ऑलिम्पिकमधील हॉट अॅथलिट्स, सौंदर्यापुढे हॉलीवूड अभिनेत्रीही फिक्या
वृत्तसंस्था/ पॅरिस
पॅरिस ऑलिम्पिक महाकुंभमेळा सोमवारी पार पडला. जगातील या सर्वात मोठ्या सोहळ्यात तब्बल 200 हून अधिक देशांतील 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, या स्पर्धेत असे अनेक खेळाडू होते, जे त्यांच्या खेळाव्यतिरिक्त इतर कारणामुळेही चांगलेच चर्चेत राहिले. अनेक खेळाडूंनी जागतिक विक्रमासह आपले वर्चस्व अबाधित राखले तर अनेकांना पात्रता फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. या ना त्या कारणांमुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा चांगलीच गाजली, हे विशेष. दरम्यान, यंदाच्या स्पर्धेत अनेक सुंदर महिला अॅथलिटनी देखील सहभाग नोंदवला. ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक देशाचा संघ जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतो. पण या संघामध्ये अशा काही महिला खेळाडू आहेत, ज्या त्यांच्या खेळासोबत आपल्या सौंदर्यासाठी देखील ओळखल्या जातात. इतकेच नाही तर सोशल मीडियावर त्यांचे फॉलोअर्स अक्षरश: लाखोंच्या घरात आहेत. अशाच काही सुंदर महिला अॅथलिट्सचा फोटोसह घेतलेला आढावा...
- डारिया बिलोदिद, युक्रेन : युक्रेनची ज्युडो अॅथलिट डारिया बिलोदिद ही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली. अप्रतिम सौंदर्याव्यतिरिक्त, बिलोदिद ही एक जबरदस्त ज्युडो खेळाडू आहे. तिच्या सौंदर्याचे लोक वेडे आहेत. या 24 वर्षीय खेळाडूला ऑलिम्पिकमध्ये पराभवाचा सामना करावा लागला असला तरी तिची कामगिरी उल्लेखनीय राहिली.
- शिनो मत्सुदा, जपान - शिनो मत्सुदा ही सर्फिंगच्या जगात एक रायझिंग स्टार बनली आहे. केवळ सर्फिंगच नाही तर शिनो तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. जपानमधील फुजियामा बेटावर जन्मलेल्या शिनो मत्सुदाने लहान वयातच सर्फिंग सुरू केले. शिनोचा सर्फिंगच्या जगातला सर्वात मोठा विजय 2019 वर्ल्ड सर्फिंग गेम्समध्ये होता. ज्यात तिने सुवर्णपदक जिंकले. या विजयामुळे तिचा आत्मविश्वास तर वाढलाच पण आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एक अव्वल दावेदार म्हणूनही तिची ओळख निर्माण झाली आहे.
- सुनिसा ली, अमेरिका - टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी जिम्नॅस्ट सुनिसा लीच्या सौंदर्याची बरीच चर्चा झाली आहे. जिम्नॅस्टिकमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली महिला अमेरिकन खेळाडू आहे. मात्र, पॅरिसचा प्रवास सोपा नव्हता. किडनीच्या आजाराशी दोनदा झुंज दिल्यानंतर तिला अनेक शारीरिक आणि मानसिक आव्हानांना सामोरे जावे लागले. या अडचणी असूनही लीने ऑलिम्पिक इतिहासात आपले नाव नोंदवले. सुनिसाच्या नावावर आता एकूण 6 ऑलिम्पिक पदके आहेत.
- युलिया लेव्हचेन्को, युक्रेन - युक्रेनची हाय जम्पर युलिया लेव्हचेन्को तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. युलिया पॅरिस ऑलिम्पिकमधील सर्वात सुंदर खेळाडूंपैकी एक आहे. तिला खेळातील सर्वात मोठी ओळख लंडनमधील 2017 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मिळाली, जेव्हा तिने रौप्यपदक जिंकले. तिचे आकर्षक दिसणे आणि विलक्षण अॅथलेटिक क्षमतेमुळे तिला लाखो फॅन फॉलोअर्स मिळाले आहेत. युलिया लेव्हचेन्कोला इंस्टाग्रामवर जवळपास 5 लाख फॉलो करतात. टोकियो 2020 ऑलिम्पिकमध्ये ती चौथ्या स्थानावर राहिली आणि पॅरिसमध्ये तिची निराशा झाली.
- अलिका श्मिट, जर्मनी - अलिकाने आपल्या ग्लॅमरस लूकने आणि अॅथलेटिक जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचे निळे डोळे आणि फिटनेस यांनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिला फारसे यश मिळाले नसले तरी तिच्या उपस्थितीने अनेकांचे होश मात्र नक्की उडाले.
- कीली हॉजकिंसन, ग्रेट ब्रिटन - कीली हॉजकिंसन फक्त 22 वर्षांची आहे. ट्रॅक आणि फील्डमध्ये 800 मीटरची अंतिम फेरी केवळ 1:56.72 सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदक जिंकणारी ती 12 वर्षांतील पहिली ब्रिटिश महिला ठरली. अतिशय देखण्या असलेल्या किलीचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असल्याने ती नेहमीच चर्चेत असते.
- शा‘कॅरी रिचर्डसन, अमेरिका - ट्रॅक आणि फील्ड स्टार शा‘कॅरी रिचर्डसन तिच्या जबरदस्त नेल आर्टसाठी ओळखले जाते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिने तिच्या सोन्याच्या नखांनी सर्वांना आश्चर्यचकित केले. तिच्या नखांवर वाघाचे डिझाइन होते, जे विशेषत: सोफिया किनाया हॉगने तिच्यासाठी बनवले होते.
- लुआना अलोन्सो, पॅराग्वे - जलतरणपटू लुआना अलोन्सोला तिच्या सौंदर्यामुळे ऑलिम्पिक व्हिलेजमधून काढून टाकण्यात आले. लुआना मुळातच दिसण्यास सुंदर असल्यामुळे ऑलिम्पिक क्रीडाग्राममधील गैरवर्तनामुळे तिला मायदेशी पाठवण्यात आले. अर्थात, हा स्पर्धात्मक भाग झाला. वैयक्तिक आयुष्यात पराग्वेची ही जलतरणपटू एक मॉडेल आहे. अनेक फोटोशूट तिने केले असून तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स देखील आहेत.