For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

होम नर्सिस वयोवृद्धांच्या आयुष्यातील देवदूतच : डॉ. रविंद्र अनगोळ

10:08 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
होम नर्सिस वयोवृद्धांच्या आयुष्यातील देवदूतच   डॉ  रविंद्र अनगोळ
Advertisement

संजिवीनी फौंडेशनतर्फे चाळीसहून अधिक गृह परिचारिकांचा सत्कार

Advertisement

बेळगाव : वयोवृद्ध असो अथवा वैद्यकीय आव्हाने असणारे ऊग्ण असो त्या ऊग्णांना त्यांच्या दैनंदिन प्रक्रियेसाठी कुणाच्यातरी आधाराची गरज असते. ती गरज तुम्ही होम नर्स म्हणून पूर्ण करत असता. अशा गरजूंच्या आयुष्यातील आपण देवदूत आहात, असे प्रतिपादन आयएमए बेळगावचे अध्यक्ष तसेच कॅन्टोन्मेंट ऊग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र अनगोळ यांनी केले. बेळगाव शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांग लोकांच्या निवासी काळजीसाठी 24×7 कार्यरत असलेल्या चाळीसहून अधिक गृह परिचारिकांचा महिला दिनानिमित्त संजिवीनी फौंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ, आयएमएच्या राज्य उपाध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ तसेच सीईओ मदन बामणे, बाळेश उळवी, संस्थेच्या सल्लागार डॉ. सुरेखा पोटे होत्या. जयश्री ढवली यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुऊवात झाली. पुष्पा भेंडवाडे हिने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. सीईओ मदन बामणे यांच्याहस्ते डॉ रविंद्र अनगोळ यांचा, सविता देगीनाळ यांच्याहस्ते डॉ राजश्री अनगोळ यांचा तर रेखा बामणे यांच्याहस्ते डॉ सुरेखा पोटे यांचा शाल, स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक करताना डॉ. देगीनाळ यांनी होम नर्सिसविषयी कृतज्ञता व्यक्त केली. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते जवळपास चाळीस महिलांचा शाल स्मृतीचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी डॉ. राजश्री अनगोळ यांनी होम नर्सिस करीत असलेल्या कामाविषयी प्रंशसा केली. डॉ. पोटे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी बाळेश उळवी यांचे विशेष सहकार्य लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पद्मा औशेकर, सरिता सिद्दी, लक्ष्मी झंडे, पुष्पा भेंडवाडे यांनी परिश्र्रम घेतले.

Advertisement
Advertisement
Tags :

.