महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नदीवर नारळ वेचणाऱ्या महिलेचा प्रामाणिकपणा ! 10 तोळ्याचा राणीहार केला परत

05:20 PM Sep 12, 2024 IST | Abhijeet Khandekar
Karad News
Advertisement

कराड वार्ताहर

कृष्णा-कोयनेच्या पवित्र प्रीतिसंगमात विसर्जित करण्यात येणारे नारळ, ब्लाऊज पीस व नाणी शोधणाऱ्या अत्यंत गरीब महिलेला अंदाजे साडेआठ लाख रूपये किमतीचा 10 तोळयाचा सोन्याचा राणीहार सापडला. मात्र ओळखीचे सोनार, लोकप्रतिनिधी व पोलिसांच्या माध्यमातून त्या महिलेने सापडलेला राणीहार मुळ मालकाला परत केला. नुरजहाँ फकीर यांच्या या कृतीमुळे आजच्या फसवाफसवीच्या काळातही प्रामाणिकपणा अद्याप जिवंत असल्याची प्रचिती येत आहे. या प्रामाणिकपणाबद्दल नुरजहाँ फकीर यांना दहा हजार रूपयांचे बक्षीस व साडी भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Advertisement

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोटे (ता.कराड) येथील अधिकराव दिनकर पवार हे आपल्या कुटुंबासमवेत शनिवार 7 रोजी हरतालिका मूर्ती विसर्जन करण्यासाठी प्रीतिसंगमावर आले होते. कृष्णा घाटावर नदीपात्रात हरतालिका विसर्जित करताना त्यांच्याकडून चुकून 10 तोळ्याचा राणीहार पाण्यात गेला. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमजवळ राहणाऱ्या नुरजहाँ फकीर या बुधवार 11 रोजी नेहमीप्रमाणे नदीपात्रात विसर्जित केलेले नारळ, ब्लाऊज पीस व नाणी शोधण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी त्यांना 10 तोळ्याचा सोन्याचा राणीहार सापडला.

Advertisement

नुरजहाँ फकीर यांनी तत्काळ याची माहिती त्यांच्या ओळखीचे सोनार निसार सय्यद यांना दिली. निसार सय्यद यांनी याबाबत माजी नगरसेवक सिद्धार्थ थोरवडे यांना कळवले. नुरजहाँ फकीर यांनी ज्यांचा हार हरवला आहे. त्यांना परत करण्याची भावना त्यांच्याजवळ व्यक्त केली. त्यानुसार निसार सय्यद व सिद्धर्थ थोरवडे नुरजहाँ फकीर व राणीहार घेऊन कराड शहर पोलीस स्टेशनला आले व पोलिसांना हकिकत सांगितली. त्यानुसार पोलिसांनी अधिकराव पवार यांना बोलावून ओळख पटवून सदरचा राणीहार त्यांच्या ताब्यात दिला.

तब्बल साडेआठ लाख रूपये किमतीचा सापडलेला सोन्याचा राणीहार प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल अधिकराव पवार यांनी नुरजहाँ फकीर यांना दहा हजार रूपयांचे बक्षीस दिले. तसेच नुरजहाँ फकीर व यांच्यासोबत असणाऱ्या दोन महिलांचा साडी भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच सुपर ज्वेलर्सचे मालक निसार सय्यद यांनीही प्रामाणिकपणे पोलिसांना कळवल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे गणेश कड, माजी नगरसेवक सिद्धार्थ थोरवडे, घनश्याम पेंढारकर, मुकुंद चरेगावकर, समाधान चव्हाण, किरण मुळे, गंगाधर जाधव, शिवाजी पवार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. नुरजहाँ फकीर यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisement
Tags :
#Honestypicking coconutsTola Ranihar returned
Next Article