाही. यामुळे जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणीही काही समस्या असू शकतात, परंतु तुम्ही तुमच्या बोलण्याच्या कौशल्याने त्या सोडवाल. समारंभात भाग घेताना वाणीवर  संयम ठेवा.

डाव्या हातावर  1199  नंबर लिहा

मीन

थोडे सावध राहणे आवश्यक आहे. तुमचे शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील आणि ते तुम्हाला इजा करण्यात यशस्वीही होऊ शकतात. जोडीदाराशी संबंध बिघडू शकतात. तुम्हाला सल्ला दिला जातो की शत्रूंच्या गुप्त कारस्थानांपासून सावध राहण्याची गरज आहे, तुम्हाला कठोर परिश्र्रम करावे लागतील. सरकारी कामांमध्ये यश मिळण्याची शक्मयता आहे.

केशरी टिळा लावा

टॅरो  उपाय : कर्ज  अंगावर असणे  म्हणजे  कायम टेन्शनखाली  जगण्यासारखे आहे.  जोपर्यंत ते कर्ज फिटत नाही  तोपर्यंत   आपल्याला चैन नसते.   प्रत्येकाला वाटते की आपल्यावर कर्ज असूच नये. याकरता घरात, दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाची तसवीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी. कर्ज घेण्याची वेळ कधीच

Advertisement
Tags :
×

.