भास्कर सामंत कला तपस्वी पुरस्काराने सन्मानित
दशावतार कला प्रशिक्षणालाही उत्स्फूर्त प्रतिसाद
कुडाळ -
दत्त माऊली पारंपरिक लोककला दशावतार शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशीय मंडळ (सिंधुदुर्ग ) यांच्यावतीने दिला जाणाऱ्या दत्तामाऊली कला तपस्वी पुरस्काराने तंरदळे ( कणकवली ) गावचे सुपुत्र व ज्येष्ठ रंगकर्मी गुरुवर्य भास्कर उर्फ भाई सामंत याना सन्मानित करण्यात आले. हुमरमळा ( वालावल ) येथील रामेश्वर मंगल कार्यालयात हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. एका ज्येष्ठ दशावतारी कलाकाराला एका ज्येष्ठ नाट्य प्रेमींकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दशावतार लोककला प्रशिक्षण शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.ज्येष्ठ मार्गदर्शक व अनुभवी दशावतार कलावंत गुरुवर्य भास्कर सामंत यांना नेरुर (कुडाळ ) गावचे सुपुत्र सर्वसामान्य व्यक्तिमत्व, जाणकार ज्येष्ठ नाट्य प्रेमी प्रकाश करलकर यांच्या हस्ते सन 2024 चा "दत्तमाऊली कला तपस्वी पुरस्कार" प्रदान करण्यात आला. हुमरमळा सरपंच अमृत देसाई, सरपंच संघटना अध्यक्ष प्रेमानंद देसाई, ॲड. सोनू गवस, ॲड पी. डी. देसाई, विश्वंभर वालावलकर, प्रकाश तेंडोलकर ,मसाले उद्योजक प्रकाश परब, प्रशिक्षक ज्येष्ठ रंगकर्मी तुकाराम उर्फ अण्णा गावडे, गुरुवर्य यशवंत तेंडोलकर, सुरेश गुरव व आनंद नार्वेकर आणि संस्थाध्यक्ष सिताराम उर्फ बाबा मयेकर यांच्यासह दत्त माऊली संस्थेचे पदाधिकारी - सदस्य ,दशावतार कला प्रेमी, प्रशिक्षणार्थी ,संस्थेचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन्मानचिन्ह ,रोख रक्कम ,शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.