Sangli News : आष्ट्यात खाकी वर्दीतील नारीशक्तीचा सन्मान !
भाजपचे अभिजीत बिरनाळे यांचा अभिनव उपक्रम
आष्टा : आष्टा पोलिस स्टेशनच्या वर्दीतील नारीशक्तीचा खाकी भाजपाचे अभिजीत यांच्यातर्फे भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. अभिजीत बिरनाळे यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बिरनाळे अभिजीत बिरनाळे म्हणाले, खाकी वर्दीतील महिला कधी लोकांच्या संरक्षणासाठी समोर येतात तर कधी मदतीचा हात घेऊन पुढे येतात. तर कधी अन्याया विरोधात उभे राहतात. नारी असते सक्षम, नारी असते सर्वस्व, केवळ कुटुंबाचे नव्हे तर संधी मिळेल त्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविण्यात नारी नेहमीच अग्रेसर असते.
गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या नवरात्र उत्सवात याच नारीशक्तीचा आपण सन्मान करतो. नवरात्र उत्सवानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत राहून आपल्या कामगिरीने प्रभावित करणाऱ्या आष्टा शहरात खाकी वर्दीतील महिलांचा त्यांना भेटवस्तू देऊन सन्मान सत्कार करण्यात आला.
यावेळी गजानन दाटिया, विनोद कांबळे, शाहजान जमादार, स्वप्नील मुळीक, वैभव मोहिते आदी उपस्थित होते.