For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयपीएस संदीप पाटील यांचा गौरव

10:59 AM Sep 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
आयपीएस संदीप पाटील यांचा गौरव
Advertisement

बेळगाव : डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे नुकत्याच झालेल्या आयर्नमॅन ट्रायथलॉनमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कर्नाटकातील कार्यक्षम आणि प्रख्यात आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांना काहेर आणि स्विमर्स क्लब बेळगावने सन्मानित केले. या कठीण ट्रायथलॉनमध्ये 3.8 किमी पोहणे, 180 किमी सायकलिंग आणि 42 किमी धावणे यांचा समावेश होता. पूर्ण समर्पण, दृढनिश्चय आणि इच्छाशक्तीच्या बळावर,  पाटील यांनी 14 तास 45 मिनिटांत ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली.  जेएनएमसी येथे आयोजित केलेल्या सत्कार समारंभात, जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.उपस्थितांना संबोधित करताना,पाटील यांनी तंदुऊस्तीसाठी पोहण्याचे महत्त्व सांगुन शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.