शिवराज हायस्कूलच्या उत्कृष्ट क्रीडापटूंचा गौरव
वार्ताहर/उचगाव
बेनकनहळ्ळी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित शिवराज हायस्कूल येथे उत्कृष्ट क्रीडापटूंचा गौरव करण्यात आला. शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष नारायण पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे खजिनदार व सह्याद्री मल्टिपर्पज मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे विद्यमान चेअरमन एन. बी. खांडेकर, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे संचालक पी. पी. बेळगावकर, बेनकनहळ्ळी ग्राम पंचायत चेअरमन डॉ. वाय. एम. पाटील, प्रदीप पाटील, परशराम पाटील, माऊती पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापक पी. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. बी. पी. काटकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून स्वागत केले. त्यानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
कराटेपटूंचा गौरव
यानंतर कराटे स्पर्धेत राज्यस्तरीय निवड झालेला हर्षद पाटील, जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत निवड झालेला आनंद जाधव, बेळगुंदी झोनमध्ये जनरल चॅम्पियनशिप मिळविलेला संकेत मंडलिक यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जिल्हास्तरीय निवड झालेल्या मुलीच्या कबड्डी संघातील सर्व खेळाडूंचा प्रदीप पाटील, परशराम पाटील व शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष व सदस्य यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. वरील सर्व खेळाडूंना धनंजय जाधव यांनी दिलेल्या टि-शर्टचे वितरण केले.सूत्रसंचालन पी. के. झांजरी यांनी केले. एम. पी. यळळूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शाळा सुधारणा कमिटीचे सर्व सदस्य, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.