महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोकमान्य सोसायटीच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांचा गौरव

12:06 PM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हिंडलगा : विनायकनगर येथील लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी (मल्टिस्टेट) यांच्यावतीने या भागातील ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य चंद्रकांत दे. कुलकर्णी, प्रमुख निमंत्रित सोमनाथ जायन्नवर, आनंद डी. पाटील, लक्ष्मीकांत आंबेडकर, महादेव कुंभार, निवृत्त प्रा. अजित जाधव, इंडॉलचे निवृत्त अधिकारी उदय नाईक उपस्थित होते. शाखेचे व्यवस्थापक किशोर हळदणकर यांनी स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक बाबासाहेब भोसले, भाऊ शिंदे, निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुंदकर यांनी मनोगते व्यक्त केली. निवृत्त प्रा. अजित जाधव यांनी बचतीचे महत्त्व पटवून दिले. जीवनात आनंदी राहण्यासाठी अशा प्रकारचे दिन साजरे करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. याप्रसंगी वर्धिनी पाटील, संतोष राणे यांनी लोकमान्य सोसायटीच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या ठेवींबाबत माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य कुलकर्णी यांनी लोकमान्य सोसायटीच्या पारदर्शक व्यवहाराबद्दल प्रशंसा केली. भाऊ कुराडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अंकिता चौगुले यांनी केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article