हुडाच्या नाबाद शतकाने राजस्थानला आघाडी
वृत्तसंस्था/ जयपूर
रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरु असलेल्या सामन्यात रविवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी दीपक हुडाच्या नाबाद शतकाच्या जोरावर यजमान राजस्थानने मुंबई विरुद्ध पहिल्या डावात 4 बाद 337 धावा जमवित 83 धावांची आघाडी मिळविली. तत्पूर्वी मुंबईचा पहिला डाव 254 धावांत आटोपला होता.
मुंबईच्या पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने 1 षटकार आणि 8 चौकारांसह 67, मुशिर खानने 3 चौकारांसह 49, मुल्लानीने 3 चौकारांसह 32, तुषर देशपांडेने 2 चौकारांसह नाबाद 25 धावा केल्या. राजस्थानच्या अजय सिंगने 66 धावांत 4 तर अशोक शर्माने 3 गडी बाद केले. त्यानंतर राजस्थानने बिनबाद 10 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली. सचिन यादव आणि कर्णधार लोमरोर यांनी दुसऱ्या गड्यासाठी 94 धावांची भागिदारी केली. यादवने 15 चौकारांसह 92 तर लोमरोरने 5 चौकारांसह 41 धावा जमविल्या. सचिन यादव आणि दीपक हुडा यांनी तिसऱ्या गड्यासाठी 92 धावांची भर घातली. राठोडने 1 चौकारासह 29 धावा जमविल्या. दीपक हुडा 13 चौकारांसह 121 तर कार्तिक शर्मा 1 षटकार आणि 1 चौकारासह 26 धावांवर खेळत आहेत.
संक्षिप्त धावफलक - मुंबई प. डाव 254, राजस्थान प. डाव 4 बाद 337 (दीपक हुडा खेळत आहे 121, सचिन यादव 92, लोमरोर 41, राठोड 29, कार्तिक शर्मा खेळत आहे 26, तुषार देशपांडे 2-50).