हॉनर मॅजिक 6 प्रो स्मार्टफोन लॉन्च
90 हजार किंमत : 108 मेगापिक्सलचा कॅमेरा : ट्रिपल कॅमेऱ्यासोबत फोन सादर
नवी दिल्ली :
चिनी स्मार्टफोन कंपनी हॉनरने आपला हॉनर मॅजिक 6 प्रो हा स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केला आहे. फोटोग्राफी, डिस्प्ले क्वालिटी आणि एकंदरच कार्यक्षमतेमध्ये हा फोन अव्वल असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सदरच्या स्मार्टफोनची किंमत 90 हजाराच्या आत असणार असून हा स्मार्टफोन दोन रंगांमध्ये सादर केला जाणार आहे.
या स्मार्टफोनची बॅटरी 5600 एमएएच क्षमतेची असणार आहे. 6.80 इंचाचा ओएलइडी डिस्प्ले देण्यात आला असून कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जन 3 चीपसेट यामध्ये दिली गेलेली आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा असून 50 मेगापिक्सलचे दोन आणि 108 मेगापिक्सलचा एक कॅमेरा यामध्ये असेल. सेल्फी शूटरसाठी 50 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. 80 डब्ल्यूची वायर चार्जिंग सुविधा आणि 66 डब्ल्यूची वायरलेस चार्जिंग सुविधा यामध्ये दिली गेली आहे. इपीआय ग्रीन आणि ब्लॅक या रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे. 12जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेजची व्यवस्था असणारा हा स्मार्टफोन 89 हजार 999 रुपयांना उपलब्ध होणार आहे. स्मार्टफोनची विक्री 15 ऑगस्टनंतर अमेझॉन आणि महत्त्वाच्या स्टोअर्सवर सुरू केली जाईल.
वैशिष्ट्यो...
?6.80 इंचाचा ओएलइडी डिस्प्ले
?5600 एमएएच क्षमतेची बॅटरी
?वायर आणि वायरलेस चार्जिंग सुविधा
?12 जीबी व 512 जीबी स्टोरेजची सोय